आज आपण बीड जिल्ह्यातील डिजिटल सातबारा (7/12) उतारा ऑनलाइन पद्धतीने कसा डाउनलोड करायचा पाहूया. त्याचबरोबर सदरचा सातबारा मोफत कसा पाहायचा आणि जुने सातबारा व फेरफार कसे पाहायचे व कशा पद्धतीने डाऊनलोड करायचे हे या लेखामध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत.
तसे पाहायला गेले तर बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे जास्त असल्यामुळे आणि तेथील लोकसंख्या ही बहुतांश शेती या व्यवसायामध्ये गुंतलेली असल्याने गाव पातळीवरील तलाठी कार्यालयावर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून डिजिटल स्वरूपात सातबारा उपलब्ध करून देण्यात आला आहे
सातबारा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे की जो जमिनीच्या कोणत्याही व्यवहारासाठी एक निश्चित असा पुरावा मानला जातो. यामध्ये जमिनीची नोंद, जमिनीच्या मालकाचे नाव, जमिनीचा प्रकार त्याचबरोबर जमिनीचे क्षेत्रफळ ही महत्त्वाची माहिती सातबारावर दर्शवलेली असते.
डिजिटल सातबारा का महत्वाचा आहे?
नागरिकांना घरबसल्या अतिशय वेगवान प्रोसेस द्वारे आणि त्यांच्या सोयीनुसार सातबाराची प्रत मिळू शकते. त्याचबरोबर डिजिटल सातबारा हा पारदर्शी असल्यामुळे यामध्ये कोणताही गैरप्रकार आढळून येत नाही. डिजिटल नोंदणीमुळे सातबारा हा खूपच सुरक्षित असतो. त्याचबरोबर डिजिटल सातबारामुळे भौतिक कागदपत्रांची गरज खूपच कमी होते.
डिजिटल सातबाराचे आणखी एक महत्त्व म्हणजे विनाकारण नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत नाही. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होते. जमिनीची सर्व माहिती ही डिजिटल स्वरूपात मिळत असल्यामुळे नागरिकांना विनाकारण जमिनीच्या संबंधातील कागदपत्रे हाताळावी लागत नाही त्यामुळे कागदपत्रे ही चोरीला जाण्याची किंवा गहाळ होण्याची भीती राहत नाही.
बीड जिल्हा डिजिटल सातबारा
बीड जिल्ह्याचा डिजिटल सातबारा कसा डाऊनलोड करायचा?
बीड जिल्ह्यातील डिजिटल सातबारा हा कशाप्रकारे डाउनलोड करता येतो याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली दिलेली आहे. त्या आधारे तुम्ही तुम्हाला हवा असलेला सातबारा डिजिटल स्वरूपात त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करू शकता.
- डिजिटल स्वरूपात सात बारा डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.👇 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
- त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडावा लागेल.(अर्थातच बीड जिल्हा)
- यानंतर बीड जिल्ह्यातील तुमचा तालुका निवडा.
- त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे गाव निवडा.
- त्यानंतर तुम्हाला कोणता सातबारा डाउनलोड करायचा आहे त्या सातबाराचा नंबर टाका.
- त्यानंतर सर्वे क्रमांक टाका. (माहित असेल तर)
- नंतर सर्च या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो सातबारा डाऊनलोड करायचा आहे तो तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- त्यानंतर तुम्ही तो सातबारा pdf स्वरूपात डाउनलोड करून घेऊ शकता.
- जर तुम्हाला सातबारा हा डिजिटल स्वाक्षरीसह हवा असेल तर तुम्हाला १५ रुपये इतके नाममात्र शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
अशा प्रकारे तुम्ही जर बीड जिल्ह्यातील प्रवासी असाल किंवा तुमची मालमत्ता जर बीड जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्ही वरील माहितीचा आधार घेऊन डिजिटल स्वाक्षरीसह सातबारा डाउनलोड करू शकता. यासाठी तुमच्याकडे तुमचा वैध ई-मेल आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. डिजिटल स्वरूपाचे सातबारा मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला ज्या भाषेमध्ये सातबारा डाऊनलोड करायचा आहे तुम्ही तो त्या भाषेमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता.
बीड जिल्हा मोफत सातबारा
बीड जिल्ह्यातील डिजिटल सातबारा हा मोफत कसा पाहायचा?
भारतामध्ये सातबारा हा एक जमीन मालकीचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. हा दस्तऐवज आपल्या जमिनीवरील हक्काचा महत्वपूर्ण पुरावा आहे. यापूर्वी सातबारा मिळवण्यासाठी नागरिकांना संबंधित महसूल कार्यालयात जाऊन शुल्क भरून हा सातबारा मिळत होता. पण नंतर यामध्ये शासनाकडून अमुलाग्र बदल केले गेले. या बदलामुळेच नागरिकांच्या सोयीसाठी सातबारा ऑनलाइन मोफत उपलब्ध करून दिला आहे. चला तर मग मोफत सातबारा कसा पहायचा याविषयी स्टेप बाय स्टेप माहिती पाहू.
- सर्वप्रथम तुम्हाला महाभुलेख विभागाच्या या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. https://bhulekh.mahabhumi.gov.in
- सर्वप्रथम आपल्याला आपला छत्रपती संभाजीनगर विभाग निवडायचा आहे
- त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडा पर्यायात बीड जिल्हा निवडावा लागेल.
- त्यानंतर बीडमधील तुमचा तालुका निवडा.
- यानंतर तुमचे गाव निवडा.
- त्यानंतर सातबारा नंबर किंवा गट नंबर टाका.
- नंतर सर्वात शेवटी सर्च या बटणावर क्लिक करून तुम्हाला जो सातबारा पहायचा आहे, तो सातबारा तुमच्या स्क्रीनवर दिसेल त्या ठिकाणी तुम्ही तो अगदी मोफत पणे पाहू शकाल.
अशा रीतीने तुम्ही कोणतेही शुल्क न देता बीड जिल्ह्यातील कोणताही सातबारा अगदी मोफत पण पाहू शकता. मोफत सातबारा चा वापर जमिनीच्या कोणत्याही व्यवहारासाठी अनिवार्य आहे. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर संबंधित सातबारा उपलब्ध असल्यामुळे यामध्ये कोणताही गैरव्यवहार आढळून येत नाही.
बीड जिल्हा जुने सातबारा व फेरफार
महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांना जमिनीच्या संदर्भातील जुने सातबारा व फेरफार कसे पाहिजे त्याचबरोबर pdf स्वरूपात कसे डाउनलोड करायचे या सुविधा आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना जुने सातबारा व फेरफार मिळवण्यासाठी किंवा पाहण्यासाठी संबंधित कार्यालयाच्या चकरा मारण्याची आता गरज नाही. कारण त्यांना अगदी घरबसल्या सोप्या पद्धतीने सर्व जुने दस्तावेज मिळत आहेत.
बीड जिल्ह्यातील जुने सातबारा व फेरफार कसे पहायचे किंवा डाउनलोड करायचे?
- यासाठी सर्वप्रथम आपणाला महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवरून जुने सातबारा व फेरफार ऑनलाइन पद्धतीने पाहू किंवा डाऊनलोड करता येतात.👇 https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in
- त्यानंतर तुम्हाला या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. यामध्ये तुमचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, तुमचा मोबाईल नंबर ही आवश्यक माहिती तुम्हाला देणे सक्तीचे आहे.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बीड जिल्ह्यातील ज्या जमिनीचे जुने सातबारा व फेरफार पाहायचे आहेत त्या जमिनीचा सर्वे नंबर, गावचे नाव आणि तालुका ही माहिती भरायची आहे.
- संबंधित माहिती भरल्यानंतर तुम्ही ज्या जमिनीचे जुने सातबारा व फेरफार पाहणार आहात ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतील.
- संबंधित दस्तऐवज जर तुम्हाला डाऊनलोड करून पाहिजे असतील तर डाऊनलोड या बटणावर क्लिक करून तुम्ही pdf स्वरूपात संबंधित कागदपत्रे डाऊनलोड करून घेऊ शकता व प्रिंट करूनही घेऊ शकता.
वरील माहितीच्या आधारे तुम्ही बीड जिल्ह्यातील कोणत्याही जमिनीचे जुने सातबारा व फेरफार पाहू शकता किंवा नाममात्र शुल्क देऊन डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करून घेऊ शकता. जुने सातबारा हे जमिनीच्या मालकी हक्काचे सर्वात प्रामाणिक पुरावे मानले जातात. यातून जमिनीच्या इतिहासाची माहिती अगदी बिनचूकपणे समजली जाते, यामध्ये जमिनीची खरेदी-विक्री, बक्षीस पत्र,वारसा इत्यादींची माहिती मिळते. जमीन विक्री, बंधन, विभाजन कायदेशीर प्रक्रियांसाठी जुने सातबारा महत्त्वाचे दस्तऐवज म्हणून आवश्यक असतात. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जुने सातबारा महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून आवश्यक असतात.
बीड जिल्हा संबंधित अधिकृत माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. 👉 https://Beed.gov.in
बीड जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय पत्ता: अधिक माहितीसाठी येथे संपर्क करू शकता. 👇
जायभाये हाउसिंग सर्विसेस, Kushi nagar, Kranti colony, महात्मा फुले नगर, बीड, महाराष्ट्र 431122