Aapali Chawadi (आपली चावडी) हा महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाचा आणि त्याचबरोबर वन विभागाचे एक ऑनलाईन पोर्टल आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आपण मालमत्तेची माहिती जसे की सातबारा उतारा,खरेदी विक्री नोंदी आणि फेरफार नोंदी या ऑनलाइन पाहू शकतो किंवा मिळू शकतो.
जमीन मोजणी साठी गावातून ज्या व्यक्तींनी किंवा नागरिकांनी अर्ज केले आहेत ते आपणास या पोर्टलवर पहावयास मिळतात. त्यामुळेच आपली चावडी हा महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभाग आणि त्याचबरोबर वन विभाग यांचा एकत्रितपणे हे ऑनलाइन पोर्टल खूपच फायदेशीर आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या मालकीच्या मालमत्तेची संबंधित माहिती अगदी सोप्या पद्धतीने मिळवता येते.
आपली चावडी काय आहे Aapali Chawadi
आपली चावडी हे महाराष्ट्र सरकारचे ऑनलाईन नोटीस बोर्ड पोर्टल आहे. या पोर्टल च्या माध्यमातून महाराष्टातील प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायत नोटीस Digital माध्यमातून दिली जाते. हे पोर्टल महाराष्टातील सर्व नागरिकांसाठी मोफत खुले आहे.
१. तुमच्या मालकीच्या जमिनीच्या 7/12 नोंदीवर करण्यात आलेल्या प्रत्येक फेरफाराची नोटीस तुम्ही या पोर्टलच्या माध्यमातून पाहू शकता.
२. त्याचबरोबर तुम्ही या नोटीस मध्ये फेरफारीचा प्रकार, तारीख, हरकत नोंदवण्याची अंतिम तारीख आणि अधिक माहिती यासारखा तपशील तुम्हाला संक्षिप्तपणे पाहता येतो.
३. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील सातबारा फेरफार नोटीसा देखील या पोर्टलवरून शोधू शकता.
४. जमिनीच्या मालमत्तेच्या गैरवापराबद्दल तक्रार दाखल करता येते.
५. जमिनीच्या मालमत्तेच्या तडजोडीसाठीचा अर्ज दाखल करता येतो.
आपली चावडी या पोर्टलचा वापर करण्यासाठी आपल्याला खालील गोष्टीची आवश्यकता आहे
१. तुमचा आधार कार्ड नंबर
२. मोबाईल नंबर
३. ओटीपी (वन टाइम पासवर्ड)
आपली चावडी या पोर्टलचा वापर करण्यासाठी वरील तीन गोष्टींची आवश्यकता असते.
Aapali Chawadi 7/12 आपली चावडी या पोर्टलच्या माध्यमातून सातबारा विषयी माहिती
जमिनीच्या संबंधित कोणत्याही प्रकारचा व्यवहार झाल्यानंतर त्या व्यवहाराची नोंद सातबारा उताऱ्यामध्ये घेणे आवश्यक असते. सातबारा उताऱ्यामध्ये नोंद घेण्यासाठी फेरफार होणे अतिशय महत्त्वाचे आहे. जमिनीच्या संबंधातील खरेदी-विक्री कोणत्या व कशा प्रकारची झाली? फेरफार कोणत्या प्रकारचा व कसा झाला?हे पाहणे खूपच महत्त्वाचे आहे, तुमच्या गावातील ही सर्व माहिती आपली चावडी Digital Notice Board वर पाहता येईल. तुमच्या गावचा Digital Notice Board कसा पाहायचा,आपण सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप पाहू.
- सर्वप्रथम तुम्हाला👇 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi ही वेबसाईट ओपन करावी लागेल.
- त्यानंतर आपणाला सातबारा (फेरफार) विषयी माहिती हवी असल्याने आपण सातबारा या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा निवडा.
- नंतर तालुका निवडा.
- त्यानंतर तुमचे गाव निवडा.
- त्यानंतर दिलेला कॅप्च्या योग्य पद्धतीने भरून त्याखाली आपली चावडी या बटणावर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला 7/12 विषयी संपूर्ण माहिती दिसेल. जसे की सातबारा मध्ये तुम्हाला फेरफार नंबर, फेरफारचा प्रकार, फेरफारचा दिनांक, हरकत नोंदवण्याची शेवटची तारीख, सर्वे किंवा गट क्रमांक बाबी तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे दिसतील.
- त्यानंतर तुम्ही सातबारा मधील बदल जे की शेवटी पहा या बटनावर क्लिक करून सविस्तरपणे पाहू शकता.
- नोटीस पहा या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फेरफार ची स्थिती व ती हक्क कर्जाची स्थिती पहावयास मिळेल.
आपली चावडी या पोर्टलच्या माध्यमातून मोजणी विषयी माहिती
आपली चावडी Digital Notice Board च्या माध्यमातून गावातून आलेले मोजणी अर्जाची माहिती पाहता येते. Aapali Chawadi च्या माध्यमातून जमीन मोजणी अर्जदाराचे नाव, अर्जातील क्षेत्र, ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमिनीच्या शेजारील सर्व खातेदारकांची यादी इत्यादी माहिती उपलब्ध असते.
- सर्वप्रथम मोजणी विषयीच्या माहितीसाठी आपणास👇 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichavdi या वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला ह्या पोर्टल वरील मोजणी या बटणावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
- त्यानंतर तालुका निवडावा लागेल.
- नंतर मला तुमची गाव निवडावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला योग्य रीतीने कॅप्च्या पूर्ण करून नंतर खालील आपली चावडी या बटणावर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्हाला मोजणी याविषयीच्या नोटीस सर्वे नंबर किंवा गट नंबर नुसार सविस्तरपणे येथे आपणास पाहावयास मिळेल.
आपली चावडी या पोर्टलच्या माध्यमातून मालमत्ता पत्र(फेरफार) विषयी माहिती
- इथे ही आपणास सर्वप्रथम👇 https://diditalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला मालमत्ता पत्रक (फेरफार) या बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे. (समजा जर तुम्ही सांगली जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला पुणे हा विभाग निवडावा लागेल.)
- त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा निवडा.
- नंतर तुम्हाला कार्यालय निवडायचे आहे. (म्हणजे तुम्ही जर सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात राहत असाल तर तुम्हाला मिरज कार्यालय निवडायचे आहे.)
- त्यानंतर तुम्ही तुमचे गाव किंवा पेठ निवडायचे आहे.
- त्यानंतर दिलेला कॅप्च्या व्यवस्थितपणे भरून आपली चावडी या बटणावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला मालमत्ता पत्रक विषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल. त्यामध्ये मालमत्तेचा नोंदणी क्रमांक, आवक क्रमांक, फेरफार क्रमांक, फेरफार प्रकार, फेरफारचा दिनांक, हरकत शेवटची तारीख त्याचबरोबर मालमत्तेचा नगर भूमापन क्रमांक या सर्व बाबी सविस्तरपणे आपणास या ठिकाणी पहावयास मिळतील.
- त्याचबरोबर सर्वात शेवटी आपणाला मालमत्ता पत्रक विषयी झालेल्या फेरफार संबंधित अधिक माहिती मिळवायची असेल तर पहा या बटनावर क्लिक करून ती माहिती तुम्ही सविस्तरपणे मिळवू शकता.
- त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी नोटीस पहा या ठिकाणी मालमत्ता पत्रक अर्जाची स्थिती ही तुम्हाला पहावयास मिळू शकते.
आपली चावडी या पोर्टलच्या माध्यमातून स्वामित्व विषयी माहिती
- जसे की वरील प्रमाणे आपणास स्वामित्व विषयी माहितीसाठी सर्वप्रथम👇 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला स्वामित्व या बटनावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा निवडा.
- त्यानंतर तालुका निवडा.
- त्यानंतर तुम्ही तुमचे गाव निवडा.
- नंतर कॅप्च्या बरोबर लिहून आपली चावडी या बटणावर क्लिक करा.
- यामध्ये तुम्हाला स्वामित्व (नोटिसेस) मध्ये नोटीस A,B असे त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल.
- नोटीस पहा या ठिकाणी तुम्हाला मोजणी अर्जाची स्थिती ही पहावयास मिळू शकते.
सर्वात शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाकडून किंवा संबंधित विभागाकडून लवकरच या नवीन बाबी नव्याने यामध्ये येणार आहेत त्यामध्ये निवडणुकीची नोटीस, ग्रामसभेची नोटीस, सर्वसाधारण नोटीस व ग्रामआदर्श तक्ता या त्या गोष्टींचा समावेश लवकरच होणार आहे. एकंदरीत आपली चावडी हि अत्यंत लोकोपयोगी सुविधा असून या सुविधेचा जास्ती जास्त नागरिकांनी उपयोग करून घेणे आवश्यक आहे.