जमिनीचा नकाशा कसा पाहायचा | सर्वे नंबर/गट नंबर नकाशा | download land map Maharashtra

जमीन हा विषय राज्य शासनाच्या आखत्यारित येत असलेला विषय आहे. म्हणूनच जमिनीविषयक कोणतेही दस्तऐवज हे शासनाकडे अगदी सुरक्षितपणे जतन करून ठेवलेले असतात. त्यामुळे आपण आज जमिनीच्या नकाशा कसा पाहायचा आणि इतर महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सविस्तरपणे पाहणार आहोत.

जमिनीच्या नकाशाचे महत्त्व

जमिनीचा नकाशा हा एक खूपच महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ज्या द्वारे आपणास एखाद्या विशिष्ट भूभागाचे चित्रण त्याच्या प्रमाणानुसार आणि पारंपारिक चिन्हे आणि रंगाचा वापर करून केलेले असते. जमिनीच्या नकाशाचे अनेक फायदे आहेत ते खालील प्रमाणे.

  • जमिनीचा नकाशा हा जमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा पुरावा म्हणून खूपच महत्त्वाचा आहे. जमीन विषयक वाद टाळण्यासाठी हा खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
  • नकाशा हा जमिनीच्या सीमा स्पष्टपणे दर्शवतो. त्याचबरोबर अतिक्रमण आणि मालकी हक्काच्या इतर वादांना आळा घालण्यास मदत करतो.
  • जमिनीचा नकाशा हा शहरी भागातील नियोजन, पायाभूत सुविधांचा विकास आणि कृषी व्यवस्थापन यासारख्या विविध हेतूंसाठी जमिनीचा वापर कसा केला पाहिजे, यासाठी जमिनीच्या नकाशाचा वापर केला जातो.
  • जमिनीच्या नकाशाद्वारे नियोजन करणारा आणि धोरण निर्माता हे सुमित करू शकतात की जमीन योग्यरित्या वापरली जात आहे की नाही आणि पर्यावरणीय दृष्ट्या टिकाऊ आहे.
  • जमिनीचा नकाशा हा जंगले, पाणी आणि खनिजे यासारख्या नैसर्गिक संसाधनाचे अचूक स्थान आणि वितरण दर्शवण्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहे.
  • पूर आणि जंगलातील आग यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या संभाव्यतेचा अंदाज लावण्यासाठी आणि त्या आपत्तीच्या व्यवस्थापन करण्यासाठी जमिनीचा नकाशा वापरला जातो.
  • भूस्खलन आणि पूर प्रवण क्षेत्र यासारख्या जोखीम किंवा अति संवेदनशील भागांची ओळख करण्यासाठी नकाशांचा वापर केला जातो.
  • शिक्षण क्षेत्रात नकाशांना एक वेगळेच स्थान आहे ज्याद्वारे आपण विद्यार्थ्यांना जगातील कोणत्याही देशाची किंवा ठिकाणांची माहिती ही नकाशाद्वारे देऊ शकतो.
  • संशोधन क्षेत्रातील नकाशे महत्त्वाची भूमिका बजावतात संशोधन क्षेत्र हे नकाशाविना काहीच करू शकत नाही त्यामध्ये जमिनीच्या वापरातील बदल, हवामान बदल आणि इतर पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी जमिनीचे नकाशे खूप महत्त्वाचे आहेत.
  • पर्यटन क्षेत्रातील नकाशांचे महत्त्व आहे कारण नकाशाद्वारे आपण अनेक वेगवेगळ्या भागांचा अभ्यास करून त्या ठिकाणांना भेटी देऊ शकतो.

सातबारा गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?

सातबारा नंबर किंवा गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पण दोन पद्धतीने पाहू शकतो.

१. महाराष्ट्र राज्य महाभूमी अभिलेखागार आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे वेब पोर्टल

  • सर्वप्रथम आपणाला महाराष्ट्र राज्य महाभूमी अभिलेखागार त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.👇https://mahabhumi.gov.in/
  • या वेबसाईटवर जाऊन भूखंड नकाशा किंवा ई नकाशा या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर नवीन पेज उघडेल तेथे शेतजमिनीचा नकाशा पाहण्यासाठी तुम्हाला Category पर्यायांमध्ये Rural हा पर्याय निवडावा लागेल.
  • तुमचा जिल्हा निवडा, नंतर अनुक्रमे तालुका आणि गाव निवडा.
  • त्यानंतर सर्व्हे नंबर किंवा गट क्रमांक टाकून Show या बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा स्क्रीनवर दिसेल.
  • नकाशा स्क्रीनवर दिसल्यानंतर तुम्ही हा नकाशा डाऊनलोड करू शकता किंवा प्रिंट करून घेऊ शकता, त्याचबरोबर झूम इन आणि आउट करू शकता.
  • याच ठिकाणी तुम्ही तुमच्या गावचा संपूर्ण नकाशा, गावातील प्रमुख रस्ते आणि शेतरस्ते इत्यादी माहिती पाहू शकता.
  • त्यानंतर तुम्हाला Plot Report या पर्यायावर क्लिक करायचे आहे. येथे जमिनीचा Scale वरील नकाशा पाहून PDF डाउनलोड करू शकता.

२. महाराष्ट्र भूमी अभिलेख मोबाईल ॲप

  • तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर महाराष्ट्र भूमी अभिलेख ॲप डाऊनलोड आणि इन्स्टॉल करा.
  • ॲप उघडल्यानंतर भूखंड नकाशा यावर क्लिक करा.
  • जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
  • गट क्रमांक टाकून Show या बटणावर क्लिक करा.
  • तुमच्या जमिनीचा नकाशा तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल.
  • त्यानंतर जर तुम्हाला हा नकाशा डाऊनलोड करायचा असेल तर डाऊनलोड करू शकता, प्रिंट ही काढू शकता किंवा झूम इन आणि आऊट सुद्धा करू शकता.

याशिवाय तुम्ही खालील ३ पर्यायाद्वारे देखील तुमचा जमिनीचा नकाशा तुम्ही पाहू शकता

१. तुमच्या जिल्ह्यातील महसूल कार्यालयातून तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा पाहू शकता.

२. तुमच्या गावातील गाव कामगार तलाठी कार्यालयातून तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा पाहू शकता.

३. तुम्हाला जर तुमच्या जमिनीचा एक प्रामाणिक नकाशा तयार करायचा असेल तर तुम्ही खाजगी सर्वेक्षणकर्ता नियुक्त करू शकता.

नकाशा पाहण्यासाठीचे शुल्क

नकाशा पाहण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये एक तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तर दुसरी म्हणजे ऑफलाइन पद्धतीने नकाशा पाहू शकता. यापैकी Online नकाशा मोफत आहे तर ऑफलाईन नकाशा पाहण्यासाठी शुल्क भरावे लागेल.

ऑफलाइन नकाशा शुल्क

जिल्ह्याच्या महसूल कार्यालयातून तुम्हाला नकाशा पाहण्यासाठी साधारणपणे १०० ते ५०० रुपये पर्यंत शुल्क आकारले जाऊ शकते. हे शुल्क प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि नकाशाच्या आकारानुसार बदलू शकते.

गाव कामगार तलाठी कार्यालयातून नकाशा पाहण्यासाठी सर्वसाधारणपणे तुमच्याकडून ५० ते २०० रुपये पर्यंत शुल्क आकारले जाते.

खाजगी सर्वेक्षणकर्त्याच्या माध्यमातून तुम्हाला नकाशा पाहण्यासाठी ५०० ते ५००० रुपयापर्यंतचे शुल्क आकारले जाऊ शकते. हे शुल्क त्या नकाशाच्या आकारावर आणि जटिलतेवर ठरलेले असते.

ऑनलाइन नकाशे हे विनामूल्य उपलब्ध असल्याने ते पाहणे सर्वांसाठी स्वस्त आणि सोयीस्कर आहे. जर तुम्हाला नकाशाच्या प्रति हव्या असतील तर तुम्ही महसूल कार्यालय किंवा तलाठी कार्यालयातून त्या संबंधित शुल्क देऊन प्राप्त करून घेऊ शकता.

भूमी अभिलेख कार्यालयातून नकाशा कसा काढायचा?

भूमी अभिलेख कार्यालयातून नकाशा काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आवश्यक कागदपत्रे माहीत असणे गरजेचे आहे. ती खालील प्रमाणे

कागदपत्रे

१. ७/१२ उतारा

२. जमिनीचा खाजगी नकाशा (उपलब्ध असेल तर)

३. ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र,ड्रायव्हिंग लायसन्स)

४. पासपोर्ट साईज आकाराचा फोटो

अर्जाची प्रक्रिया

  • तुम्हाला नकाशा संबंधित अर्ज करण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयाला भेट द्यावी लागेल.
  • नकाशा काढण्यासाठी चा अर्ज घेऊन त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरून द्या.
  • आवश्यक कागदपत्रे आणि नकाशासाठी जे काही शुल्क आकारले जाते ते जमा करा. (सर्वसाधारणपणे शुल्क हे ५ ते ५० रुपये पर्यंत असते)
  • सदर अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नकाशा मिळवण्यासाठी एका विशिष्ट तारखेला बोलावले जाईल त्यावेळी तुम्ही परत भूमी अभिलेख कार्यालयाला भेट द्या.

तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन देखील पाहू शकता किंवा प्रिंट ही करू शकता. त्यासाठी तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन.👉 https://mahabhumi.gov.in/ तुम्ही अगदी निशुल्कपणे नकाशा पाहू शकता.

NA प्लॉटचा नकाशा कसा पाहायचा?

NA प्लॉटचा नकाशा आपण दोन पद्धतीने पाहू शकतो.

१. महाराष्ट्र राज्य महाभूमी अभिलेखागार आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे वेब पोर्टल

  • https:// mahabhumi.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • या पोर्टल वर जाऊन “भूखंड नकाशा” यावर क्लिक करा.
  • त्यानंतर सर्वप्रथम Category पर्यायांमध्ये Urban हा पर्याय निवडा.
  • तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
  • प्लॉट क्रमांक टाकून Show वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या NA प्लॉटचा नकाशा स्क्रीनवर दिसून येईल.
  • त्यानंतर Scale वरील नकाशा पाहण्यासाठी Plot Report पर्यायावर क्लिक करा. नकाशा तुमच्या प्लॉट चा आहे का हे पाहून PDF स्वरूपात डाउनलोड करा.

ऑनलाइन नकाशे पाहणे हे विनामूल्य असल्याने ते पाहणे सर्वात स्वस्त आणि सोयीस्कर आहे. त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. पण जर तुम्हाला तुमच्या NA प्लॉटच्या नकाशाची प्रमाणिक प्रत आवश्यक असेल तर तुम्हाला महसूल कार्यालयातूनच ती मिळवता येईल.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या महाराष्ट्रातील कोणत्याही जमिनीचा नकाशा किंवा NA प्लॉटचा नकाशा अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने विनामूल्य तर ऑफलाइन पद्धतीने कमी शुल्कात पाहू शकता किंवा मिळवू शकता.

Leave a Comment