धाराशिव जिल्हा (उस्मानाबाद) Online 7/12|जिल्हा निवडा धाराशिव (उस्मानाबाद), उस्मानाबाद जिल्हा सातबारा उतारा

नमस्कार शेतकरी बांधवांनो, सदर मालिकेतील आपला जिल्हा आहे धाराशिव (उस्मानाबाद) आज आपण धाराशिव जिल्ह्यातील डिजिटल सातबारा विषयी संपूर्ण माहिती अगदी संक्षिप्त स्वरूपात घेणार आहोत. सर्वप्रथम आपण डिजिटल सातबारा म्हणजे काय? हे पाहणार आहोत. त्यानंतर डिजिटल सातबाराचे फायदे, डिजिटल सातबारा आहे कोणत्या पद्धतीने आपण डाउनलोड करू शकतो याची माहिती सविस्तरपणे आपण पाहणार आहोत. शासनाने डिजिटल सातबारा आहे नागरिकांसाठी मोफत पाहण्याची सोय केली आहे. मोफत सातबारा कसा पहायचा याबद्दल आपण सविस्तर पाहूया.

डिजिटल सातबारा विषयी थोडक्यात…

डिजिटल सातबारा म्हणजे जमिनीच्या मालकीची संपूर्ण माहिती अगदी अचूक स्वरूपात संगणकावर संग्रहित केलेली एक डिजिटल नोंद होय. डिजिटल सातबारा मध्ये जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीचा मालक, जमिनीच्या चतुर सीमा यासारखी जमिनीची संपूर्ण माहिती असते. जमिनीची डिजिटल नोंद ही शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होत असल्यामुळे ही माहिती अगदी अचूक स्वरूपात मिळत असते. ज्याप्रमाणे आपण आपले पैसे बँकेत ठेवतो तेव्हा त्या पैशाची नोंद ही डिजिटल स्वरूपात होत असते त्याप्रमाणे जमिनीची ही सर्व माहिती आता डिजिटल स्वरूपात ठेवले जाते.

डिजिटल सातबारा फायदे

  • डिजिटल स्वरूपात जमिनीची माहिती मिळत असल्यामुळे नागरिकांना घरबसल्याच संपूर्ण माहिती मिळत आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासत नाही त्यामुळे त्यांच्या वेळेमध्ये बचत होते.
  • डिजिटल स्वरूपातील माहिती ही ऑनलाइन असल्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार होत नाही. त्यामुळे डिजिटल सातबारा हे पारदर्शक आहेत.
  • जमिनीच्या नोंदी या डिजिटल स्वरूपात असल्यामुळे नागरिकांना कागदपत्रे हरवण्याची भीती नाही.
  • नागरिकांना कधीही आणि कोठेही डिजिटल स्वरूपातील जमिनीची माहिती मिळवता येऊ शकते.

डिजिटल सातबाराच्या माध्यमातून जमिनीची मिळणारी माहिती

सातबाराच्या माध्यमातून नागरिकांना जमिनीचे संपूर्ण माहिती मिळते.

१. जमिनीचे क्षेत्रफळ

२. जमिनीचे वर्गीकरण

३. जमिनीची हद्द

४. जमिनीचा मालक

त्याचबरोबर जमीन विषयक इतर संपूर्ण माहिती डिजिटल सातबाराच्या माध्यमातून मिळते.

धाराशिव जिल्हा(उस्मानाबाद) डिजिटल सातबारा

धाराशिव जिल्ह्यातील डिजिटल सातबारा मोफत कसा पाहायचा?

महाराष्ट्र शासन आणि महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून धाराशिव जिल्ह्यातील सातबारा मोफत पाहू शकतो. याविषयीची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप पाहूया.

  • सर्वप्रथम आपणाला महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.👇👇👇 https://bhulekh.mahabhumi.gov.in
  • संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा विभाग निवडा व Go या बटणावर क्लिक करा. (छत्रपती संभाजीनगर विभाग)
  • त्यानंतर तुम्हाला जिल्हा धाराशिव निवडावा लागेल.
  • जिल्हा निवडल्यानंतर खाली तालुक्याचा पर्याय दिसेल तिथे तुमचा तालुका निवडा.
  • तालुका निवडल्यानंतर खाली तालुक्यात असणाऱ्या सर्व गावांची यादी तुमच्या गावाचे नाव शोधून त्यावर क्लिक करा.
  • नंतर तुम्हाला सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकून किंवा पहिले नाव, मधले नाव, आडनाव किंवा संपूर्ण नाव टाकून सातबारा शोधू शकता.
  • त्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ७/१२ शोधा या बटणावर क्लिक करा.
  • दिलेला कॅप्च्या व्यवस्थित भरा. आणि free captcha to view 7/12 या बटनावर क्लिक करा.
  • नंतर सर्वात शेवटी तुम्हाला तुमचा सातबारा स्क्रीनवर दिसेल.

या माहितीच्या आधारे तुम्ही सातबारा अगदी मोफत पणे आणि निशुल्क पाहू शकता.

धाराशिव जिल्हा डिजिटल सातबारा डाऊनलोड कसा करायचा?

धाराशिव जिल्ह्यातील डिजिटल सातबारा डाउनलोड कशा पद्धतीने करता येतो त्याबाबत ची संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत. डिजिटल स्वरूपातील सातबारा हा आपणाला डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करता येतो. या डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड केलेल्या सातबारा उताऱ्यावर गाव कामगार तलाठ्याची स्वाक्षरी व शिक्का घेण्याची गरज नसते. डिजिटल स्वाक्षरीसह मिळणारे कोणतेही कागदपत्रे कायदेशीर मानले जाते. डिजिटल स्वाक्षरीसह सातबारा कसा डाऊनलोड करायचा ते आपण सविस्तर पाहूया.

  • सर्वप्रथम आपणाला भूमी अभिलेख विभागाच्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.👇👇👇 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला प्रथम या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून send OTP या बटणावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेला OTP हा Enter OTP  रकान्यामध्ये भरावा लागेल आणि त्यानंतर Verify OTP या बटणावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीसह सातबारा डाउनलोड करायचा असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला Net banking वरून किंवा debit/credit card वरून 15 रुपये रिचार्ज करावा लागेल. Recharge account या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संबंधित शुल्क भरता येईल.
  • त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा निवडावाचा आहे.
  • त्यानंतर तालुका निवडा.

  • नंतर गाव निवडा.
  • नंतर सर्वे नंबर किंवा गट नंबर टाका.
  • वरील सर्व माहिती अचूक स्वरूपात त्याच बरोबर पंधरा रुपये शुल्क भरल्यानंतर तुम्हाला तुमचा सातबारा उतारा डिजिटल स्वाक्षरीसह डाउनलोड करून घेता येईल.

वरील माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या शेतजमिनीचा सातबारा उतारा हा अगदी कमी शुल्क देऊन डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करून घेऊ शकता. हा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड केलेला सातबारा हा तुम्हाला कायदेशीर कामासाठी उपयोगी पडतो.

धाराशिव जिल्हा(उस्मानाबाद)जुने सातबारा व फेरफार

धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र शासनाने जमिनीच्या संदर्भातील जुनी सातबारा व फेरफार कसे मोफत पहायचे त्याचबरोबर नाममात्र शुल्क देऊन कोणत्या पद्धतीने डाउनलोड करायचे या सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. जुने सातबारा व फेरफार हे जमिनीची ऐतिहासिक नोंद ठेवण्याबरोबरच, जमिनीची खरेदी विक्री वारसा हक्क बक्षीस पत्र या कारणामुळे जमिनीच्या मालकी हक्कात झालेल्या बदलाची माहिती ही अचूक रित्या मिळते.

धाराशिव जिल्हा जुने सातबारा व फेरफार कसे डाउनलोड करायचे? मोफत पणे कसे पाहायचे?

  • धाराशिव जिल्ह्यातील जुने सातबारा व फेरफार पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम भूमी अभिलेख विभागाच्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.👇👇👇 https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in
  • ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम login करावे लागेल.
  • Login केल्यानंतर तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर ही माहिती या ठिकाणी भरावी लागेल.
  • नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला धाराशिव जिल्ह्यातील कोणत्या जमिनीचा जुना सातबारा व फेरफार पाहायचा आहे किंवा डाऊनलोड करायचा आहे त्या जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर, गावाचे नाव, तालुका ही माहिती भरायची आहे.
  • सदरची माहिती तुम्ही अचूक भरल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर संबंधित जमिनीचा जुना सातबारा व फेरफार दिसेल.
  • त्यानंतर तुम्ही संबंधित जमिनीचा जुने सातबारा व फेरफार डाऊनलोड करून घेणार असाल तर download या option वर क्लिक करून PDF स्वरूपात ही कागदपत्रे download करून घेऊ शकता. त्याचबरोबर या कागदपत्रांची तुम्ही print ही काढून घेऊ शकता.
  • संबंधित कागदपत्रे ही डाऊनलोड करण्यापूर्वी तुम्हाला 15 रुपये इतके शुल्क net banking/debit/credit card द्वारे भरावे लागेल.

वरील माहितीच्या आधारे तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील कोणत्याही शेत जमिनीचे जुने सातबारा व फेरफार अगदी मोफत पणे विना शुल्क पाहू शकता. पण जर हेच दस्तऐवज तुम्हाला डाऊनलोड स्वरूपात हवे असतील तर १५ रुपये इतके नाममात्र शुल्क भरावे लागेल. जुने सातबारा व फेरफार हे खूपच महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. कारण या दस्तऐवजांच्या आधारे जमिनीचे वाद, त्याचबरोबर इतर कायदेशीर बाबींसाठी महत्त्वाचे पुरावे म्हणून हे दस्तऐवज काम करतात.

सदरच्या लेखामध्ये आपण धाराशिव जिल्ह्यातील डिजिटल सातबारा याविषयीची संपूर्ण माहिती अगदी संक्षिप्त स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या जमिनीची कागदपत्रे ही डिजिटल स्वरूपात मिळवणे तुम्हाला सोपे जाईल. धन्यवाद!

धाराशिव जिल्हा (उस्मानाबाद) अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या. 👉https://osmanabad.gov.in

धाराशिव जिल्हा (उस्मानाबाद) भूमी अभिलेख कार्यालय पत्ता: COLLECTOR OFFICE CAMPUS, Indira Colony, Dharashiv (Osmanabad), Maharashtra 413501

Leave a Comment