Umang ॲप वापरून Digital 7/12 उतारा काढा

सध्या कोणत्याही क्षेत्रात पाहिले तर ऑनलाइन पद्धतीने बरेच काम केले जाते. तसेच बँकिंग, शैक्षणिक, शेती व उद्योगधंदे आणि इतर सर्व व्यवसायांमध्ये देखील आधुनिक ऑनलाइन सुविधा वापरली जाते. आज आपण ऑनलाइन पद्धतीने Umang हे ॲप वापरून डिजिटल स्वरूपात 7/12 कसा मिळवायचा ते पाहणार आहोत.

भारत सरकारने नागरिकांच्या सुविधेसाठी उमंग (Umang) हे ॲप लॉन्च केले आहे. या ॲपच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारच्या योजना कागदपत्रे इत्यादी माहिती मिळवणे अत्यंत सोपे झाले आहे.

7/12 उतारा हा शेती संबंधित खूप महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून सातबारा कसा डाऊनलोड करायचा आहे पाहिले. आज आपण पाहूया की उमंग मोबाईल एप्लीकेशन वरून सातबारा कसा डाऊनलोड करायचा?

सात-बारा उतारे डिजिटल स्वाक्षरीत काढण्यासाठी केंद्र सरकारने उमंग ॲप विकसित केले आहे. हे ॲप वापरण्यास अत्यंत सोपे व सहज शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्याची गैरसोय दूर होईल.

7/12 Download On Umang App

जर आपल्याला सातबारा हवा असेल तर आपल्याला आपल्या गावातील तलाठी कार्यालयामधून सातबारा काढून घ्यावा लागतो. त्यासाठी आपल्याला आपल्या गावचा तलाठी हा तलाठी कार्यालयात उपस्थित असणे गरजेचे असते, त्याच्या सहीनेच आपल्याला आपला सातबारा उतारा मिळतो. किंवा जर आपण  महा – ई केंद्राचा आधार घेऊन सातबारा काढायचे म्हटले तर सर्व्हर डाऊन अथवा गर्दी अशा बऱ्याच अडचणी असतात. 

महा-ई-सेवा केंद्र आपल्या वेळेमध्ये उघडे नसते. त्यामुळे आपल्याला कधीही केव्हाही सातबारा डाऊनलोड करण्यासाठी केंद्र सरकारने उमंग हे ॲप विकसित केले आहे. Umang App वापरून 7/12 पोर्टल प्रमाणेच फक्त पंधरा रुपयांमध्ये आपल्याला उतारा मिळतो त्यामुळे शेतकऱ्याची गैरसोय होत नाही.

उमंग ॲप वरुन सातबारा कसा डाऊनलोड करावा.

शासनाकडूनच्या नवीन सुविधा वापरून जर तुम्हाला उमंग ॲपवरून तुमच्या शेतजमिनीचा सातबारा डाऊनलोड करायचा असेल, तर तुम्हाला खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी लागेल.

  • गुगल प्ले स्टोअर मध्ये Umang असे Search करा किंवा खालील दिलेल्या लिंक वरून गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाऊनलोड करा .👇 https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.umang.negd.g2c
  • ॲप डाऊनलोड केल्यानंतर उमंग ॲप उघडा.
  • त्यानंतर तुम्ही जर नवीन युजर असाल, तर त्याठिकाणी तुमची नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी करताना तुमचा मोबाईल क्रमांक, नाव इत्यादी माहिती टाकावी लागेल, त्यानंतर तुमचा युजर आयडी, पासवर्ड म्हणजेच लॉगिन तयार होईल.
  • सर्व प्रक्रिया पूर्ण करून लॉगिन केल्यानंतर तुमच्या डॅशबोर्डला Services हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला सर्व प्रकारची कागदपत्रे त्याच बरोबर डिजिटल स्वाक्षरी असलेले Land Records पाहण्याचे पर्याय दिसतील.
  • आता तुम्हाला State या पर्यायावर क्लिक करून महाराष्ट्र हे राज्य निवडायचे आहे. येथे तुम्हाला तुमच्या शेतजमिनीचा सातबारा डाऊनलोड (7/12) करण्यासाठीचा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
  • आता सर्वप्रथम तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर तालुका आणि गाव अश्याप्रकारे अनुक्रमे पर्याय निवडा. त्यानंतर आता तुमचा सातबारा क्रमाक किंवा गट नंबर टाका आणि शोधा पर्यायवर क्लिक करा.
  • डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला 15 रु. पेमेंट ऑनलाईन पद्धतीने कराव लागणार आहे, त्यासाठी तुम्ही पहिलेच तुमच्या उमंग ॲपच्या वॉलेटमध्ये रक्कम जमा करून ठेवू शकता.

अशा पद्धतीने उमंग ॲपच्या माध्यमातून तुम्ही फक्त 05 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर तुमच्या शेतजमिनीचा सातबारा डाउनलोड करू शकता. सातबारा डिजिटल स्वरूपातील असल्यामुळे या सातबाऱ्यावर कोणत्याही अधिकाऱ्याची सही अथवा शिक्याची आवश्यकता भासत नाही, त्याचप्रमाणे हा सातबारा शेतकरी कोणत्याही शासकीय कामासाठी वापरू शकतात.

फक्त 15/- रुपये चार्जेस मध्ये 7/12

सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला फक्त पंधरा रुपये चार्जेस लागणार आहेत या पोर्टलनुसार तुम्ही कोणताही उत्तर डाऊनलोड करण्यासाठी एवढेच शुल्क आकारले जाते मात्र कित्येक वेळा माही सेवा केंद्रात किंवा खाजगी इंटरनेट कॅफेत झेरॉक्स सेंटर मध्ये आपले चार्जेस पंधरा रुपयांपेक्षा जास्त घेतले जातात व प्रत्येक वेळी आपल्याला हे चार्जेस द्यावे लागतात. तसंच प्रत्येक वेळी कुठे उतारा पाठवायचा झाल्यास पैसे खर्च करून पुन्हा पुन्हा उतारा काढावा लागत होता. मात्र, आता फोनवर डाऊनलोड करता येत असल्यामुळे, नागरिकांना एकदाच खर्च करावा लागणार आहे.

राज्यातील दीड ते दोन लाख नागरिक दररोज महाभूमी पोर्टलचा वापर करतात. आतापर्यंत या पोर्टलवरून सातबारा उतारे, फेरफार, खाते उतारे, मिळकत पत्रिका असे सुमारे साडेपाच कोटी नमुने डाऊनलोड करण्यात आले आहेत. यातून राज्य सरकारला कोट्यवधींचा महसूल मिळाला आहे. हेच ॲप वापरून Digital 7/12 Verify ही करता येतो.

उमंग ॲपचे फायदे

  • Umang ॲप द्वारे सर्व प्रकारचे Land Records जसे की 7/12, 8अ, इ फेरफार इत्यादी कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळवता येतात.
  • d4d6Umang वॉलेट वर पैसे भरून, हे पैसे कधीही कोणताही 7/12 किंवा इतर कागदपत्रे मिळवणे साठी वापरता येतात.
  • अपवरूनच सातबारा वरील डॉक्युमेंट आयडी वरून त्याची अचूकता पडताळणी करता येईल.
  • वारंवार लॉगिन करण्याची आवश्यकता नाही, एकदा अकाउंट बनवून कितीही सातबारा उतारे काढण्याची सुलभ सुविधा

Umang ॲप मधून डाऊनलोड केलेल्या सातबारा वर स्वाक्षरी आवश्यक आहे का?

Umang ॲप च्या माध्यमातून नागरिकांना Digital स्वाक्षरीयुक्त 7/12 उतारा दिला जातो. या 7/12 वर नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर कामासाठी यावर कोणाचीही स्वाक्षरी किंवा शिक्क्याची आवश्यकता नाही.

Umang ॲप वरून 7/12 उतारा कसा शोधावा?

उमंग ॲपमधून 7/12 शोधण्यासाठी सर्वप्रथम ‘Download 7/12 Land Record’ Aapale Sarkar या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर अनुक्रमे तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. यानंतर तुम्हाला तुमच्या सातबाऱ्याचा Survey Number टाकायचा आहे आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

एक सातबारा उतारा डाउनलोड करण्यासाठी किती रुपये शुल्क भरावे लागते?

7/12 उतारा डाउनलोड करण्याचे शुल्क Umang ॲप आणि Digital 7/12 दोन्ही ठिकाणी समानच आहे. फक्त १५रुपये प्रति सातबारा इतके शुल्क भरून डिजिटल स्वाक्षरी असलेला उतारा डाउनलोड करता येतो.

Leave a Comment