अहिल्यानगर जिल्हा Online 7/12 | अहमदनगर जिल्हा निवडा. अहिल्यानगर जिल्हा सातबारा उतारा.

नमस्कार मित्रांनो, आज आपण नाशिक प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर या जिल्ह्याच्या डिजिटल सातबारा विषयाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील बहुसंख्य लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. अहमदनगर जिल्ह्याने महाराष्ट्र सरकारच्या डिजिटल उपक्रमाचा एक भाग म्हणून डिजिटल सातबाराच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. डिजिटल सातबारा चा मुख्य उद्देश म्हणजे, जमिनी संबंधित नोंदणीचे संगणकीकरण करणे आणि नागरिकांना त्यांच्या जमिनीची माहिती डिजिटल स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे.

म्हणूनच, सदरच्या लेखांमध्ये आपण अहमदनगर जिल्ह्यातील डिजिटल सातबारा विषयी संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत.यामध्ये प्रामुख्याने आपण डिजिटल सातबारा म्हणजे काय? डिजिटल सातबाराचे फायदे, डिजिटल सातबाराचे महत्त्व, मोफत डिजिटल सातबारा कसा पहायचा? डिजिटल स्वाक्षरीसह डिजिटल सातबारा हा कोणत्या पद्धतीने डाऊनलोड करायचा? त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील जुने सातबारा व फेरफार याविषयीची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.

विषयसूची

डिजिटल सातबारा विषयी थोडक्यात…

डिजिटल सातबारा म्हणजे जमिनीची संपूर्ण माहिती शासनाच्या किंवा जमिनीच्या संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर डिजिटल स्वरूपात संग्रहित किंवा गोळा केलेली असते त्याला डिजिटल सातबारा असे म्हणतात. सदरची डिजिटल स्वरूपातील माहितीच्या आधारे नागरिक त्यांच्या जमिनीची संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने मिळवू शकतात. डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन माहिती पारदर्शक आणि अचूक स्वरूपात उपलब्ध होते. या माहितीच्या आधारे जमिनीची खरेदी विक्री त्याचबरोबर हस्तांतर प्रक्रिया अधिक पारदर्शक होताना दिसते.

Digital 7/12 example

डिजिटल सातबारा फायदे

  • नागरिकांच्या जमिनीची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत असल्यामुळे नागरिकांच्या पैशाची बचत होते.
  • जमिनीच्या नोंदी डिजिटल स्वरूपात शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्यामुळे त्या सुरक्षित तर असतातच, त्याचबरोबर यांची नक्कल करता येत नाही. त्याचबरोबर ही माहिती वेळोवेळी अपडेट होत राहते.
  • जमिनीची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात मिळत असल्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचतो त्याचबरोबर जमिनीच्या नोंदी करण्यासाठी भटकंती करण्याची गरज भासत नाही.
  • डिजिटल सातबारा वर मिळणारी माहिती ही अचूक स्वरूपात असते.
  • डिजिटल सातबारा चा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे हे सातबारा नागरिकांना कधीही आणि कोठेही सहजरित्या उपलब्ध होतात.

डिजिटल सातबाराच्या माध्यमातून करता येणारी कामे

  • जमिनीशी संबंधित सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने केले जाऊ शकतात.
  • जमीन खरेदी विक्रीची नोंद ऑनलाईन पद्धतीने करता येते.
  • नागरिकांना त्यांच्या जमिनीचा सातबारा ऑनलाइन पद्धतीने मोफत पाहता येतो,त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करता येतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण खाली पाहणारच आहोत.

डिजिटल सातबाराच्या माध्यमातून जमिनीशी संबंधित कोणती माहिती मिळू शकते?

  • जमिनीचा मालक
  • जमिनीचे क्षेत्रफळ
  • जमिनीचा नकाशा
  • जमिनीची चतुर सीमा
  • जमिनीचे वर्गीकरण
  • जमिनीवरील कर्ज किंवा बोजा
  • जमिनीची संबंधित इतर सर्व माहिती

अहमदनगर जिल्हा डिजिटल सातबारा

अहमदनगर जिल्ह्यातील डिजिटल सातबारा हा नागरिकांना मोफत पाहण्याची सोय महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर केली आहे. या संकेतस्थळावर जाऊन नागरिक त्यांच्या जमिनीचा सातबारा हा अगदी मोफत पाहू शकतात. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने डिजिटल स्वाक्षरीसह डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्याची नागरिकांसाठी सोय केली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ पाहता व प्रशासनावर पडणारा कामाचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी शासनाकडून उचललेले हे एक खूप मोठे पाऊल आहे. डिजिटल सातबारा हा मोफत कसा पाहायचा, त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहूया.

अहमदनगर जिल्हा डिजिटल सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह डाउनलोड करण्याची संपूर्ण माहिती

अहमदनगर जिल्ह्यातील डिजिटल सातबारा नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीसह अगदी सोप्या पद्धतीने डाऊनलोड करता येतो. डिजिटल सातबारा सोप्या पद्धतीने कसा डाऊनलोड करायचा याबद्दलची माहिती आपण खाली सविस्तरपणे दिली आहे. जेणेकरून या माहितीच्या आधारे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना डिजिटल सातबारा डाऊनलोड करताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये.

digital 7/12 login
  • अहमदनगर जिल्ह्यातील डिजिटल सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर जावे लागेल.👇👇👇 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
  • मोबाईल नंबर टाकून Send OTP या बटणावर क्लिक करा.
  • मोबाईलवर आलेला OTP हा नंतर Entar OTP या चौकटीमध्ये भरा आणि त्यानंतर verify OTP बटणावर क्लिक करा.
  • डिजिटल सातबारा हा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करायचा असल्यामुळे Net banking/Credit/Debit Card वरून 15 रुपये रिचार्ज करावा लागेल.Recharge Account बटनावर क्लिक करून संबंधित शुल्क भरता येईल.
  • अहमदनगर जिल्हा निवडा.
  • तालुका निवडा.
  • गाव निवडा.
  • सर्वे नंबर किंवा गट नंबर टाका.
  • वरील सर्व माहिती अचूक भरल्यानंतर व पंधरा रुपये ऑनलाईन pay केल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीसह डिजिटल सातबारा डाउनलोड करून घेता येईल.

वरील माहितीचा संदर्भ घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक किंवा शेतकरी डिजिटल सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह  डाऊनलोड करून घेऊ शकतात.डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड केलेला सातबारा हा कायदेशीर कामासाठी ग्राह्य मानला जातो.डिजिटल सातबाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या सातबारावर संबंधित अधिकाऱ्याची वेगळी स्वाक्षरी व शिक्का घेण्याची गरज नसते.

अहमदनगर जिल्हा डिजिटल सातबारा मोफत पाहण्याची स्टेप बाय स्टेप माहिती

अहमदनगर जिल्ह्यातील डिजिटल सातबारा मोफत पाहण्याची पद्धत खूपच सोपी आहे. ती आपण खालील प्रमाणे पाहू.

  • अहमदनगर जिल्ह्यातील डिजिटल सातबारा मोफत पाहण्यासाठी सर्वप्रथम महसूल विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.👇👇👇 https://bhulekh.mahabhumi.gov.in
free 7/12
  • संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्वप्रथम विभाग निवडून Go या बटणावर क्लिक करा.( नाशिक विभाग)
  • अहमदनगर जिल्हा निवडा.
  • तालुका निवडा.
  • तालुका निवडल्यानंतर खाली त्या तालुक्यातील संपूर्ण गावांची यादी दिसेल, या यादीतून तुमच्या गावाचे नाव निवडून त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकून किंवा पहिले नाव, मधले नाव, आडनाव किंवा संपूर्ण टाकून सातबारा पाहता येतो.
  • त्यानंतर मोबाईल नंबर टाकून ७/१२ शोधा या बटणावर क्लिक करा.
  • दिलेला captcha अचूक भरा.त्यानंतर verify captcha to view ७/१२ वर क्लिक करून तुम्हाला मोफत सातबारा पाहता येईल.

अशाप्रकारे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक कोणत्याही जमिनीचा सातबारा हा मोफत पणे पाहू शकतात.नागरिकांना हा सातबारा फक्त पाहताच येतो, त्याचा वापर कोणत्याही कायदेशीर कामासाठी करता येत नाही.

अहमदनगर जिल्हा जुने सातबारा व फेरफार

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र शासनाने जमिनीचे जुने सातबारा व फेरफार ऑनलाइन पद्धतीने मोफत पाहण्याची सोय त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर केली आहे. जुने सातबारा व फेरफार डाऊनलोड कसे करायचे याबद्दलची ही मार्गदर्शिका संबंधित संकेतस्थळावर शासनाकडून उपलब्ध करून दिली आहे. जुने सातबारा व फेरफार हे जमिनीची ऐतिहासिक नोंद ठेवण्याचे काम करतात. जुने सातबारा व फेरफार यांच्या माध्यमातून जमिनीमध्ये कालांतराने झालेले बदल मालकी हक्क यांची संपूर्ण माहिती मिळते. जुने सातबारा व फेरफार यांच्या आधारावर दस्तऐवजांची सत्यता पडताळली जाते. अहमदनगर जिल्ह्यातील जुने सातबारा व फेरफार मोफत कसे पाहायचे त्याचबरोबर डाऊनलोड कसे करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण खाली पाहूया.

अहमदनगर जिल्हा जुने सातबारा व फेरफार मोफत कसे पाहायचे? डाऊनलोड कसे करायचे?

  • अहमदनगर जिल्ह्यातील जुनी सातबारा व फेरफार मोफत पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम भूमी अभिलेख विभागाच्या या संकेतस्थळावर जावे लागेल.👇👇👇 https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in
  • संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्वप्रथम लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी करण्यासाठी संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर ही माहिती अचूक स्वरूपात भरावी लागेल.
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील ज्या जमिनीचा जुना सातबारा व फेरफार पाहायचा आहे किंवा डाऊनलोड करायचा आहे त्या जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर, गावाचे नाव, तालुका ही माहिती अचूक स्वरूपात भरायची आहे.
  • दिलेला कॅप्च्या व्यवस्थित भरून घ्यायचा आहे.
  • त्यानंतर संबंधित जमिनीचा जुना सातबारा व फेरफार तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तुम्ही हा सातबारा फेरफार मोफत पणे पाहू शकता.
  • जमिनीचा जुना सातबारा व फेरफार नागरिकांना डाऊनलोड स्वरूपात हवा असेल तर नागरिक download या option वर क्लिक करून PDF स्वरूपात डाउनलोड करू शकतात.
  • जुने सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी संबंधित व्यक्तीला 15 रुपये इतके शुल्क net banking/debit/credit card द्वारे भरावे लागते.

वरील माहितीच्या आधारे अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्याही जमिनीचा जुना सातबारा व फेरफार नागरिकांना मोफत पाहता येतो. त्याचबरोबर हे दस्तऐवज डाउनलोड स्वरूपात हवे असतील तर १५ रुपये इतके नाममात्र शुल्क भरून डाऊनलोड करून घेता येतात. जुने सातबारा व फेरफार हे जमिनीच्या कोणत्याही वादा संदर्भात एक महत्त्वाचा व भक्कम पुरावा म्हणून काम करतात.

सदरच्या लेखांमध्ये आपण अहमदनगर जिल्ह्यातील डिजिटल सातबारा विषयीची संपूर्ण माहिती सविस्तरपणे आणि अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. या माहितीच्या आधारे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक त्यांच्या जमिनीचे सातबारा ऑनलाइन पद्धतीने मिळवू शकतील. धन्यवाद!

अहमदनगर जिल्हा सविस्तर माहितीसाठी या संकेतस्थळावर क्लिक करा. 👉 https://ahmednagar.nic.in

अहमदनगर जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय पत्ता:  👉 PMH SH 50, Mahagaon,Parner,Maharashtra 414302

Leave a Comment