Digital 7/12 – Online डिजिटल 7/12 उतारा

Digital 7/12 Utara फक्त गट नंबर किंवा नाव टाकून ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी सोपे पोर्टल. डिजिटल सातबारा , ८अ , प्रॉपर्टी कार्ड आणि महत्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी अशी पहा

नमस्कार, Digital 7/12 Utara ऑनलाइन पोर्टलवर तुमचे स्वागत आहे. ७/१२ उतारा हा महाराष्ट्र राज्यातील जमिनीच्या नोंदीशी संबंधित सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे. याचा उपयोग प्रामुख्याने जमिनीची मालकी दर्शवण्यासाठी केला जातो. पूर्वापार महाराष्ट्र राज्यातील गावांच्या पातळीवर हा दस्तऐवज तलाठी कार्यालयात जपून ठेवला जातो.

शेतकरी आणि इतर नागरिकांच्या साठी खूपच उपयोगी असलेल्या या दस्ताऐवजात Land Record जमीन धारकाचे नाव, पत्ता, जमिनीची एकूण क्षेत्रफळ, जमिनीचे प्रकार (उत्पन्न जमीन, बागायत जमीन), पिकांची माहिती, जमीन ताबा, खरेदी-विक्रीची नोंद आणि बँकेचे कर्ज इत्यादी तपशील दिलेला असतो.

पूर्वीपासून आपण जमिनीची कागदपत्रे जसे की 7/12 उतारा, 8अ, जमिनीचा नकाशा यासाठी शासकीय कार्यालयांवर अवलंबून होतो, आता मात्र नवीन ऑनलाइन सुविधामुळे डिजिटल सातबारा आणि इतर कागदपत्रे मिळवणे सहज शक्य झाले आहे. आपण अगदी काही मिनिटात आपली माहिती भरून digital 7/12 मिळवू शकतो. हा सातबारा विना स्वाक्षरी आणि स्वाक्षरीसह अश्या दोन पद्धतीने काढता येतो. विना स्वाक्षरी डिजिटल 7/12 मोफत काढता येतो. ऑनलाइन पोर्टलवर नाममात्र शुल्क भरून सोप्या पद्धतीने Digitally Signed 7/12 काढता येतो.

7/12 हा शब्द दोन वेगवेगळे शब्द फॉर्म 7 आणि फॉर्म 12 मिळून बनलेला आहे…

फॉर्म 7: हा जमीन धारकाची माहिती दाखवतो. यामध्ये जमीन धारकाचे नाव, पत्ता, जमीन किती एकर आहे, जमिनीचे प्रकार, पिकांची माहिती इत्यादींची माहिती दिलेली असते.

फॉर्म 12: हा जमीनाचे उत्पन्न, जमिनीचे प्रकार, कोणत्या पिकाचे उत्पन्न आहे याची माहिती दाखवतो.

Online Digital 7/12

7/12 आणि जमिनीशी संबंधित इतर कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ऑनलाइन पोर्टलची सुरुवात केली आहे. या पोर्टलवर नागरिकांना जिल्हा आणि गावानुसार गट नंबर टाकून Digital 7/12 PDF स्वरूपात डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा Digitally Signed 7/12 कोणत्याही शासकीय अथवा खासगी कार्यालये तसेच वेगवेगळ्या बँक व्यवहारांसाठी वैध आहे. त्याचबरोबर आधीपासून सुरू असलेली मोफत विनास्वाक्षरी सातबारा उतारा पाहण्याची सुरू राहणार आहे. फक्त गट नंबर किंवा सर्वे नंबर टाकून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कोणत्याही जमिनीचा 7/12 पाहता येईल.

डिजिटली साईन केलेला 7/12 (शुल्क लागू)

डिजिटली साईन केलेला सातबारा (डिजिटल स्वाक्षरीत) सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा सातबारा एक कायदेशीर कागद असून, काही शुल्क भरून नागरिकांना 7/12 पाहता येईल. डिजिटल स्वाक्षरीत उतारा पाहण्यासाठी  प्रक्रिया:

  1. महाभूमी पोर्टलला भेट द्या: Mahabhulekh (Maharashtra Bhumi Abhilekh) या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. त्यानंतर या पोर्टलवर अकाउंट नसेल तर ‘New User Regirstration’ या पर्यायावर क्लिक करा. जर तुमचे आधीपासून अकाउंट असेल तर Login ID आणि पासवर्ड टाकून login करा.
New Users Registration process

  1. या पोर्टल वरून तुम्ही Sign केलेले 7/12, 8A, Property Card आणि eFerfar ही  डाउनलोड करू शकता.
  2. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Digitally Signed 7/12 हा पर्याय निवडायचा आहे.
  3. आपला जिल्हा निवडा: पोर्टलवर सर्वप्रथम आपला जिल्हा निवडा. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या यादीतून तुमच्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा.
  4. तालुका आणि गाव निवडा: आपला जिल्हा निवडल्यानंतर अनुक्रमे  तालुका आणि गाव निवडा.
Select district to view digital 7/12
  1. सातबारा उतारा निवडा:
    • यानंतर तुम्हाला अंकित सातबारा आणि अक्षरी सातबारा असे दोन पर्याय दिसतील, यातील एक पर्याय निवडा.
    • यानंतर तुम्हाला ज्या क्षेत्राचा सातबारा पहायचं आहे, त्याचा गट नंबर प्रविष्ट करा. त्यानंतर तुमचा  सर्वे नंबर निवडा.
  2. उतारा शोधा:
    • माहिती भरल्यानंतर ‘Search’ किंवा ‘सर्च’ बटणावर क्लिक करा.
    • आपल्याला उपलब्ध सातबारा कोणत्या दिवशी Digitally Sign केला आहे त्याची तारीख दिसेल.
    • डिजिटली साईन केलेला उतारा मिळवण्यासाठी ‘Digitally Signed 7/12’ या पर्यायावर क्लिक करा.
    • एक 7/12 पाहण्यासाठी आपल्याला 15 रुपये ऑनलाइन पेमेंट करावे लागेल. त्यासाठी प्रथम तुमचे पोर्टल अकाउंट रिचार्ज करावे लागेल. तुम्ही 15 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत कितीही रुपये तुमच्या खात्यात जमा करू शकता.
Payment option for 7/12
  1. ऑनलाइन पेमेंट करा:
    • Online Payment करण्यासाठी तुम्हाला स्टेट बँकेच्या पेमेंट गेटवेवर नेले जाईल, जिथे तुम्ही इंटरनेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा UPI च्या माध्यमातून सहजरीत्या पैसे भरू शकता.
    • UPI QR कोड हा पर्याय निवडून मोबाइलवरून पैसे भरू शकता. जर तुम्हाला एकच सातबारा हवा असेल तर खात्यावर फक्त 15 रुपये जमा करा.
  2. 7/12 उतारा डाउनलोड करा:
    • तुमचे अकाऊंट रिचार्ज केल्यानंतर, सातबारा पहा या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या अकाऊंट मधील 15 रुपये कमी होतील आणि तुम्हाला तुम्हाला तुमचा 7/12 मिळेल
    • पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, डिजिटली साईन केलेला सातबारा उतारा डाउनलोड करा किंवा प्रिंट करा. सातबारा फाईल जतन करून ठेवा.

विनास्वाक्षरी 7/12 (मोफत)

विना स्वाक्षरी मोफत 7/12 उतारा आणि 8अ मालमत्ता पत्र पाहण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया

  • सर्व प्रथम महाराष्ट्र शासनाच्या महाभुलेख वेबसाईट वर जा
  • त्यानंतर विना स्वाक्षरीत ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी तुमचा विभाग निवडा. तुमच्या विभागाचे पोर्टल उघडेल.
free 7/12 utara
  • सर्वप्रथम 7/12, 8अ आणि मालमत्ता पत्र यापैकी तुम्हाला हवे ते कागदपत्र निवडा
  • त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा निवडा, त्यानंतर अनुक्रमे तुमचा तालुका आणि तुमचे गाव निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला 7/12 पाहण्याचे 5 पर्याय दिसतील. गट नंबर, नाव, आडनाव, सर्वे नंबर आणि संपूर्ण नाव. यापैकी कोणताही एक पर्याय निवडा
select district for 7/12 utara
  • योग्य गट नंबर किंवा नाव टाकल्यानंतर तुम्हाला भाषा, मोबाईल क्रमांक आणि Captcha विचारला जाईल.
  • सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर लगेच तुम्हाला मोफत   तुमचा साधा 7/12 दिसेल…

जर आपल्याला या प्रक्रियेत काही अडचण येत असेल तर आपल्या जवळच्या तलाठी किंवा भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा.

Digital 7/12 वर कोणकोणती माहिती असते

7/12 उताऱ्याला सातबारा उतारा असे देखील म्हणले जाते. या Land Record मध्ये जमिनीच्या मालकी संदर्भातील ही माहिती नमूद असते:

  1. जमिनीचे सर्वेक्षण क्रमांक (Survey Number): गट नंबर आणि सर्व्हे नंबर हे जमिनीच्या तुकड्याचे ओळख क्रमांक आहेत.
  2. जमिनीचे क्षेत्रफळ: जमिनीच्या तुकड्याचे एकूण क्षेत्रफळ (हेक्टरमध्ये) 7/12 उताऱ्याच्या वरच्या बाजूस नमूद केलेले.
  3. जमिनीचे प्रकार: 7/12 उताऱ्यावर बागायती, जिरायती, नापिकी, पिकदार इत्यादी माहिती दिलेली असते.
  4. मालकाचे नाव: जमिनीच्या मालकांचे पूर्ण नाव.
  5. जमिनीवरील हक्क: 7/12 वर जमिनीवरील हक्कधारकांची माहिती (जसे की वारस, हिस्सेदार) नमूद असते. त्याच बरोबर कुळ कायदा जमीन असेल तर तेही नमूद असते
  6. कर्ज आणि बोजा: जमिनीवर असलेल्या कर्जाचे तपशील (बँक किंवा इतर संस्था) याबद्दल ही सविस्तर माहिती सातबारा उताऱ्यावर असते.
  7. पिकांची माहिती: त्या जमिनीवर पिकणाऱ्या चालू वर्षातील दोन्ही हंगामाच्या पिकांची माहिती आणि पिकांचे क्षेत्र इत्यादी माहिती दिलेली असते.
  8. करभरणा: जमिनीवर भरल्या गेलेल्या करांची माहिती.

हे सगळे तपशील सातबारा उताऱ्यावर नमूद असतात, ज्यामुळे जमिनीच्या मालकी संबंधित आणि आर्थिक स्थितीची माहिती मिळवता येते.

Digital Signed 7/12साधा 7/12
हा सातबारा मिळवण्यासाठी ठराविक शुल्क भरावे लागतेहा सातबारा मोफत काढता येतो
सर्व शासकीय ठिकाणी मान्यफक्त पाहण्यासाठी उपयोगी, कोणत्याही कामासाठी अमान्य
फक्त स्वतःचा 7/12 पाहता येतोकोणाचाही 7/12 पाहता येतो
PDF स्वरूपात डाउनलोड करता येतोफक्त पाहण्यासाठी उपलब्ध

Digital 7/12 काढताना येणाऱ्या अडचणी आणि उपाय

ऑनलाइन Payment अयशस्वी

डिजिटल सातबारा उतारा काढताना ₹१५ इतके शुल्क भरावे लागत असल्याने ऑनलाइन पद्धतीने या रकमेचा भरणा करावा लागतो. बऱ्याच वेळा Digital 7/12 काढताना Payment होतच नाही किंवा बँकेतून पैसे कट होतात पण खात्यावर जमा होत नाहीत.

हे टाळण्यासाठी तुम्ही 7/12 बाबत जिल्हा, तालुका ही माहिती भरण्या अगोदर ‘Recharge Account’ हा पर्याय निवडून पैसे जमा करून घ्या. त्याचबरोबर SBI आणि Bank of Baroda Payment Gateway पैकी SBI निवडा आणि त्यानंतर डेबिट कार्ड, UPI किंवा Net Banking यामधील एक पद्धत वापरून पेमेंट करा. तुम्ही जर नाविन वापरकर्ते असाल तर सोप्या पद्धतीनं UPI QR Code हा पर्याय निवडा, आणि मोबाइलद्वारे Code Scan करून पेमेंट करा. तरीही जर तुमच्या बँकेतील पैसे कट झाले पण तुमच्या खात्यात जमा नाही झाले तर तर 7 दिवसात हे पैसे परत बँक खात्यात जमा होतील.

सर्व्हर डाउन असणे

बर्याच वेळा जेंव्हा शासनाची एखादी योजना सुरू होते, किंवा मार्च अखेर असते तेंव्हा बरेच नागरिक एका वेळी 7/12 आणि इतर कागदपत्रे ( Land Records) download करण्यासाठी इच्छुक असतात. अश्यावेळी पोर्टल सर्व्हर डाऊन होण्याची समस्या निर्माण होते.

सर्व्हर डाऊन झाल्यानंतर पुन्हा सेवा सुरू होण्याची वाट पाहणे हा पर्याय आपल्यापुढे राहतो. अश्यावेळी पहाटे लवकर, किंवा रात्री उशिरा 7/12 उतारा download करा जेणेकरून यावेळी पोर्टल वापरकर्त्यांची संख्या कमी असेल.

एखादा 7/12 उतारा न सापडणे

जेंव्हा एखाद्या नावावरून किंवा आडनावावरून 7/12 शोधण्याचा प्रयत्न केला जातो तेंव्हा एकदा 7/12 न सापडणे ही एक सामान्य समस्या आहे. एखाद्या गावात एकाच नावाचे एकापेक्षा अधिक नागरिक असू शकतात त्यामुळे नावावरून 7/12 शोधताना अडचणी येतात.

तुमचा 7/12 उतारा शोधण्यासाठी गट नंबर किंवा सर्व्हे नंबरचा वापर केल्यास अचूक 7/12 शोधता येतो. जर तुमच्याकडे काही कारणामुळे गट नंबर नसेल तर तुम्ही प्रथम नाव आणि आडनाव वरून मोफत 7/12 शोधा, त्यामध्ये गट नंबर नमूद असेल तो वापरून तुम्ही अचूक Digital स्वाक्षरी 7/12 उतारा download करू शकता.

सातबारा उतारा (7/12) कागदपत्र का आवश्यक आहे?

या दस्तऐवजात महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जमिनीच्या तुकड्याबद्दल संबंधित अत्यंत आवश्यक माहिती आहे आणि 7/12 जमिनीशी संदर्भातील कामासाठी गरजेचं आहे, जसे की-

  • 7/12 जमिनीचे अचूक स्थान निश्चित करण्यात मदत करते.
  • 7/12 एक कायदेशीर दस्तऐवज आहे आणि न्यायालयात जमिनीचा मालकी पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते.
  • जमिनीशी संबंधित कोणत्याही मुकदमा किंवा वादाची माहिती देते.
  • कर तपशील प्रदान करते.
  • जमिनीवर चालू असलेल्या सर्व कृषी क्रियाकलापांचा तपशील प्रदान करते, जसे की पिकांचे प्रकार.
  • कृतीवर आधारित जमिनीला लागवडीयोग्य किंवा लागवडीयोग्य जमीन म्हणून वर्गीकृत करण्यास मदत करते.

सातबारा उतारा जमिनीच्या मालकीचा पुरावा म्हणून काम करतो.  जमिनीशी संबंधित कोणत्याही भूतकाळातील विवादांची तपासणी करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.  कोणत्याही दिवाणी खटल्याच्या बाबतीत न्यायालयाला जमीन अभिलेख (७/१२ उतारा) पुराव्याची आवश्यकता असू शकते.  तसेच कोणत्याही जमिनीच्या खरे विक्री संदर्भातील व्यवहारांसाठी याची आवश्यकता आहे.

तसेच, जमीन मालकाला बँकेकडून कर्ज (शेती किंवा वैयक्तिक कारणासाठी) घ्यायचे असल्यास, 7/12 उतारा आवश्यक आहे.  अशा प्रकारे, खरेदीदारासाठी नंतरच्या टप्प्यात कोणतीही अडचण टाळण्यासाठी जमिनीशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती तपासण्यासाठी अलीकडचा सातबारा उतारा अत्यंत महत्वाचा आहे.

डिजिटल स्वाक्षरीत 7/12 मोफत मिळवता येतो का?

नाही, डिजिटल स्वाक्षरीत 7/12 मिळवण्यासाठी तुम्हाला digital 7/12 पोर्टल वर प्रत्येक 7/12 साठी ₹15 इतके शुल्क भरावे लागते. स्वाक्षरी नसलेला कोणाचाही 7/12 तुम्ही मोफत पाहू शकता.

Digital 7/12 उतारा वैध आहे का, याची पडताळणी कशी करावी?

डिजिटल स्वाक्षरीत 7/12 वैध आहे का हे पाहण्यासाठी @digitalsatbara.mahabhumi.gov.in या पोर्टल वर जाऊन ‘Verify 7/12’ हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर पडताळणी क्रमांक (Verification Number) टाकून सातबारा उतारा वैध आहे का याची पडताळणी करता येते.

सोप्या पद्धतीने 7/12 उतारा कसा डाऊनलोड करावा

पोर्टल अकाउंट बनवून 7/12 उतारा काढण्यास आपल्याला अडचण येत येत असल्यास तुम्ही Landeed किंवा Umang सारखे ॲप वापरून काही मिनिटात 7/12 काढू शकता. परंतु या ॲप वर आपल्याला ₹15 पेक्षा अधिक शुल्क भरावे लागू शकते

सातबारा उतारा कसा शोधायचा?

सातबारा उतारा शोधण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम digital 7/12 पोर्टल वर जाऊन आपला विभाग निवडावा लागेल. त्यानंतर अनुक्रमे तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. त्यांनतर तुमचा सातबारा शोधण्यासाठी जमिनीचा सर्वे नंबर, गट नंबर, जमीन मालकाचे नाव किंवा आडनाव यापैकी एक माहिती भरून ‘Search’ पर्यायावर क्लिक करायचे आहे.

विना स्वाक्षरी सातबारा कायदेशीर कामासाठी वैध आहे का

विना स्वाक्षरी 7/12 उतारा फक्त पाहण्यासाठी उपलब्ध आहे, हा 7/12 कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर कामासाठी अमान्य आहे.