MahaBhunakasha जमिनीचा नकाशा करा सोप्या पद्धतीने Download

जमिनीचा नकाशा Bhunakasha हा एक असा महत्त्वाचा दस्तऐवज आहे की ज्याद्वारे आपण जमिनीची मालकी, जमिनीचा आकार, जमिनीचा सीमा आणि इतर जमिनी बद्दलची महत्त्वाची माहिती सांगतो. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीकडे किंवा कुटुंबाकडे स्वतःच्या जमिनीचा किंवा इतर कोणत्याही मालमत्तेचा नकाशा Land Record हा असणे खूपच महत्त्वाचे आहे.जमिनीचा नकाशा म्हणजे एक प्रकारे बोलका दस्तऐवजच म्हणले तरी वावगे ठरणार नाही.

जमिनीच्या संदर्भातील कोणतेही व्यवहार त्याचबरोबर मालमत्ता कर आकारणी जमिनीचे वाद विवाद सोडवण्यासाठी आणि बांधकाम परवानगी मिळवण्यासाठी जमिनीचा नकाशा Land Map हा खूपच महत्त्वाचा दस्तऐवज आहे.

त्यामुळे आपण सदरच्या लेखांमध्ये जमिनीच्या नकाशा डाऊनलोड कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत,त्यापूर्वी आपण जमिनीच्या नकाशा संदर्भात आणखीन काही महत्त्वाची माहिती पाहूया.

Maharashtra Map Bhunakasha

Uses of Bhunakaha जमिनीचा नकाशा वापरण्याचे महत्त्वाचे फायदे

१. जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करणे: एखाद्याच्या जमिनीचा नकाशा हा त्याचा जमिनीवरील मालकी हक्क सिद्ध करण्याचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून खूपच महत्त्वाचा दस्तऐवज आहे.

२. जमिनीबाबतचे विवाद सोडवण्यासाठी: एखाद्या जमिनीच्या सीमा आणि मालकीबाबत काही वाद निर्माण झाल्यास जमिनीचा नकाशा हा त्या वादाचे निराकरण करण्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे.

३. मालमत्तेवरील कर आकारण्यासाठी: जमिनीच्या नकाशाद्वारे जमिनीचे क्षेत्रफळ निश्चित होते त्यामुळे त्या जमिनीवरील मालमत्ता कर आकारण्यासाठी नकाशांचा वापर केला जातो.

४. बांधकाम परवानगी मिळवण्यासाठी: जमिनीवर एखादे बांधकाम करण्यासाठी परवानगी आवश्यक असते ती परवानगी मिळवण्यासाठी जमिनीचा नकाशा महत्त्वाचा आहे.

५. जमिनीचे व्यवहार करण्यासाठी: जमिनीची खरेदी,विक्री किंवा जमीन गहाण ठेवताना त्याचबरोबर इतर कोणत्याही जमीन विषयक व्यवहारांसाठी जमिनीचा नकाशा आवश्यक असतो.

वरील महत्वाच्या कामांसाठी किंवा व्यवहारांसाठी जमिनीच्या नकाशाचा खूपच मोठा प्रमाणावर फायदा होतो.

भू नकाशांचे प्रकार

१. सातबारा: सातबारा हा जमिनीच्या नकाशा पैकी सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून पाहिला जातो या दस्तऐवजात जमिनीचा मालक जमिनीचे क्षेत्रफळ ,जमिनीचे प्रकार आणि इतर महत्त्वाचे तपशील दर्शवलेले असतात.

२. गट नकाशा: गट नकाशा हा जमिनीच्या सर्व भागांचा एकत्रित पणे दर्शवलेला नकाशा असतो,ज्यामध्ये जमिनीच्या प्रत्येक भागाचा नंबर आणि क्षेत्रफळ दाखवलेले असते.

३. पोर्तला नकाशा: हा नकाशा जमिनीचा पारंपारिक नकाशा आहे जो की,जमिनीची सीमा आणि आसपासच्या जमिनी दर्शवतो.

४. सीमा नकाशा: सीमा नकाशा हा जमिनीच्या सीमा अधिक अचूकपणे किंवा तंतोतंत दर्शवणारा नकाशा आहे.

अशा पद्धतीने जमिनीच्या नकाशांचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात.

Maha Bhunakasha Download जमिनीचा नकाशा डाऊनलोड करण्याची प्रोसेस

महाराष्ट्रातील जमिनीचा नकाशा डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपणास महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख Mahabhumi विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन जमिनीचा नकाशा कसा डाऊनलोड करायचा हे आपण स्टेप बाय स्टेप पद्धतीने पाहू

१. सर्वप्रथम आपणाला भूमि अभिलेख विभागाच्या वेबसाईट उघडावी लागेल. https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in

Bhu Nakasha Portal

२. त्यानंतर ‘भू नकाशा’ या पर्यायावर क्लिक करा.

३. तुमचे राज्य,जिल्हा,तालुका आणि गाव निवडा.

४. त्यानंतर तुमच्या जमिनीचा गट नंबर टाकून सर्च या बटणावर क्लिक करा.

५. सर्च या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा स्क्रीनवर दिसेल.

Select District Taluka And Village

७. त्यानंतर Download या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या जमिनीचा नकाशा PDF स्वरूपात Save करून ठेवा.

अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा Download करू शकता. पण जमिनीचा नकाशा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जमिनीचा सातबारा नोंदणी क्रमांक माहीत असणे खूपच गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा मराठी किंवा इंग्रजी भाषेत Download करू शकता.

जमिनीचा नकाशा मिळवण्यासाठीचे इतर पर्याय

Offline Bhunakasha ऑफलाईन भूनकाशा

  • तुम्हाला जर तुमच्या जमिनीचा नकाशा Download करणे शक्य नसल्यास तुम्ही तुमच्या नजीकच्या महसूल कार्यालयात जाऊन तुमच्या जमिनीचा नकाशा मिळवू शकता.
  • परंतु भूमी अभिलेख किंवा महसूल कार्यालयात तात्काळ bhunakasha मिळत नाही
  • तुम्ही शासनाच्या इतर वेबसाईटचा वापर करून देखील तुमच्या जमिनीचा नकाशा मिळवू शकता.👇 https://sic.maharashtra.gov.in

अँप चा वापर करून भूनकाशा Mahabunakasha Apps

  • महाराष्ट्रातील कोणत्याही जमिनीचा मोबाइल ॲप वापरून नकाशा डाउनलोड करणे सहज शक्य आहे.
  • Landeed हे ॲप वापरून १०० रुपयात महाराष्ट्रातील भूनकाशा काढता येतो.
  • Landeed ॲप मध्ये महाराष्ट्र राज्य निवडून bhunakasha हा पर्याय निवडा
  • त्यानंतर Village/Division पर्यायात तुमचे गाव आणि Surve Number पर्यायात जमिनीचा सर्व्हे क्रमांक टाका.
  • त्यानंतर डेबिट कार्ड किंवा UPI वापरून तुमचा Bhunakasha डाउनलोड करा
Landeed Bhunakasha Screenshot

जमिनीचा नकाशा हा दोन्ही पद्धतीने मिळवता यतो जी पद्धत आपणास योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही नकाशा मिळवू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही जमिनीचा नकाशा वापरून तुमच्या जमिनीची मोजणी त्याचबरोबर हद्द निश्चित करणे आणि जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करणे यासारखी अनेक महत्त्वाची कामे नकाशाद्वारे होऊ शकतात म्हणून जमिनीच्या संदर्भात कोणत्याही कामासाठी नकाशा Bhunakasha हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.

भूनकाशा Bhunakasha काय आहे?

भूनकाशा हा महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला उपक्रम आहे ज्याद्वारे महाराष्ट्रातील कोणत्याही गावातील जमिनीचा नकाशा पाहता येतो. या भूनकाशात जमिनीची मालकी, क्षेत्र आणि प्रमुख गावरस्ते इत्यादी माहिती नमूद असते.

भूनकाशा पाहण्यासाठी काय करावे लागते?

भूनकाशा पोर्टल वरून भूनकाशा पाहणे खूप सोपे आहे. कोणतेही खाते न काढता फक्त जिव्हा, तालुका आणि गाव निवडून भूनकाशा पाहता येतो.

Online Bhunakasha कोणत्याही कायदेशीर किंवा शासकीय कामासाठी वापरात येतो?

भूनकाशावरील नकाशे नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या भूनकाशाचा कोणत्याही शासकीय किंवा कायदेशीर कामासाठी वापर करता येणार नाही.

ऑफलाईन पद्धतीने भूनकाश्या काढण्यासाठी काय करावे लागेल?

जर तुम्हाला कायदेशीर कामासाठी भूनकाशा आवश्यक असेल तर तुम्ही शुल्क भरून तुमच्या तालुक्याच्या भूमी अभिलेख Land Records कार्यालयात अर्ज करू शकता. तुम्हाला 7 ते 15 दिवसात तुमच्या जमिनीचा भूनकाशा मिळेल.

Leave a Comment