नमस्कार, आज आपण नाशिक प्रशासकीय विभागातील जळगाव जिल्ह्याचा डिजिटल सातबारा (7/12) याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जळगाव जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जळगाव जिल्हा महाराष्ट्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून डिजिटल सातबाराच्या दिशेने यशस्वीरित्या पाऊल टाकत आहे. डिजिटल 7/12 चा मुख्य उद्देश म्हणजे जमिनी संबंधित नोंदणीचे संगणकीकरण करणे आणि नागरिकांना त्यांच्या जमिनीची माहिती डिजिटल सातबारा स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे.
म्हणूनच, आज आपण जळगाव जिल्ह्यातील डिजिटल सातबारा विषयीची संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात सदरच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने आपण डिजिटल सातबारा म्हणजे काय? डिजिटल सातबारा चे फायदे, डिजिटल सातबारा चे महत्व, मोफत डिजिटल सातबारा कसा पाहायचा? डिजिटल स्वाक्षरीसह डिजिटल सातबारा हा कोणत्या पद्धतीने डाउनलोड करायचा? त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जळगाव जिल्ह्यातील जुने सातबारा व फेरफार याविषयीची संपूर्ण माहिती आपण संक्षिप्त रूपात पाहणार आहोत.
डिजिटल सातबारा म्हणजे काय?
डिजिटल सातबारा म्हणजे जमिनीची संपूर्ण माहिती ही शासनाच्या किंवा जमिनीच्या संबंधित खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर डिजिटल स्वरूपात संग्रहित किंवा गोळा केलेली असते त्याला डिजिटल सातबारा असे म्हणतात. सदरची डिजिटल स्वरूपातील माहितीच्या आधारे नागरिक त्यांच्या जमिनीची संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने मिळू शकतात. डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन माहिती ही पारदर्शक आणि अचूक स्वरूपात उपलब्ध होते. या माहितीच्या आधारे जमिनीची खरेदी विक्री त्याचबरोबर हस्तांतर प्रक्रिया अधिक पारदर्शक होताना दिसते.
डिजिटल सातबारा फायदे
- जमिनीची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात मिळत असल्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचतो. त्याचबरोबर जमिनीच्या नोंदी करण्यासाठी भटकंती करण्याची ही गरज भासत नाही.
- जमिनीच्या नोंदी या डिजिटल स्वरूपात शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्यामुळे त्या सुरक्षित असतात, डिजिटल सातबारा ची नक्कल करता येत नाही. त्याचबरोबर ही माहिती वेळोवेळी अपडेट होत राहते.
- डिजिटल सातबारा वर मिळणारी माहिती अचूक स्वरूपात असते.
- जमिनीची संपूर्ण माहिती ही डिजिटल स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत असल्यामुळे नागरिकांच्या पैशाची बचत होते.
- डिजिटल सातबारा चा महत्वाचा फायदा म्हणजे हे सातबारा नागरिकांना कधीही आणि कोठेही उपलब्ध होतात.
डिजिटल सातबाराच्या माध्यमातून जमिनीची कोणती माहिती मिळू शकते?
- जमिनीचा मालक
- जमिनीचे क्षेत्रफळ
- जमिनीचा नकाशा
- जमिनीची चतुर सीमा
- जमिनीचे वर्गीकरण
- जमिनीवरील कर्ज किंवा बोजा
- जमिनीशी संबंधित इतर सर्व माहिती
डिजिटल सातबाराच्या माध्यमातून करता येणारी कामे
- जमिनीशी संबंधित सर्व व्यवहारही ऑनलाईन पद्धतीने केले जाऊ शकतात.
- जमीन खरेदी विक्रीची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येते.
- नागरिकांना त्यांच्या जमिनीचा सातबारा ऑनलाइन पद्धतीने मोफत पाहता येतो, त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करता येतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण खाली पाहणारच आहोत.
जळगाव जिल्हा डिजिटल सातबारा
जळगाव जिल्ह्यातील डिजिटल सातबारा हा नागरिकांना मोफत पाहण्याची सोय महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर केली आहे. मोफत सातबारा पाहण्याबरोबरच महाराष्ट्र शासनाने डिजिटल स्वाक्षरीसह डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्याची सोय केली आहे.
प्रशासनावर पडणारा कामाचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी शासनाकडून उचललेले हे एक पाऊल आहे. डिजिटल सातबारा कसा डाऊनलोड करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण खाली सविस्तर पाहणारच आहोत.
जळगाव जिल्ह्यातील डिजिटल सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करण्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती
जळगाव जिल्ह्यातील डिजिटल सातबारा नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीसह अगदी सोप्या पद्धतीने डाऊनलोड करता येते. डिजिटल सातबारा सोप्या पद्धतीने कसा डाऊनलोड करायचा याबद्दलची माहिती आपण खाली सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना डिजिटल सातबारा डाऊनलोड करताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
- जळगाव जिल्ह्यातील डिजिटल सातबारा डिजिटल स्वाक्षरी सह डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर जावे लागेल.👇👇👇 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
- मोबाईल नंबर टाकून send OTP बटणावर क्लिक करा.
- मोबाईलवर आलेला OTP हा नंतर Enter OTP या चौकटीमध्ये भरा आणि त्यानंतर verify OTP बटनावर क्लिक करा.
- डिजिटल सातबारा हा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करायचा असल्यामुळे Net Banking/Debit/Credit Card वरून पंधरा रुपये रिचार्ज करावा लागेल. Recharge Account बटनावर क्लिक करून संबंधित शुल्क भरता येईल.
- जळगाव जिल्हा निवडा.
- तालुका निवडा.
- गाव निवडा.
- सर्वे नंबर किंवा गट नंबर टाका.
- वरील सर्व माहिती अचूक भरल्यानंतर व 15 रुपये शुल्क ऑनलाईन pay केल्यानंतर डिजिटल स्वरूपातील सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह डाउनलोड करून घेता येईल.
वरील माहितीच्या आधारे जळगाव जिल्ह्यातील नागरिक किंवा शेतकरी डिजिटल सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करून घेऊ शकता. डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड केलेला सातबारा हा कायदेशीर कामांसाठी ग्राह्य मानला जातो. डिजिटल सातबाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या सातबारावर संबंधित अधिकाऱ्याची वेगळी अशी स्वाक्षरी व शिक्का घेण्याची गरज नसते.
जळगाव जिल्हा डिजिटल सातबारा मोफत पाहण्याची स्टेप बाय स्टेप माहिती
- जळगाव जिल्ह्यातील डिजिटल सातबारा मोफत पाहण्यासाठी सर्वप्रथम महसूल विभागाच्या या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.👇👇👇 https://bhulekh.mahabhumi.gov.in
- संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्वप्रथम विभाग निवडून Go या बटणावर क्लिक करा. (नाशिक विभाग)
- त्यानंतर जळगाव जिल्हा निवडा.
- तालुका निवडा.
- तालुका निवडल्यानंतर खाली त्या तालुक्यातील संपूर्ण गावांची यादी दिसेल, या यादीमध्ये तुमच्या गावाचे नाव शोधून त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकून किंवा पहिले नाव, मधले नाव, आडनाव किंवा संपूर्ण नाव टाकून सातबारा पाहता येतो.
- त्यानंतर मोबाईल नंबर टाकून ७/१२ शोधा या बटणावर क्लिक करा.
- दिलेला कॅप्च्या अचूक भरा. त्यानंतर verify captcha to view 7/12 वर क्लिक करून तुम्हाला मोफत सातबारा पाहता येईल.
वरील माहितीच्या आधार घेऊन जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही जमिनीचा सातबारा हा मोफत पणे पाहता येतो. नागरिकांना हा सातबारा फक्त पाहताच येतो. त्याचा वापर कोणत्याही कायदेशीर कामासाठी करता येत नाही.
जळगाव जिल्हा जुने सातबारा व फेरफार
जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र शासनाने जमिनीचे जुने सातबारा व फेरफार ऑनलाइन पद्धतीने मोफत पाहण्याची सोय त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर केली आहे. जुने सातबारा व फेरफार डाऊनलोड कसे करायचे याबद्दलची ही सविस्तर माहिती संबंधित संकेतस्थळावर शासनाकडून उपलब्ध करून दिली आहे. जुने सातबारा व फेरफार हे जमिनीची एक ऐतिहासिक नोंद ठेवण्याचे काम करतात. जुने सातबारा व फेरफार यांच्या माध्यमातून जमिनीमध्ये कालांतराने झालेले बदल मालकी हक्क यांची संपूर्ण माहिती मिळते. जुने सातबारा व फेरफार यांच्या आधारित दस्तऐवजांची सत्यता पडताळली जाते. जळगाव जिल्ह्यातील जुने सातबारा व फेरफार मोफत कसे पाहायचे त्याचबरोबर डाऊनलोड कसे करायचे याबद्दलची सविस्तर माहिती पाहू.
जळगाव जिल्हा जुने सातबारा व फेरफार मोफत कसे पाहायचे? डाउनलोड कसे करायचे?
- जळगाव जिल्ह्यातील जुने सातबारा व फेरफार मोफत पाहण्यासाठी त्याच बरोबर डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम भूमी अभिलेख विभागाच्या या संकेतस्थळावर जावे लागेल.👇👇👇 https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in
- सर्वप्रथम लॉगिन करावे लागेल.
- लॉगिन केल्यानंतर नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी करण्यासाठी संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर ही माहिती अचूक स्वरूपात भरावी लागेल.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील ज्या जमिनीचा जुना सातबारा व फेरफार पाहायचा आहे किंवा डाऊनलोड करायचा आहे त्या जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर, गावाचे नाव, तालुका ही माहिती अचूक स्वरूपात भरायची आहे.
- दिलेला कॅप्च्या व्यवस्थित भरून घ्यायचा आहे.
- त्यानंतर संबंधित जमिनीचा जुना सातबारा व फेरफार तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तेथून तुम्ही जुना सातबारा व फेरफार मोफत पाहू शकता.
- जमिनीचा जुना सातबारा फेरफार नागरिकांना डाऊनलोड स्वरूपात हवा असेल, नागरिक download option वर क्लिक करून PDF स्वरूपात ही कागदपत्रे डाऊनलोड करू शकता.
- जुने सातबारा व फेरफार डाऊनलोड करण्यासाठी संबंधित व्यक्तीला पंधरा रुपये इतके शुल्क Net Banking/Credit/Debit Card द्वारे भरावे लागतील.
वरील माहितीच्या आधारे जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही जमिनीचा जुना सातबारा अगदी मोफत पाहता येतो. त्याचबरोबर ही कागदपत्रे तुम्हाला डाउनलोड स्वरूपात हवी असतील तर १५ रुपये इतके नाममात्र शुल्क भरून हे दस्तऐवज डाउनलोड करून घेता येतात. जुने सातबारा व फेरफार हे जमिनीच्या कोणत्याही वादा संदर्भात एक महत्त्वाचा व भक्कम पुरावा म्हणून काम करतात.
सदरच्या लेखांमध्ये आपण जळगाव जिल्ह्यातील डिजिटल सातबारा विषयीची संपूर्ण माहिती अगदी सविस्तरपणे आणि अचूक देण्याचा प्रयत्न केला आहे. या माहितीच्या आधारे जळगाव जिल्ह्यातील नागरिक हे त्यांच्या जमिनीचे सातबारा ऑनलाइन पद्धतीने मिळवू शकतील. धन्यवाद!