नावावरून महाराष्ट्रातील कोणत्याही शेत जमिनीचा 7/12 कसा शोधायचा? |Search  7/12 by Name

आज आपण शेती संबंधित कोणताही दस्ताऐवज महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावरील कसा पाहायचा याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. नावावरून 7/12, 8अ आणि ई फेरफार ही कागदपत्रे शोधता येतात. आज आपण महाराष्ट्रातील कोणाच्याही नावावरून 7/12 उतारा शोधायचा हे पाहूया…

जमिनीच्या कोणत्याही व्यवहारासाठी किंवा इतर काही जमीन विषयक बाबींचा पडताळा घेण्यासाठी दुसऱ्याच्या नावावरील जमीन विषयक दस्तऐवज Land Records पाहून योग्य ती चाचपणी केलेली केव्हाही चांगली असते. 

राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील एखादा दस्तऐवज पाहायचा असेल तर आता महाराष्ट्र सरकारने विना अडथळा पाहण्याची  सोय करून ठेवली  आहे. यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होत नाही म्हणजेच तुम्हाला जी हवी आहे ती माहिती अगदी पारदर्शक पद्धतीने पाहायला मिळू शकते किंवा तुम्ही तो दस्तऐवज डाउनलोड ही करून घेऊ शकता चला तर मग याविषयी आणखी सविस्तर पाहू.

Plot Map example

महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावरील ७/१२ पाहण्यासाठीच्या दोन पद्धती आहेत त्या खालील प्रमाणे.

१. महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावरील महत्त्वाचे दस्तऐवज कसे पाहायचे?

एकूणच पाहायला गेले तर महाराष्ट्र मधील कोणत्याही जिल्ह्यातील महत्त्वाचे दस्तऐवज म्हणजे ७/१२, ८ अ व मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी शासनाकडून अगदी पारदर्शक व अगदी अचूक माहिती मिळण्याची यंत्रणा राबवली जात आहे. त्याबद्दल आपण स्टेप बाय स्टेप सविस्तरपणे पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावरील सातबारा पाहण्याची प्रोसेस स्टेप बाय स्टेप खालील प्रमाणे

  • सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या👇 https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला ज्या विभागातील दस्तऐवज पाहायचे आहेत तो विभाग निवडावा लागेल.( समजा तुम्हाला जर पुणे विभागातील एखाद्या व्यक्तीच्या नावावरील सातबारा सातबारा पाहायचा असेल तर तुम्ही पुणे या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.)
Select division
  • त्यानंतर तुम्हाला तालुका या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
  • नंतर ज्या गावातील सातबारा पाहायचा आहे त्या गावचे नाव निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला जो सातबारा पाहायचा पाहायचा आहे त्यातील तुम्ही ज्या नावावरून हा सातबारा पाहणार आहात ते नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहे.
Enter Name to Search
  • समजा जर तुम्हाला त्या व्यक्तीच्या पहिल्या नावावरून सातबारा पाहायचा असेल तर तुम्ही त्या व्यक्तीचे पहिले नाव त्या ऑप्शनमध्ये टाकायचे आहे तसेच मधले नाव आणि शेवटचे आडनाव या नावावरून मी तुम्ही हा सातबारा पाहू शकता.
  • ही सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्ही सर्च या बटणावर क्लिक करून तुम्हाला जो सातबारा पाहायचा आहे तो तुमच्या स्क्रीनवर पाहू शकाल.

अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील सातबारा त्याचबरोबर तुम्हाला जो कोणताही दस्तऐवज पाहायचा असेल तो तुम्ही वरील फॉलो करून पाहू शकता.

२. एखाद्याच्या नावावरून महाराष्ट्रातील कोणत्याही शेत जमिनीचा सातबारा कसा डाऊनलोड करायचा?

जसे की आपण वरील सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावरील सातबारा आपण फक्त पाहू शकतो. आता आपण सातबारा डाऊनलोड कसा करू शकतो याविषयी सविस्तरपणे पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावरील सातबारा डाऊनलोड करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे.

  • सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या👇https://Bhumi abhilekh. Maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला ज्या विभागातील सातबारा डाउनलोड करायचा आहे त्या विभागाचे नाव निवडा. (येथेही तुम्हाला पुणे विभागातील सातबारा डाऊनलोड करायचा असल्यास तुम्ही पुणे हा विभाग निवडू शकता.)
Select 7/12 Utara Download option
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या विभागातील कोणत्या जिल्ह्यातील सातबारा तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे तो जिल्हा निवडा.
  • त्यानंतर तालुका निवडा.
  • आणि शेवटी गाव निवडा.(ज्या गावातील व्यक्तीच्या नावावरील सातबारा डाऊनलोड करायचा आहे ते गाव.)
  • आपण सातबारा हा व्यक्तीच्या पहिल्या नावावरून किंवा त्या व्यक्तीचे मधले नाव त्याच बरोबर आडनाव या तीन पैकी एका पर्यायावरून सातबारा डाऊनलोड करायचा असल्याने या ठिकाणी तुम्हाला सर्वे क्रमांकाची आवश्यकता नाही.
Enter First Name, Middle Name or Surname to search
  • वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या व्यक्तीच्या पहिल्या नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शोधा हा पर्याय दिसेल.
  • शोधा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील या नावांच्या 7/12 ची यादी दिसेल
  • त्या यादीतील तुम्हाला हवा तो 7/12 तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करायचा आहे.
  • पुढे तुम्ही डाउनलोड या बटनावर क्लिक करून तुम्ही तो सातबारा  pdf स्वरूपात डाउनलोड करून घेऊ शकता.

वरील दोन्ही पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावरील सातबारा पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. त्याचबरोबर यामध्ये पारदर्शकता मोठ्या प्रमाणात दिसून येते असल्यामुळे यामध्ये कोणताही गैरप्रकार घडत नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावरील सातबारा पाहणे खूपच सुरक्षित आहे. याचा आणखी एक फायदा म्हणजे वेळेची बचत होते. कोणत्याही व्यक्तीला अनावश्यक महसूल कार्यालयामध्ये चकरा माराव्या लागत नाहीत. अगदी तुम्ही एका जागेवर बसून सर्व माहिती एका क्लिकवर पाहू शकता हवे असल्यास डाऊनलोडही करून घेऊ शकता.

Leave a Comment