7/12 Pik Nondani | 7/12 उताऱ्यावर पीक नोंदणी कशी करायची?



महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपल्या 7/12 उताऱ्यावर पीक नोंदणी ची सुविधा देण्यात आलेली आहे. या  सुविधेमुळे शेतकरी  पिकांच्या नोंदी आणि पड क्षेत्राच्या नोंदी ऑनलाइन पद्धतीने करू शकतात.

आपल्या देशामध्ये शेती ही प्रामुख्याने दोन हंगामामध्ये केली जाते. एक आहे खरीप हंगाम आणि दुसरा म्हणजे रब्बी हंगाम या दोन हंगामामधील पिके ही प्रामुख्याने वेगवेगळी असतात. खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने मका, सोयाबीन आणि कडधान्ये यासारखी प्रामुख्याने पिके घेतली जातात. तर रब्बी हंगामामध्ये ज्वारी, हरभरा, गहू यासारखी पिके घेतली जातात. यातूनच शेतकऱ्याला वर्षभरासाठी अन्नधान्याची व कडधान्याची स्वतःसाठी तजवीज होत असते. त्याचबरोबर उत्पादन जास्त झाले तर तो ते अन्नधान्य बाजारपेठेमध्ये विक्री करून चार पैसेही कमवत असतो.

E pik nondani app screenshot
E Pik Nondani

पीक नोंदणी का उपयोगाची आहे

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये केलेल्या पिकांची नोंदणी करणे आवश्यक केले आहे. पीक नोंदणी करणे हे शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे, कारण आजच्या परिस्थितीला जे काही अवकाळी संकटे येत आहेत आणि त्यातून शेतकऱ्यांचे जे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे हे पाहूनच पीक नोंदणी करणे खूपच महत्त्वाचे आहे. जर शेतकऱ्याचे पीक नोंद असेल तर तो या संकटावर मात करू शकतो. म्हणजे तो सरकारच्या ज्या काही नुकसान भरपाई असतात किंवा पीक विमा यासाठी तो पात्र ठरतो. त्याचबरोबर शेतकरी हा पीक कर्ज मिळवण्यासाठी ही पीक नोंदणी करून पात्र ठरू शकतो. म्हणूनच पीक नोंद करणे हे खूपच महत्त्वाचे आहे.

राज्य सरकारने पीक पेरणी बाबतची माहिती गाव नमुना क्रमांक १२ मध्ये नोंदवण्यासाठी शेतकऱ्याला स्वतःच्या मोबाईलवर ॲप द्वारा उपलब्ध करून देण्याबाबत ई-पीक पाहणी कार्यक्रम टाटा ट्रस्ट ने विकसित केलेल्या आज्ञावलीचा वापर करून १५ ऑगस्ट २०२१ पासून राबवण्याचा निर्णय घेतला होता. 7/12 सर्वप्रथम यशस्वीरित्या उपयोग पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे.करंजपाडा येथे प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला होता. ई-पीक पाहणी प्रकल्पाची राज्यातील २० तालुक्यामध्ये आयोजित तत्वावर यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली होती.

ऑनलाइन 7/12 पीक नोंदणीचा सर्वप्रथम यशस्वीरित्या उपयोग पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे.करंजपाडा येथे प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला होता. ई-पीक पाहणी प्रकल्पाची राज्यातील २० तालुक्यामध्ये आयोजित तत्वावर यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली होती.

ई पीक पाहणी मुळे शासनाला होणारे फायदे

१. ई-पिक पाहणी द्वारे माहिती तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करून पीक पाहणीची जलद, वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने माहिती गोळा करण्यात येणार आहे. याचा फायदा प्रामुख्याने तलाठ्यांचे काम सोपे होण्यास होणार आहे.

२. या ॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रियल टाईम डेटा उपलब्ध होणार आहे. मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे स्वतःच्या शेतीमधील उभ्या पिकांची माहिती, अक्षांश- रेखांश दर्शवणाऱ्या पिकांच्या छायाचित्रणासह उपलब्ध होऊ शकेल.

३. या ई-पीक पाहणी कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करता सरकारने राज्य विभाग, जिल्हा विभाग आणि तालुका विभाग या स्तरावर समिती गठीत केली आहे.

Advantages for Farmers | पीक नोंदणी चे शेतकऱ्यांना फायदे

  • शेतकऱ्यांना देण्यात येत असणाऱ्या कोणत्याही योजनेच्या थेट लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती या कार्यक्रमांतर्गत अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
  • गाव, तालुका, जिल्हा आणि विभाग निहाय पिकाखालील क्षेत्राची अचूक आकडेवारी याद्वारे सहज उपलब्ध होणार आहे.
  • ठिबक तसेच तुषार सिंचन योजनेसारख्या योजनांचा लाभ देखील खातेधारकांना अचूकपणे देणे शक्य होणार आहे.
  • खातेनिहाय त्याचबरोबर पीकनिहाय क्षेत्रांची यादी सहजरित्या उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्याकडून देण्यात येणारा रोजगार हमी उपकर आणि शिक्षण कर निश्चित करता येईल.
  • खातेदारनिहाय पीक पाहणी मुळे खातेदारनिहाय पीक कर्ज देणे पिक विमा भरणे किंवा पीक नुकसान भरपाई देणे या कार्यक्रमांतर्गत सहज शक्य होणार आहे.
  • या कार्यक्रमांतर्गत कृषी गणना अत्यंत सुलभ पद्धतीने व अचूक रित्या करणे शक्य होईल.

Stages of e peek pahani | ई पीक नोंदणी कशी करावी

  • ई-पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत खातेदाराची एकदाच नोंदणी करण्यात येईल.
  • राज्य सरकारकडून दिलेल्या वेळेपर्यंतच हंगाम निहाय पिकांची माहिती अक्षांश-रेखांश सह काढण्यात आलेल्या पिकांच्या छायाचित्रणासह अपलोड करण्यात येईल.
  • सरकारकडून देण्यात आलेल्या वेळेच्या दरम्यान मोबाईल ॲपमधील माहितीची अचूकता पडताळून आणि आवश्यकतेनुसार ती दुरुस्ती करून तलाठी ती माहिती कायम करतील.
  • खातेनिहाय पिकांची संबंधित माहिती डिजिटल स्वाक्षरी 7/12 मधील गाव नमुना क्रमांक 12 मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.
Select Division to register crops
  • राज्यामध्ये रब्बी हंगामाची सुरुवात ही 1 ऑक्टोंबर पासून होते त्यानुसार शेतकरी 1 ऑक्टोबर पासून रब्बी हंगामाची पिक पाहणी अपलोड करू शकतात.
  • शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपला विभाग निवडायचा आहे, त्यानंतर अनुक्रमे तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडायचे आहे.
Select District Taluka And Village
  • त्यानंतर गट नंबर किंवा नाव  टाकून आपले खाते शोधायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतातील सर्व पिकांची नोंदणी क्रमाने करायची आहे
Find Your Plot
  • एका मोबाईल वरून फक्त 20 खातेदारांची नोंदणी करता येते त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याकडे स्वतःचा मोबाईल नसल्यास दुसऱ्या कोणाच्याही मोबाईल वरून पीक पाहणी नोंद अपलोड करता येईल.
  • जर खातेदार अल्पवयीन असेल तर त्याच्या बाबतीत त्याचे पालक त्याची पीक पाहणी नोंद करू शकतात.
  • सामायिक खातेदार त्यांच्या वहिवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे पीक पाहणी नोंद करू शकतात.

ई पीक पाहणी ॲप | E-Peek Pahani App

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधा आणि योजनांचा लाभ घेणे या योजनेअंतर्गत शक्य होणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेत सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. हा कार्यक्रम पारदर्शक असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यामध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला आहे त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर पारदर्शकता दिसून आली आहे.

या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या ई-पीक पाहणी प्रणालीची माहिती सविस्तरपणे घेतल्यास येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी खूपच उपयुक्त ठरू शकेल. शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणीद्वारे नमूद केलेली पिके त्यांच्या Digital 7/12 वर नमूद केली जातील.

Download E-Peek pahani App

पीक पेरणीची किंवा पीक नोंदणी ची माहिती मोबाईल ॲपद्वारे गाव नमुना क्रमांक १२ मध्ये नोंदवण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी ई-पिक पाहणी कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबवण्याच्या अनुषंगाने क्षेत्रीय महसुल अधिकारी यांना याबाबत दिशा निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Comment