महाराष्ट्रात प्लॉट खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांपैकी 7/12 ला खूप महत्त्व आहे. याला सातबारा उतारा असेही म्हणतात, यात कोणत्याही मालमत्तेची संपूर्ण माहिती RoR (अधिकारांचे रेकॉर्ड) स्वरूपात असते. 7/12 (सातबारा) Landeed या ॲप वर उपलब्ध आहे, हे ॲप जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे Land records सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देते. आज या लेखात आपण Landeed ॲप वरून Digital 7/12 उतारा कसा डाउनलोड करायचा याबाद्द्दल अधिक माहिती घेऊया.
7/12 उतारा फॉर्म 7 आणि फॉर्म 12 यांचा मिळून बनलेला आहे म्हणून त्याला हे नाव दिले आहे. यावर महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील जमिनीची तपशीलवार माहिती असते. महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकारच्या जमिनीसाठी सर्वात महत्वाचा दस्तऐवज आहे. जमीन खरेदी विक्री, कर्ज प्रकरणे इत्यादी महत्वाच्या कामासाठी याचा उपयोग होत असल्याने याविषयी सर्वाना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
Landeed App काय आहे ?
Landeed हे एक अतिशय उपयोगी ॲप आहे जे जमिनीच्या मालकीचे दस्तऐवज आणि जमिनीशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी वापरले जाते. हे ॲप भारतीय नागरिकांना त्यांच्या मालकीच्या जमिनीचे गट आणि सर्व्हे नंबर , मालकीचे तपशील आणि जमिनीचे रेकॉर्ड तपासण्याची सुविधा देते. Landeed ॲप वापरून वापरकर्ते त्यांच्या जमिनीच्या कायदेशीर स्थितीची खात्री करू शकतात आणि कोणत्याही जमिनीशी संबंधित वादांचे निराकरण करू शकतात.
हे ॲप भारतातील विविध राज्यांच्या सरकारी रेकॉर्ड एकत्रित करून बनविले आहे, त्यामुळे त्या त्या राज्यातील नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या मालकीचे दस्तऐवज त्वरित उपलब्ध होतात. यामुळे जमिनीच्या व्यवहारांना अधिक पारदर्शकता मिळते आणि जमिनीशी संबंधित फसवणुकीचे प्रमाण कमी होते. तसेच वारंवार तलाठी कार्यालय किंवा अभिलेख कार्यलयांना घिरट्या माराव्या लागत नाहीत.
Landeed ॲप वापरणे सोपे आहे आणि हे ॲप मोबाईलवरून सहज चालवता येते. त्यामुळे जमिनीशी संबंधित कोणत्याही माहितीचा शोध घेण्यासाठी सामान्य शेतकर्यांच्यासाठी एक उपयोगी साधन आहे. हे ॲप Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्म वर उपलब्ध असल्याने कोणीही या ॲप चा वापर करू शकतो.
Landeed ॲप डाऊनलोड
Landeed ॲप वापरून Land Records बद्दल खालील माहिती मिळवता येते.
- मालक आणि शेती करणाऱ्याचे नाव
- जमीन सर्वेक्षण क्रमांक
- जमिनीचा आकार
- जमिनीचा प्रकार- बागायत अथवा जिरायत
- जमिनीवर पेरलेली पिके
- ओढे, पडीक आणि रस्ते यासारख्या जमिनीवरील नोंदी
- सरकारी संस्था, बँकांनी जमीन मालकाला दिलेले कर्ज
- कर्जाचे कारण म्हणजे बियाणे, कीटकनाशके आणि खतांची खरेदी
हा दस्तऐवज बॉम्बे जमीन मागणी कायदा, 1948 पासून कायदेशीर मान्यता मिळाली आहे . शासनाचा महसूल विभाग जमिनीशी संबंधित सर्व नोंदी ठेवतो. तथापि, खरेदीदारांनी हे लक्षात ठेवावे की दस्तऐवज केवळ कर आणि ताबा माहितीसाठी रेकॉर्ड म्हणून वापरला जाऊ शकतो. परंतु कोणत्याही प्रकारे मालमत्तेचे शीर्षक हस्तांतरित करण्यासाठी वापरता येत नाही.
Landeed ॲप वरून सातबारा कसा डाऊनलोड करायचा
- Landeed ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करायचे आहे .क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव व मोबाईल नंबर टाकून सबमिट करायचे आहे.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन बटनावरती क्लिक करा. तुमचा मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचे राज्य निवडायचे आहे.
- महाराष्ट्र पर्याय निवडल्यानंतर ‘Saatbara 7/12’ असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला Village/Division या पर्यायांमध्ये तुमचे गाव निवडायचे आहे.
- तुम्ही तुमचे गाव सिलेक्ट केल्यानंतर Survey No./Gat No./Plot No. या पर्यायामध्ये तुमचा गट नंबर किंवा सर्व्हे नंबर प्रविष्टि करायचा आहे .
- गट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा उतारा डाऊनलोड करण्यासाठी १०० रुपये ऑनलाइन पेमेंट करावे लागेल. Landeed ॲप वरून पहिला ७/१२ मोफत मिळत असल्याने पहिल्या सातबाऱ्यासाठी कोणतेही पेमेंट आवश्यक नाही.
- तुमच्या Landeed खात्यातून Payment वजा झाल्यानंतर तुमचा सातबारा PDF स्वरूपात डाउनलोड होईल.
7/12, 8A डाउनलोड करण्यासाठी पेमेंट
- Landeed ॲप डिजिटल स्वाक्षरी केलेले 7/12, 8A, ई फेरफार, भूनकाशा, Property Card यासारखे दस्तऐवज (Land Records) डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावे लागेल.
- ॲपमधील Order या सेक्शन मध्ये Payment चे पर्याय उपलब्ध आहेत.
- या ॲपवर कागदपत्रे मिळवण्यासाठी काही Subscription प्लॅन उपलब्ध आहेत ते असे
- 1 कागदपत्रासाठी 100 रुपये
- 50 कागदपत्रांसाठी ९९९ रुपये
- 100 कागदपत्रांसाठी १७९९ रुपये
- ५ कागदपत्रांसाठी २९९ रुपये
तुम्हाला फक्त एकच कागदपत्र डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही UPI किंवा Debit Card वापरून 100 रुपये Payment करू शकता. जास्त कागदपत्रे मिळवायची असल्यास एक प्लॅन निवडून त्याचे payment करा . एकदा पेमेंट केले कि कोणतेही सबस्क्रिपशन प्लॅन्स 1 वर्षासाठी वापरता येतात. Payment झाल्यानंतर एका क्लीकमध्ये तुम्ही जमिनीची कागदपत्रे डाउनलोड करू शकता.
वरील प्रक्रियेचा अवलंब करून Landeed ॲप वापरून शेतकरी किंवा सामान्य नागरिक डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 डाउनलोड करू शकतात. हे एक खासगी ॲप असल्याने यावर कागदपत्रे काढण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतात. तुम्हाला जर फक्त 15 रुपयात 7/12 उतारा काढायचा असल्यास Digital 7/12 पोर्टल किंवा Umang ॲप चा वापर करा. जर तुम्ही अधिक पैसे देऊ शकत असाल तर एका पेक्षा जास्त ७/१२ उतारा सोप्या पद्धतीने डाउनलोड करण्यासाठी Landeed ॲप चा वापर करू शकता.