नमस्कार शेतकरी बांधवांनो, सदरच्या मालिकेतील आज आपला जिल्हा आहे कोकण प्रशासकीय विभागातील रायगड जिल्हा. रायगड जिल्हा हा कोकणातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर जलद गतीने नागरिकीकरण होत असलेला जिल्हा म्हणूनही रायगड जिल्ह्याची ओळख आहे. इतर जिल्ह्याप्रमाणे रायगड जिल्हा आहे पर्यटन मत्स्य व्यवसाय भात शेती आणि फलोत्पादन या क्षेत्रात आघाडीवर आहे. रायगड जिल्ह्याला सर्वात जास्त लांबीचा समुद्रकिनारा लाभल्यामुळे तेथे मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. शासनाच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्याचा समावेश या उपक्रमामध्ये करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये समावेश केल्यानंतर या जिल्ह्याने डिजिटल सातबाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. डिजिटल सातबारा चा मुख्य उद्देश म्हणजे जमिनी संबंधित नोंदणीचे संगणकीकरण करणे आणि नागरिकांना त्यांच्या जमिनीची माहिती डिजिटल स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे.
सदरच्या लेखांमध्ये आपण रायगड जिल्ह्यातील डिजिटल सातबारा विषयीची संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात मांडणार आहोत. यामध्ये यामध्ये डिजिटल सातबारा म्हणजे काय? डिजिटल सातबाराचे महत्त्व, मोफत डिजिटल सातबारा कसा पाहायचा? डिजिटल स्वाक्षरीसह डिजिटल सातबारा कोणत्या पद्धतीने डाऊनलोड करायचा? रायगड जिल्ह्यातील जुने सातबारा फेरफार याविषयीची संपूर्ण माहिती आपण सदरच्या लेखांमध्ये पाहणार आहोत.
डिजिटल सातबारा विषयी थोडक्यात…
डिजिटल सातबारा म्हणजे जमिनीची संपूर्ण माहिती शासनाच्या किंवा जमिनीच्या संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर डिजिटल स्वरूपात संग्रहित किंवा गोळा केलेली असते त्याला डिजिटल सातबारा असे म्हणतात. डिजिटल स्वरूपातील माहितीच्या आधारे नागरिक जमिनीची संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने मिळू शकतात. डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन माहिती पारदर्शक आणि अचूक स्वरूपात उपलब्ध होते. या माहितीच्या आधारावर जमिनीची खरेदी विक्री त्याचबरोबर हस्तांतर प्रक्रिया अधिक पारदर्शक होताना दिसते.
डिजिटल सातबारा फायदे
- डिजिटल सातबारावर मिळणारी माहिती अचूक स्वरूपात असते, यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करता येत नाही.
- नागरिकांच्या जमिनीची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत असल्यामुळे नागरिकांच्या पैशाची बचत होते.
- जमिनीच्या नोंदी डिजिटल स्वरूपात शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्यामुळे त्या सुरक्षित तर असतातच, त्याचबरोबर त्यांची नक्कल करता येत नाही. डिजिटल सातबाराचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यावरील माहिती वेळोवेळी अपडेट होत राहते.
- जमिनीची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात मिळत असल्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचतो. त्याचबरोबर जमिनीच्या नोंदी करण्यासाठी विनाकारण भटकंती करण्याची गरज नाही.
- डिजिटल सातबाराचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे हे सातबारा नागरिक कधीही आणि कोठेही सहजरित्या उपलब्ध करून घेऊ शकतात.
डिजिटल सातबाराच्या माध्यमातून जमिनीशी संबंधित कोणती माहिती मिळू शकते?
- जमिनीचा मालक
- जमिनीचे क्षेत्रफळ
- जमिनीचे वर्गीकरण
- जमिनीचा नकाशा
- जमिनीचे चतुर सीमा
- जमिनीवरील कर्ज किंवा बोजा
- जमिनीशी संबंधित इतर सर्व माहिती
डिजिटल सातबाराच्या माध्यमातून करता येणारी कामे
- जमिनीशी संबंधित सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने केले जाऊ शकतात.
- जमीन खरेदी विक्रीची नोंद ऑनलाईन पद्धतीने करता येते.
- नागरिकांना त्यांच्या जमिनीचा सातबारा ऑनलाइन पद्धतीने मोफत पाहता येतो. त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरी सह डाऊनलोड करता येतो. याबद्दलची सविस्तर माहिती आपण खाली पाहणारच आहोत.
रायगड जिल्हा डिजिटल सातबारा
रायगड जिल्ह्यातील डिजिटल सातबारा नागरिकांना पाहण्याची सोय महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर केली आहे. या संकेतस्थळावर जाऊन रायगड जिल्ह्यातील नागरिक त्यांच्या जमिनीचा सातबारा मोफत पणे पाहू शकतात. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने डिजिटल स्वाक्षरीस डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्याची सोय रायगड जिल्ह्यातील नागरिकांसाठी केली आहे. रायगड जिल्हा प्रशासनावर पडणारा कामाचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून उचललेले हे एक पाऊल आहे. डिजिटल सातबारा मोफत कसा पाहायचा? त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड कसा करायचा? याविषयीची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.
रायगड जिल्हा डिजिटल सातबारा मोफत पाहण्याची संपूर्ण माहिती
रायगड जिल्ह्यातील डिजिटल सातबारा मोफत पाहण्याची पद्धत शासनाकडून खूपच सोपी केली गेली आहे. त्याविषयाची संपूर्ण माहिती आपण खाली सविस्तरपणे पाहूया.
- रायगड जिल्ह्यातील डिजिटल सातबारा मोफत पाहण्यासाठी सर्वप्रथम महसूल विभागाच्या संकेतस्थळावर जावे लागेल.👇👇👇 https://bhulekh.mahabhumi.gov.in
- संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्वप्रथम विभाग निवडून Go या बटनावर क्लिक करा. (कोकण विभाग)
- रायगड जिल्हा निवडा.
- तालुका निवडा.
- तालुका निवडल्यानंतर खाली त्या तालुक्यातील संपूर्ण गावांची यादी दिसेल, या यादीतून तुमच्या गावाचे नाव निवडून त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकून किंवा पहिले नाव, मधले नाव,आडनाव किंवा संपूर्ण नाव टाकून सातबारा पाहता येतो.
- त्यानंतर मोबाईल नंबर टाकून ७/१२ शोधा बटनावर क्लिक करा.
- दिलेला कॅप्च्या अचूक भरा. त्यानंतर verify captcha to view 7/12 वर क्लिक करून रायगड जिल्ह्यातील नागरिकांना मोफत सातबारा पाहता येतो.
वरील माहितीचा संदर्भ घेऊन रायगड जिल्ह्यातील नागरिकांना कोणत्याही जमिनीचा सातबारा मोफत पाहता येतो. रायगड जिल्ह्यातील नागरिक हा सातबारा फक्त पाहू शकतात, त्याचा वापर कोणत्याही कायदेशीर कामासाठी करता येत नाही.
रायगड जिल्हा डिजिटल सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करण्याची संपूर्ण माहिती
रायगड जिल्ह्यातील डिजिटल सातारा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करता येतो त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण खाली पाहूया.
- रायगड जिल्ह्यातील डिजिटल सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर जावे लागेल.👇👇👇 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
- मोबाईल नंबर टाकून Send OTP या बटनावर क्लिक करा.
- मोबाईलवर आलेला OTP हा नंतर Enter OTP मध्ये भरा आणि त्यानंतर verify OTP बटनावर क्लिक करा.
- डिजिटल सातबारा हा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करायचा असल्यामुळे Net banking/credit/debit card वरून १५ रुपये रिचार्ज करावा लागेल.Recharge account बटनावर क्लिक करून संबंधित शुल्क भरता येईल.
- रायगड जिल्हा निवडा.
- तालुका निवडा.
- गाव निवडा.
- सर्वे नंबर किंवा गट नंबर टाका.
- वरील सर्व माहिती अचूक स्वरूपात भरल्यानंतर व १५ रुपये ऑनलाइन पे केल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीसह डिजिटल सातबारा रायगड जिल्ह्यातील नागरिकांना डाऊनलोड करून घेता येईल.
वरील माहितीच्या आधारे रायगड जिल्ह्यातील नागरिक किंवा शेतकरी डिजिटल सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करून घेऊ शकतात. डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड केलेला सातबारा हा कोणत्याही कायदेशीर कामांसाठी ग्राह्य मानला जातो. डिजिटल सातबारा चेक महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे या सातबारावर संबंधित अधिकाऱ्याची वेगळी सही व शिक्का घेण्याची गरज नसते.
रायगड जिल्हा जुने सातबारा व फेरफार
रायगड जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र शासनाने जमिनीचे जुने सातबारा व फेरफार ऑनलाईन पद्धतीने मोफत पाण्याची सोय त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर केली आहे. त्याचबरोबर जुने सात बारा व फेरफार डाऊनलोड कसे करायचे याबद्दलची संपूर्ण मार्गदर्शिका संबंधित संकेतस्थळावर महाराष्ट्र शासनाकडून रायगड जिल्ह्यातील नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. जुने सातबारा व फेरफार हे जमिनीची ऐतिहासिक नोंद ठेवण्याचे काम करतात. जुने सातबारा व फेरफार यांच्या माध्यमातून जमिनीमध्ये कालांतराने झालेल्या बदलाची अचूक माहिती मिळते. जुने सातबारा व फेरफार यांच्या आधारावर दस्तऐवजांची सत्यता पडताळणी जाते. रायगड जिल्ह्यातील जुने सातबारा व फेरफार मोफत कसे पाहायचे? त्याचबरोबर डाऊनलोड कसे करायचे? याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया.
रायगड जिल्हा जुने सातबारा व फेरफार मोफत कसे पाहायचे? डाउनलोड कसे करायचे? याबद्दलची संपूर्ण माहिती
- रायगड जिल्ह्यातील जुने सातबारा व फेरफार मोफत पाहण्यासाठी त्याच बरोबर डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.👇👇👇 https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in
- संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्वप्रथम लॉगिन करावे लागेल.
- लॉगिन केल्यानंतर नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी करण्यासाठी संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर ही माहिती अचूक स्वरूपात भरावी लागेल.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील ज्या जमिनीचा जुना सातबारा व फेरफार पाहायचा आहे किंवा डाऊनलोड करायचा आहे त्या जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर, गावाचे नाव, तालुका ही माहिती भरायची आहे.
- दिलेला कॅप्च्या व्यवस्थित भरून घ्यायचा आहे.
- त्यानंतर संबंधित जमिनीचा जुना सातबारा व फेरफार स्क्रीनवर दिसेल, तेथून रायगड जिल्ह्यातील नागरिक हा सातबारा व फेरफार मोफत पणे पाहू शकतात.
- जमिनीचा जुना सातबारा व फेरफार रायगड जिल्ह्यातील नागरिकांना डाऊनलोड स्वरूपात हवा असेल तर, रायगड जिल्ह्यातील नागरिक Download Option वर क्लिक करून pdf स्वरूपात डाउनलोड करून घेऊ शकतात.
- जुने सातबारा व फेरफार डाऊनलोड करण्यासाठी संबंधित व्यक्तीला १५ रुपये इतके शुल्क Net Banking/Credit/Debit Card द्वारे भरावे लागते.
वरील माहितीचा संदर्भ घेऊन रायगड जिल्ह्यातील नागरिक कोणत्याही जमिनीचा जुना सातबारा व फेरफार मोफत पाहू शकतात त्याचबरोबर सदरचे दस्तऐवज डाउनलोड स्वरूपात हवे असतील तर 15 रुपये इतके नाममात्र शुल्क भरून हे दस्तऐवज डाउनलोड करून घेता येतात.
सदरच्या लेखाच्या माध्यमातून आपण रायगड जिल्ह्यातील डिजिटल सातबारा विषयीची संपूर्ण माहिती सविस्तरपणे व अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. सदर माहितीच्या आधारे रायगड जिल्ह्यातील नागरिक त्यांच्या जमिनीचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने मिळवू शकतील.धन्यवाद!