प्रॉपर्टी कार्ड – Property card मालमत्ता पत्र online

प्रॉपर्टी कार्ड हे आपल्या मालमत्तेचे अधिकृत दस्तऐवज आहे. या कार्डावर आपल्या मालमत्तेची सर्व तपशीलवार माहिती दर्शवलेली असते. जसे की मालमत्तेचा प्रकार, मालमत्तेचे क्षेत्रफळ, मालमत्तेच्या मालकाचे नाव, मालमत्तेचे ठिकाण इ. महाराष्ट्र सरकारने प्रॉपर्टी कार्डबाबत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे ते म्हणजे प्रॉपर्टी कार्ड हे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी आता नागरिकांना सरकारी कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाही. त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्ड आहे घरबसल्या मोबाईलवर ही काढता येऊ शकते अशी सोय सरकारकडून करण्यात आली आहे. प्रॉपर्टी कार्ड कसे काढायचे त्या संबंधित तुमच्याकडून किती फी आकारली जाते याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

Property card म्हणजे नेमके काय आहे?

ज्याप्रमाणे सातबारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली असते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती बिगर शेतजमीन (NA plot) आहे, याबद्दलची सविस्तर माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते.

थोडक्यात सांगायचे झाले तर बिगर शेतजमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते.

Property card काढण्याचे फायदे

ऑनलाइन पद्धतीने प्रॉपर्टी कार्ड काढल्यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही म्हणजेच वेळेची बचत होते. ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड काढणे हे खूपच सोपे असल्यामुळे कोणीही घरबसल्या हे कार्ड काढू शकते. ऑनलाइन मिळणारी माहिती ही पारदर्शक आहे यामध्ये कोणताही प्रकारचा गैरव्यवहार आढळून येत नाही. प्रॉपर्टी कार्ड हे डिजिटल स्वाक्षरी युक्त असल्यामुळे याचा वापर कोणत्याही सरकारी कामांमध्ये होतो.

Property card (प्रॉपर्टी कार्ड) ऑनलाइन पद्धतीने कसे काढायचे?

प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठीची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे

  • सर्वप्रथम प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी आपल्याला महाभूमी या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर नोंदणी करणे आवश्यक आहे. जर आपले खाते नसेल तर आपल्याला प्रथम नोंदणी करून घेणे महत्त्वाचे आहे.
  • नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्याला लॉग इन करावे लागेल.
Digital Property Card
विभाग आणि जिल्हा निवडा
  • यानंतर सर्वप्रथम उपलब्ध पर्यायातून डिजिटल स्वाक्षरीयुक्त मालमत्ता पत्र हा पर्याय निवडावा लागेल
  • त्यानंतर तुम्हाला आपली मालमत्ता शोधण्यासाठी आवश्यक ती माहिती भरावी लागेल.
  • आवश्यक माहिती मध्ये सर्वप्रथम विभाग आणि त्यांनतर जिल्हा निवडावा लागेल.
  • त्यानंतर जिल्ह्यातील तुमचे भूमी अभिलेख कार्यालय निवडावे लागेल.
  • नंतर तुमच्या शहर किंवा गावचे नाव निवडावे लागेल.
Search Property Card and Payment
CTS आणि पेमेंट
  • त्यानंतर सी टी एस (CTS) नंबर टाकावा लागेल.
  • आपली मालमत्ता शोधल्यानंतर आपल्याला ऑनलाइन payment करावे अशी. एक प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला १५ रुपये शुल्क भरावे लागेल.
  • त्यानंतर तुमचे प्रॉपर्टी कार्ड तुम्ही pdf स्वरूपात डाउनलोड करू शकता.

ऑनलाइन पद्धतीने प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असते. त्यामध्ये सर्वप्रथम तुमच्याकडे सातबारा उतारा असणे खूपच आवश्यक आहे, कारण हा उतारा व्यक्तीच्या मालमत्तेची मूलभूत माहिती देतो. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ची पूर्तता करणे ही आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा कायमचा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे कारण SMS द्वारे OTP प्राप्त करण्यासाठी मोबाईल नंबर हा अत्यंत गरजेचा आहे.

प्रॉपर्टी कार्ड मोफत कसे पाहायचे?

तसे पाहायला गेले तर प्रत्यक्षात प्रॉपर्टी कार्ड पूर्णपणे मोफत पाहणे अशक्य आहे. पण महाभुलेख वेबसाईटवर प्रॉपर्टी कार्ड पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागत नाही. प्रॉपर्टी कार्ड मोफत कसे पाहायचे याविषयी स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे.

  • प्रॉपर्टी कार्ड मोफत पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला भूलेख च्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर आपल्याला प्रादेशिक विभाग निवडायचा आहे जसे की पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि इतर..
Select Division
  • यानंतर तुम्ही निवडलेल्या विभागाची वेबसाईट ओपन होईल.. आता तुम्हाला सर्वात आधी 3 पर्यायातील ‘मालमत्ता पत्र’ हा पर्याय निवडावा लागेल.
  • त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका भूमी अभिलेख कार्यालय आणि त्यानंतर तुमचे गाव किंवा शहर निवडायचे आहे
  • आता तुम्हाला CTS Number, पाहिले नाव, आडनाव किंवा मधले नाव यातील जे माहिती असेल ते निवडून प्रविष्ट करायचे आहे. ही पद्धत वापरून तुम्ही कोणाच्याही नावावरून प्रॉपर्टी कार्ड पाहू शकता
  • यानंतर आपली मालमत्ता शोधा या पर्यायावर क्लिक करा
  • नंतर आवश्यक ती माहिती भरल्यावर तुम्हाला मालमत्तेची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसून येईल. यामध्ये मालकाचे नाव, मालमत्तेचे क्षेत्रफळ,मालमत्तेचा प्रकार इत्यादी माहिती असेल

अशा पद्धतीने आपणास वरील स्टेप फॉलो करून प्रॉपर्टी कार्ड अगदी मोफत पणे पाहता येते. त्यासाठी कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

या दोन पद्धतीशिवाय महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख पोर्टल वरून तुम्ही तुमचे प्रॉपर्टी कार्ड किंवा मालमत्ता पत्र Download करू शकता…

Bhumi Abhilekh

प्रॉपर्टी कार्ड साठी आकारण्यात येणारे शुल्क

प्रॉपर्टी कार्ड काढताना नागरिकाकडून काही शुल्क आकारण्यात येते, पण त्या शुल्काची रक्कम ही संबंधित नागरिका कोणत्या ठिकाणी वास्तव्यास आहे यावरून ठरवले जाते.

  • तुमची मालमत्ता जर महानगरपालिका क्षेत्रात येत असेल तर तुमच्याकडून डिजिटल प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी १३५ रुपये शुल्क आकारले जाते.
  • त्याचबरोबर जर तुमची मालमत्ता नगरपालिका अ, ब, क आणि नगरपंचायत या क्षेत्रात येत असेल तर तुमच्याकडून डिजिटल प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी ९० रुपये शुल्क आकारले जाते.
  • जर तुमची मालमत्ता ग्रामीण भागात येत असेल तर तुमच्याकडून डिजिटल प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी ४५ रुपये शुल्क आकारले जाते.

अशा पद्धतीने तुम्ही प्रॉपर्टी कार्ड डिजिटल स्वाक्षरीसह वरील स्टेप फॉलो करून डाऊनलोड करून घेऊ शकता त्याचबरोबर मोफत पाहू ही शकता.

Leave a Comment