नमस्कार शेतकरी मित्रांनो,सदरच्या मालिकेतील आजचा आपला जिल्हा आहे अकोला जिल्हा 7/12. अकोला जिल्हा हा अमरावती प्रशासकीय विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून डिजिटल सातबाराच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि त्यामुळेच येथील शेतकरी व नागरिक जमिनी संबंधीची कामे अधिक जलद व पारदर्शक पद्धतीने करणे त्यांना शक्य झाले आहे.
आपण अकोला डिजिटल 7/12 सातबारा विषयीची संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात सदरच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. डिजिटल सातबारा म्हणजे काय? डिजिटल सातबाराचे फायदे, डिजिटल सातबारा हा का महत्त्वाचा आहे? मोफत डिजिटल सातबारा कसा पहायचा? त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरीसह डिजिटल सातबारा हा कोणत्या पद्धतीने अकोला जिल्ह्यातील नागरिक डाऊनलोड करू शकतात याविषयीची ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जुनी सातबारा व फेरफार याविषयीची ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
डिजिटल सातबारा म्हणजे काय?
डिजिटल सातबारा म्हणजे जमिनीची संपूर्ण माहिती ही शासनाच्या किंवा संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर डिजिटल स्वरूपात संग्रहित किंवा गोळा केलेली असते त्याला डिजिटल सातबारा असे म्हणतात. या डिजिटल माहितीच्या आधारे नागरिक किंवा शेतकरी त्यांच्या जमिनीची संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतात. डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन माहिती पारदर्शक आणि अचूक स्वरूपात उपलब्ध होते.
या माहितीच्या आधारे जमिनीची खरेदी विक्री त्याचबरोबर हस्तांतर प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तत्परतेने होताना दिसून येते. या डिजिटल सातबारा वर जमिनीचा मालक, जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीचा नकाशा, जमिनीवर असलेले कर्ज किंवा बोजा यांची माहिती डिजिटल स्वरूपात दिलेली असते.
डिजिटल सातबारा फायदे
- जमिनीची संपूर्ण माहिती ही डिजिटल स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत असल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसे याची बचत होते.
- जमिनीच्या नोंदी या डिजिटल स्वरूपात शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्यामुळे त्या सुरक्षित तर असतातच, त्याचबरोबर त्या वेळोवेळी अपडेट होत राहतात.
- जमिनीची संपूर्ण माहिती ही डिजिटल स्वरूपात मिळत असल्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज नाही.
- डिजिटल सातबाराचा महत्वाचा फायदा म्हणजे हे सातबारा नागरिकांना कधी आणि कोठेही उपलब्ध होतात.
- डिजिटल सातबारा वर मिळणारी माहिती ही अचूक स्वरूपात मिळते.
डिजिटल सातबाराच्या माध्यमातून करता येणारी कामे
- जमीन खरेदी विक्रीची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येते.
- नागरिकांना त्यांच्या जमिनीचा सातबारा ऑनलाइन पद्धतीने मोफत पाहता येतो त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरीसह डाउनलोड करता येतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण खाली पाहणारच आहोत.
- जमीन संबंधित सर्व व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने केले जाऊ शकतात.
डिजिटल सातबाराच्या माध्यमातून जमिनीची कोणती माहिती मिळू शकते?
- जमिनीचा मालक
- जमिनीचे क्षेत्रफळ
- जमिनीचा नकाशा
- जमिनीची चतुर सीमा
- जमिनीचे वर्गीकरण
- जमिनीवरील कर्ज किंवा बोजा
अकोला जिल्हा डिजिटल सातबारा
अकोला जिल्ह्यातील डिजिटल सातबारा हा नागरिकांना मोफत पाहण्याची सोय महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर केली आहे. मोफत सातबारा पाहण्याबरोबरच डिजिटल स्वाक्षरीसह सातबारा डाउनलोड करण्याची मोहीम शासनाकडून राबवली जात आहे. हा सातबारा कसा डाऊनलोड करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण खाली पाहणारच आहोत.
अकोला जिल्ह्यातील डिजिटल सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती
अकोला जिल्ह्यातील डिजिटल सातबारा हा नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीसह डाउनलोड करता येतो. डिजिटल सातबारा सोप्या पद्धतीने कसा डाऊनलोड करतात याबद्दलची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली सविस्तरपणे दिली आहे. जेणेकरून अकोला जिल्ह्यातील नागरिकांना डिजिटल सातबारा डाऊनलोड करताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
- अकोला जिल्ह्यातील डिजिटल सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर जावे लागेल.👇👇👇 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
- त्यानंतर मोबाईल नंबर टाकून send OTP बटनावर क्लिक करा.
- मोबाईलवर आलेला OTP हा नंतर Enter OTP या रकान्यामध्ये भरा आणि त्यानंतर verify OTP या बटणावर क्लिक करा.
- डिजिटल सातबारा हा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करायचा असल्यामुळे Net banking/Credit/Debit Card वरून पंधरा रुपये रिचार्ज करावा लागेल. Recharge Account बटनावर क्लिक करून संबंधित शुल्क भरता येईल.
- अकोला जिल्हा निवडा.
- तालुका निवडा.
- गाव निवडा.
- सर्वे नंबर किंवा गट नंबर टाका.
- वरील सर्व माहिती अचूक भरल्यानंतर व १५ रुपये शुल्क ऑनलाईन भरून डिजिटल स्वरूपातील सातबारा हा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करून घेता येईल.
वरील माहितीचा संदर्भ घेऊन अकोला जिल्ह्यातील नागरिक डिजिटल सातबारा हा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करून घेऊ शकता. डिजिटल स्वरूपात डाऊनलोड केलेला सातबारा हा कायदेशीर बाबींसाठी ग्राह्य मानला जातो. या सातबारावर संबंधित अधिकाऱ्याची वेगळी अशी स्वाक्षरी व शिक्का घेण्याची गरज नसते.
अकोला जिल्ह्यातील डिजिटल सातबारा मोफत पाहण्याची स्टेप बाय स्टेप माहिती
- अकोला जिल्ह्यातील डिजिटल सातबारा हा मोफत पाहण्यासाठी सर्वप्रथम महसूल विभागाच्या या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.👇👇👇 https://bhulekh.mahabhumi.gov.in
- वेबसाईटला गेल्यानंतर सर्वप्रथम विभाग निवडून Go या बटणावर क्लिक करा. (अमरावती विभाग)
- त्यानंतर अकोला जिल्हा निवडा.
- नंतर तालुका निवडा.
- तालुका निवडल्यानंतर खाली त्या तालुक्यातील संपूर्ण गावांची यादी दिसेल. त्या यादीमध्ये तुमचे गाव शोधून त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकून किंवा पहिले नाव, मधले नाव, आडनाव किंवा संपूर्ण नाव टाकून सातबारा शोधता येतो.
- त्यानंतर मोबाईल नंबर टाकून ७/१२ शोधा या बटणावर क्लिक करा.
- दिलेला कॅप्च्या अचूक भरा. त्यानंतर verify captcha to view 7/12 वर क्लिक करून तुम्ही मोफत सातबारा पाहू शकता.
वरील माहितीचा संदर्भ घेऊन अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील कोणत्याही जमिनीचा सातबारा हा अगदी मोफत पणे पाहता येतो.
अकोला जिल्हा जुने सातबारा व फेरफार
अकोला जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र शासनाने जमिनीचे जुने सातबारा व फेरफार ऑनलाईन पद्धतीने मोफत पाहण्याची सोय केली आहे. त्याचबरोबर जुने सातबारा व फेरफार हे डाउनलोड कसे करायचे याबद्दलची ही सविस्तर माहिती संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. जुने सातबारा व फेरफार यांच्या माध्यमातून जमिनीमध्ये कालांतराने झालेला बदल, मालकी हक्क याबद्दलची संपूर्ण माहिती मिळते. जुने सातबारा व फेरफार यांच्या आधारे दस्तऐवजांची सत्यता पडताळली जाते. अकोला जिल्ह्यातील जुने सातबारा व फेरफार हे मोफत कसे पाहायचे त्याचबरोबर डाउनलोड कसे करायचे याबद्दलची सविस्तर माहिती पाहू.
अकोला जिल्हा जुने सातबारा व फेरफार मोफत कसे पाहायचे? डाऊनलोड कसे करायचे?
- अकोला जिल्ह्यातील जुने सातबारा व फेरफार मोफत पाहण्यासाठी त्याच बरोबर डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम भूमी अभिलेख विभागाच्या या संकेतस्थळावर जावे लागेल.👇👇👇 https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in
- सर्वप्रथम लॉगिन करावे लागेल.
- लॉगिन केल्यानंतर नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी करण्यासाठी संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर ही माहिती अचूक स्वरूपात भरावी लागेल.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातील ज्या जमिनीचा जुना सातबारा व फेरफार पाहायचा आहे किंवा डाऊनलोड करायचा आहे त्या जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर, गावाचे नाव, तालुका ही माहिती अचूक स्वरूपात भरायची आहे.
- दिलेला कॅप्च्या व्यवस्थित भरून घ्यायचा आहे.
- त्यानंतर संबंधित जमिनीचा जुना सातबारा व फेरफार स्क्रीनवर दिसेल. तेथून नागरिकांना जुना सातबारा व फेरफार मोफत पणे पाहता येतो.
- जमिनीचा जुना सातबारा व फेरफार नागरिकांना डाऊनलोड स्वरूपात पाहिजे असेल तर, नागरिक download या option यावर क्लिक करून PDF स्वरूपात ही कागदपत्रे डाऊनलोड करून घेऊ शकतात.
- जुने सातबारा व फेरफार डाऊनलोड करण्यासाठी संबंधित व्यक्तींना पंधरा रुपये इतके शुल्क Net banking/Debit/Credit Card द्वारे भरावे लागते.
वरील माहितीचा संदर्भ घेऊन अकोला जिल्ह्यातील कोणत्याही जमिनीचा जुना सातबारा व फेरफार अगदी मोफत पाहता येतो. त्याचबरोबर ही कागदपत्रे डाऊनलोड स्वरूपात हवे असतील तर हवे असतील तर पंधरा रुपये इतके नाममात्र शुल्क भरून हे दस्तऐवज डाउनलोड करून घेता येतात. जुने सातबारा व फेरफार हे जमिनीच्या कोणत्याही वादा संदर्भात एक महत्त्वाचा भक्कम पुरावा म्हणून काम करतात.
सदरच्या लेखामध्ये आम्ही अकोला जिल्ह्यातील डिजिटल सातबारा विषयी संपूर्ण माहिती अगदी सविस्तरपणे आणि अचूक देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही आशा करतो की तुम्ही या माहितीच्या आधारे तुमच्या जमिनीचा सातबारा हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मिळवाल. धन्यवाद!