मित्रांनो, तुमच्या नावावर किती सिम कार्ड्स रजिस्टर आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- वेबसाइटवर जा: मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला sancharsaathi.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जायचं आहे. ही वेबसाइट भारत सरकारने सर्वांसाठी बनवली आहे.
- मोबाइल कनेक्शन तपासा: होम पेजवर थोडं खाली स्क्रोल करा. तिथे तुम्हाला Know Your Mobile Connection TAFCOP हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- लॉगिन करा: आता तुमचा मोबाइल नंबर टाका, खाली दिलेला कॅप्चा कोड टाका, आणि Get OTP वर क्लिक करा. तुमच्या नंबरवर आलेला OTP टाकून Log In बटण दाबा.
- सिम कार्ड्सची यादी पाहा: मित्रांनो, लॉगिन केल्यानंतर तुमच्या नावावर रजिस्टर असलेल्या सिम कार्ड्सची लिस्ट दिसेल. यात प्रत्येक नंबरचे पहिले चार आणि शेवटचे चार अंक दाखवले जातील. जर सगळे नंबर तुम्ही वापरत असाल, तर काहीच करायची गरज नाही.
अनोळखी नंबर दिसल्यास काय करायचं?
मित्रांनो, जर यादीत एखादा नंबर तुमचा नसेल, तर घाबरू नका! तुम्ही तो नंबर तिथेच रिपोर्ट करू शकता. कसं ते पाहू:
- नंबर निवडा: लिस्टमधला अनोळखी नंबर सिलेक्ट करा.
- पर्याय निवडा:
- Not My Number: मित्रांनो, हा नंबर तुमचा नसेल तर हा पर्याय निवडा.
- Not Required: हा नंबर तुम्ही यापूर्वी वापरला असेल, पण आता हटवायचा असेल तर हा निवडा.
- Required: हा नंबर तुम्ही वापरत असाल तर हा पर्याय निवडा.
- रिपोर्ट करा: योग्य पर्याय निवडल्यानंतर Report बटणावर क्लिक करा. तुम्हाला एक Reference Number मिळेल, तो नक्की जपून ठेवा.
पुढे काय होईल?
मित्रांनो, तक्रार नोंदवल्यानंतर ती TRAI आणि संबंधित टेलिकॉम कंपनीकडे पाठवली जाईल. त्यानंतर तो अनोळखी नंबर बंद केला जाईल. तुम्ही फक्त रेफरन्स नंबर सेव्ह ठेवा, जेणेकरून गरज पडल्यास फॉलोअप घेता येईल.