नमस्कार मित्रांनो, सदरच्या लेखांमध्ये आज आपण आपल्या किंवा भारतातील कोणत्याही गावाचा नकाशा कसा पाहायचा किंवा कसा काढायचा याबद्दलची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. नकाशा बघण्यासाठी किंवा काढण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू झाली आहे. या ऑनलाइन सुविधांच्या माध्यमातून आपण गट नकाशा काढू शकतो त्याचबरोबर गाव नकाशा, जमिनीचा आणि प्लॉटचा नकाशा इ. नकाशे ऑनलाईन सुविधेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो किंवा काढू शकतो.
आपण या लेखांमध्ये फक्त गावाचा नकाशा कसा पाहायचा किंवा कसा काढायचा याबद्दलची माहिती पाहूया. गाव नकाशा पाहण्याच्या अनेक पद्धती आहेत. आजच्या डिजिटल युगात आपण आपल्या संगणक किंवा स्मार्टफोनवरून आपल्या गावाचा नकाशा पाहू शकतो यासाठी अनेक ऑनलाईन साधने उपलब्ध आहेत.
गाव नकाशा पाहण्यासाठीची आवश्यक माहिती
गावचा नकाशा पाहण्यासाठी खालील गोष्टी ची माहिती असणे आवश्यक आहे.
- राज्याचे नाव
- जिल्ह्याचे नाव
- तहसील किंवा तालुक्याचे नाव
- गावाचे नाव
ऑनलाइन पद्धतीने गाव नकाशा पाहण्याचे मार्ग
गुगल मॅप (Google map)
- गुगल मॅप हा गाव नकाशा पाहण्यासाठी चा सर्वात लोकप्रिय आणि सोपा मार्ग आहे.
- आपल्याला सर्वप्रथम आपल्या गावाचे नाव Search या बॉक्समध्ये टाईप करावे लागेल आणि त्यानंतर Enter बटन दाबावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला Google map वर तुमच्या गावची सॅटेलाइट इमेज, गावातील रस्त्याचे नकाशे आणि इतर माहिती Google map द्वारे पाहू शकता.
- तुम्ही zoom in/out करून, नकाशा फिरवून आणि इतर वेगवेगळ्या दृश्यामध्ये स्विच करून नकाशा अधिक तपशीलवारपणे पाहू शकता.
महाभुलेख च्या अधिकृत वेबसाईट द्वारे
१. महाभुलेखच्या अधिकृत वेबसाईट द्वारे गावाचा नकाशा पाहता येतो. त्यासाठी तुम्हाला 👉https://mahabhumi.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
२. या वेबसाईटवर तुम्हाला इंग्रजी किंवा मराठी या दोन्ही भाषेचे संदर्भ दिसतील त्यातून तुम्हाला जी भाषा निवडायची आहे ती भाषा निवडू शकता.
३. त्यानंतर सशुल्क सेवेच्या खाली आपणाला महा भू नकाशा (गाव भू मापन नकाशा) या बटनावर क्लिक करायचे आहे.
४. महा भू नकाशा यावर क्लिक केल्यानंतर लगेच एक नवीन लिंक सुरू होईल, तेथून आपण दुसऱ्या वेबसाईटवर जाऊया.
५. नवीन लिंक द्वारे आपण ज्या दुसऱ्या वेबसाईटवर जाऊ तेथे आपणाला डाव्या बाजूला राज्य हा पर्याय दिसेल. तेथून आपण महाराष्ट्र पर्याय निवडायचा आहे.
६. त्यानंतर आपणाला जर ग्रामीण भागातील गावाचा नकाशा पाहायचा असेल तर रुरल(rural) हा ऑप्शन निवडा, आणि जर शहरी भागाचा नकाशा पाहायचा असेल तर अर्बन(urban) ऑप्शन निवडा.
७. त्यानंतर आपणाला जिल्हा निवडायचा आहे.
८. त्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे.
९. त्यानंतर गाव किंवा क्षेत्र निवडायचे आहे. (गावाचे भरपूर पर्याय असल्यामुळे आपणाला अचूक गाव निवडायचा आहे.)
१०. गावाचे नाव यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला गावाचा नकाशा दिसून येईल.
११. जर तुम्ही मोबाईलद्वारे गाव नकाशा पाहत असाल तर होमच्या बाजूला एक त्रिकोण एरो दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गावचा नकाशा दिसून येईल.
आपण वर पाहिलेल्या माहितीमध्ये गाव नकाशा कसा पाहायचा ही माहिती पाहिली आहे. आता आपण शहराचा नकाशा कसा पाहायचा हे पाहूया.
१. शहरी भागाचा नकाशा पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कॅटेगरीमध्ये अर्बन असे सिलेक्ट करायचे आहे. जेणेकरून आपणाला शहरी भागाचा नकाशा पाहता येतो.
२. त्यानंतर आपण जिल्हा निवडायचा आहे.
३. जिल्हा निवडल्यानंतर आपणाला तालुका निवडायचा आहे.
४. त्यानंतर शहराचे नाव निवडून city map सिलेक्ट करायचा आहे.
५. City map सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शहराचा नकाशा दिसून येईल.
भुवन प्रणालीचा वापर करून गाव नकाशा कसा पाहायचा?
- सर्वप्रथम भुवनच्या या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.👇 https://bhuvan.nrsc.gov.in
- त्यानंतर वेबसाईटच्या मुख्य पेजवर तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. या सर्च बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या गावाचे नाव, पिन कोड किंवा जिल्ह्याचे नाव टाईप करा.
- त्यानंतर तुम्हाला तुम्ही सर्च केलेले गाव सर्च रिझल्ट मध्ये दिसून येईल त्यावर क्लिक करा.
- सर्वात शेवटी तुमच्यासमोर तुमच्या गावाचा उपग्रह प्रतिमा असलेला नकाशा उघडेल. तुम्ही तो नकाशा झूम इन/आऊट करू शकता, आणि वेगवेगळे लेयर्स (जसे की रस्ते, नद्या, जमिनीचा वापर) जोडू शकता.
थर्ड पार्टी एप्लीकेशन आणि वेबसाईट
आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये अनेक थर्ड पार्टी एप्लीकेशन आणि वेबसाइट्स बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. ज्यांच्या माध्यमातून आपणाला गावचा नकाशा पाहता येतो. या ॲप्लिकेशन्स मध्ये अनेक अतिरिक्त माहिती उपलब्ध केली आहे. जसे की गाव नकाशा बरोबरच गावांमधील जमिनीची माहिती यामध्ये जमिनीची किंमत, जमिनीची मालकी इत्यादी माहिती मिळते.
ऑफलाइन पद्धतीने गाव नकाशा पाहण्याचे मार्ग
तहसील कार्यालय
तुम्ही ज्या तहसील कार्यालयाच्या आखत्यारीत येता त्या कार्यालयामध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून तुमच्या गावाचा नकाशा संबंधित शुल्क भरून पाहू शकता.
ग्रामपंचायत कार्यालय
तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयातूनही गावचा नकाशा उपलब्ध करून पाहू शकता. या ठिकाणीही तुम्हाला गाव नकाशा पाहण्यासाठीचे संबंधित शुल्क भरावे लागते.
भूमापन विभाग
तुम्ही तुमच्या संबंधित जिल्ह्याच्या भूमापन विभागात जाऊन तुमच्या गावचा नकाशा विस्तृत स्वरूपात पाहू शकता. नकाशा पाहण्यासाठी चे संबंधित शुल्क तुम्हाला भरावे लागते.
वरील माहितीचा संदर्भ घेऊन भारतातील कोणताही नागरिक स्वतःच्या किंवा कोणत्याही गावाचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो. यासाठी कोणत्याही प्रकारचा चार्ज लागत नाही. त्याचबरोबर शेतीविषयक व्यवहार किंवा इतर बाबींसाठी गावचा नकाशा ऑनलाइन पद्धतीने पाहता येतो.