Pune 7/12 उतारा | ७/१२ पाहण्यासाठी जिल्हा निवडा पुणे, पुणे जिल्हा सातबारा उतारा.

आपण आजच्या लेखांमध्ये पुणे जिल्ह्यामधील जमीनीचा digital 7/12 आणि संपूर्ण प्रशासकीय माहितीचा आढावा घेणार आहोत. पुणे जिल्ह्यातील ऑनलाइन 7/12, ई फेरफार आणि इतर जमिनीची कागदपत्रे कशी पहावी याची माहिती घेऊया..

पुणे जिल्ह्याविषयी

तसे पाहायला गेले तर पुणे हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे पुण्याला विद्येचे माहेरघर त्याचबरोबर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ही विशेष अशी ओळख आहे. पुण्यामध्ये भारतीय संरक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाची इन्स्टिट्यूट आहेत त्यामुळे ही पुण्याला एक विशेष अशी ओळख आहे. एकूणच पुण्याकडे पहायचे झाले तर पुणे हे एक सर्व गुण संपन्न असा जिल्हा म्हटले तर वावघे ठरणार नाही. पुण्याच्या बाबतीत एक म्हण आहे “पुणे तिथे काय ऊणे” हे पुण्याकडे पाहिल्यानंतर त्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही.

पुणे जिल्हा Digital ७/१२

जिल्हा डिजिटल सातबारा हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचे एक महत्त्वाचे ऑनलाईन पोर्टल आहे. जे की नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित माहिती ऑनलाईन पाहण्याची पाणी मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून देते. ज्यामध्ये नागरिकांना सातबारा उतारा, ८अ उतारा, मालमत्ता पत्रक आणि फेरफार नोंद या महत्त्वाच्या दस्तऐवजांची माहिती उपलब्ध करून दिली जाते.

या ऑनलाइन पोर्टलमुळे नागरिकांना याचे खूपच फायदे झालेले दिसून येतात त्यामध्ये त्यांना घरी बसूनच जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित माहिती मिळवणे सोपे होते. या डिजिटल प्रणालीमुळे भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांना आळा बसला जातो. त्याचबरोबर वेळेची बचतही होते. याचा आणखी एक खूपच महत्त्वाचा फायदा म्हणजे नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत नाही. म्हणजेच कमी शुल्कामध्ये तुम्हाला तुमचा दस्तऐवज मिळून जातो.

Pune District Digital 7/12 | पुणे जिल्हा डिजिटल सातबारा

७/१२ पाहण्यासाठी जिल्हा निवडा पुणे

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवर जावे लागेल.👇 https://digitalsatbara. Mahabhumi.gov.in/
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे. (अर्थातच पुणे)
pune digital 7/12 fill details
  • त्यानंतर तुम्ही तुमचा 7/12 जिल्हा निवडा मध्ये पुणे निवडा.
  • त्यानंतर तुमचा तालुका निवडा.
  • त्यानंतर तुमचे गाव निवडा.
  • त्यानंतर तुम्ही तुमचा सातबारा नंबर म्हणजेच गट नंबर टाका.
  • त्यानंतर तुमचा सर्वे क्रमांक टाका.(जर तुम्हाला माहित असेल तर)
digital 7/12 fees
  • नंतर सर्च या बटनावरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा स्क्रीनवर दिसेल.
  • आता तुम्हाला तुमच्या 7/12 उतारा साठी 15 रुपये इतके शुल्क ऑनलाइन भरायचे आहे.
  • शुल्क भरल्यानंतर तुम्ही तुमचा सातबारा उतारा pdf स्वरूपात डाउनलोड करू शकता.

पण तुम्हाला डिजिटल सातबारा वापरण्यासाठी तिच्याकडे तुमचा वैध असलेला ई-मेल आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. डिजिटल स्वरूपातील सातबारा हा तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये मिळू शकतो. तुम्हाला जर डिजिटल स्वाक्षरी स्वरूपात सातबारा हवा असेल तर तुम्ही डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करू शकता.

पुणे जिल्हा मोफत 7/12 | पुणे District Free 7/12

महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित महत्त्वाची माहिती अगदी मोफत मध्ये मिळवण्यासाठी जिल्हा मोफत सातबारा योजना सुरू केली आहे.

या जिल्हा मोफत सातबारा योजनेचे महत्त्वाचे फायदे म्हणजे यामध्ये नागरिकांना सातबारा उतारा आणि इतर महत्त्वाच्या दस्तऐवजांसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. या योजनेमुळे नागरिकांना घरी बसूनच जमिनीच्या मालकी हक्काची माहिती मिळवणे सोपे जाणार आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाही. त्यांच्या वेळेमध्ये बचत होईल. डिजिटल प्रणाली मध्ये मोठ्या प्रमाणावर पारदर्शकता दिसून आली आहे त्यामुळे भ्रष्टाचार आणि इतर गैरव्यवरांना आळा बसेल.

मोफत सातबारा असा पहा

१. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवर जावे लागेल.👇 https://digitalsatbara. Mahabhumi.gov.in

२. त्यानंतर तुम्हाला पुणे विभाग निवडायचा आहे

select pune to view free 7/12

३. त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा निवडा पर्यायात Pune निवडा.

४. त्यानंतर तुमचा तालुका निवडा.

५. त्यानंतर तुमचे गाव निवडा.

६. त्यानंतर तुमचा सातबारा नंबर किंवा गट नंबर टाका.

७. नंतर तुमचा सर्वे क्रमांक जर तुम्हाला माहित असेल तर टाका.

८. नंतर सर्च या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा स्क्रीनवर पाहू शकाल.

९. त्यानंतर तुम्ही तुमचा सातबारा उतारा pdf स्वरूपात डाउनलोड करू शकता.

डिजिटल सातबारा मिळवण्यासाठी किंवा वापरण्यासाठी तुमच्याकडे तुमचा वैध ई-मेल आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. सातबारा उतारा हा तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये मिळू शकतो. तुम्हाला तुमचा सातबारा हा डिजिटल स्वाक्षरी मध्ये हवा असल्यास तो तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड स्वरूपात मिळू शकतो.

पुणे जिल्हा जुने ७/१२ फेरफार / Pune District Archived 7/12 land Records

पुणे जिल्ह्यातील जुने ७/१२ व फेरफार ही ऑनलाईन पाहण्यासाठी तसेच मिळवण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या खालील पोर्टलवरून तुम्ही पुणे जिल्ह्यातील जुने सातबारे उतारे आणि फेरफार ऑनलाइन पाहू शकता.👇 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in

डिजिटल स्वरूपात सातबारे उतारे व फेरफार काढणे हे नागरिकांसाठी खूपच फायदेशीर आहे कारण हे सातबारे उतारे आपणास मोफत त्याचबरोबर पारदर्शक आणि वेळेची बचत करून मिळवता येतात.

पण जुने सातबारा आणि फेरफार उतारे हे मिळवण्यासाठी एक मर्यादा आहे ती म्हणजे १९५५ नंतरचे उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. पण काही जुन्या नोंदी ही स्कॅन केल्या जात आहेत उपलब्ध होतील तेव्हा त्या ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना मिळणे शक्य होईल.

जसे फायदे आहेत तसे काही मर्यादाही आहेत त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे जुने दस्तऐवज पाहण्यासाठी शुल्क आकारले जाऊ शकते. आणि त्याचबरोबर ही प्रक्रिया वेळखाऊ आणि कठीण स्वरूपाची आहे.

महाराष्ट्र राज्य अभिलेखागार, पुणे

तुम्हाला जर जुने सातबारा व फेरफार उतारे प्रत्यक्षात जाऊन पहायचे असतील तर पुणे जिल्ह्यासाठी तुम्ही खालील पत्त्यावर जाऊन मिळू शकतात.

पत्ता: शनिवार वाडा, पुणे ४११००२

पुणे जिल्ह्यातील तालुके आणि गावे

पुणे जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याची प्रशासकीय विभाग म्हणून ही त्याची ओळख आहे. या प्रशासकीय विभागात प्रामुख्याने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.

पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत. तसे पाहायला गेले तर पुणे जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या ही निश्चितपणे सांगणे कठीण आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्रशासन वेळोवेळी नवीन गावांची निर्मिती करत असते त्याचबरोबर काही गावी एकत्रितही केली जातात त्यामुळे पुणे जिल्ह्यातील गावांची संख्या निश्चितपणे सांगणे या कारणामुळेच कठीण आहे.

तरीसुद्धा २०११ च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्यामध्ये अंदाजित गावांची संख्या ही सुमारे १०,००० हून अधिक होती.

पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील गावांची संख्या पुढील प्रमाणे आहे

  • पुणे शहर: ११२
  • मावळ तालुका: २५४
  • मुळशी तालुका: १६२
  • शिरूर तालुका: ३३४
  • बारामती तालुका: ४४२
  • इंदापूर तालुका: ३७६
  • दौंड तालुका: ४०२
  • भोर तालुका:१४८
  • वेल्हे तालुका: ११२
  • खेड तालुका: ४४८
  • पुरंदर तालुका: २४२
  • जुन्नर तालुका: ३२६
  • आंबेगाव तालुका: २३८
  • हवेली तालुका: २२२
  • शिरवळ तालुका: २२०

वरील तालुक्यामधील गावांची संख्या ही अंदाजे आहे यामध्ये शासनाकडून वेळोवेळी बदल केला जाऊ शकतो.

या विषयीच्या अधिक माहितीसाठी आपण पुणे जिल्हा परिषदेच्या या वेबसाईटला भेट देऊ शकता.👇https://www.zppune.org/

त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या माहिती विभागाच्या वेबसाईटला ही तुम्ही भेट देऊ शकता.👉https://www. Maharashtra. gov.in/

वरील पद्धतीने तुम्ही मी जर पुणे जिल्ह्याचे रहिवाशी असाल किंवा तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी केली असेल तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या जमिनी संबंधातील सर्व प्रकारचे रेकॉर्ड पाहू शकता.

Leave a Comment