जमीन नोंदणी कशी केली जाते| जमिनीचा खरेदी खत कसा करावा

नमस्कार मित्रांनो, आज आपण जमीन नोंदणी प्रक्रिया काय आहे? याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आजच्या काळात जमिनीचे व्यवहार झाल्यानंतर जमीन खरेदी करणारी व्यक्ती ही लगेचच जमिनीची नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक आहे असे मानतात. त्याविषयीच आपण आज सविस्तर मध्ये जमीन नोंदणी प्रक्रिया काय आहे? त्याचबरोबर जमिनीची नोंदणी करण्याचे फायदे, जमिनीची नोंदणी कशी करायची? जमिनीची ऑनलाईन नोंदणी कशी करायची? याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहूया.

जमीन नोंदणी म्हणजे काय?

जमिनीची नोंदणी ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे, एखाद्या व्यक्तीचे जमिनीवरील मालकी हक्क सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदवले जातात यालाच जमीन नोंदणी म्हणतात. भारतामध्ये नोंदणी कायदा,१९०८ नुसार जमिनीची नोंदणी करणे अनिवार्य आहे.

सध्याच्या काळामध्ये जमीन खरेदी केल्यानंतर लगेचच जमिनीची नोंदणी करून घेणे हे अत्यंत गरजेचे आणि खूपच आवश्यक आहे. जमीन नोंदणी करणे ही बाब खूपच महत्त्वाची आहे याचे कारण म्हणजे आपल्या आयुष्याची बचत काही लोक जमीन खरेदी करण्यासाठी गुंतवतात काही वेळा महागडी जमीन खरेदी करण्यासाठी घरातील दाग दागिने गहाण ठेवतात त्यामुळे जमीन खरेदी केल्यानंतर लगेचच ची नोंदणी करणे खूपच गरजेची आणि आवश्यक आहे असे हे लोक मानतात. जर का जमिनीच्या व्यवहारामध्ये काही फसवणूक झाली तर त्यांच्या हातामधून त्यांचे भांडवल आणि जमीन दोन्हीही निघून जाण्याची शक्यता असू शकते त्यामुळे लगेचच जमीन नोंदणी करणे खूपच महत्त्वाचे आहे नाहीतर अशा परिस्थितीमध्ये जमीन ही जाईल शिवाय त्या जमिनीवर ते गुंतवलेला पैसा सुद्धा बुडेल आणि नंतर कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळेच जमीन नोंदणी ही प्रक्रिया खूपच महत्त्वाची आहे.

जमीन नोंदणी करण्याचे फायदे

  • जमिनीची नोंदणी ही तुमचा जमिनीवरील मालकी हक्क हा कायदेशीर पुरावा आहे हे दर्शवते.
  • नोंदणी केल्यामुळे तुमची जमीन दुसऱ्याच्या नावावर विकली जाण्यापासून किंवा ती गहाण ठेवण्यापासून सुरक्षित राहते.
  • बँका आणि इतर आर्थिक संस्था या जमिनीवर कर्ज देण्यासाठी नोंदणी करत जमिनीला प्राधान्य देतात.
  • नोंदणी असलेल्या जमिनीची किंमत ही नोंदणी नसलेल्या जमिनीपेक्षा कधीही जास्तच असते.
  • नोंदणी झालेल्या जमिनीची भविष्यामध्ये मालकी हक्काबाबत काही वाद निर्माण झाल्यास हा वाद टाळण्यास या नोंदणी द्वारे मदत होते.

वरील फायदे हे नोंदणी केल्यामुळे होतात त्यामुळे जमीन नोंदणी करणे हे खूपच महत्त्वाचे आहे,यामुळे सरकारी योजना, बँकेकडून मिळणारी कर्जे यासाठी नोंदणी खूप महत्त्वाची आहे.

जमीन नोंदणी करण्याची प्रक्रिया

जमिनीची नोंदणी करण्याची प्रक्रिया प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळी असू शकते, तरीपण सर्वसामान्य प्रक्रिया ही असू शकते ती खालील प्रमाणे.

जमिनीची नोंदणी करण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे

१. जमिनीचा खरेदी करार

२. ७/१२ उतारा

३. जमीन इतरांच्या नावावर नसल्याची पुष्टी (NOC)

४. मालमत्तेची कर पावती

५. ओळखपत्र

६. पत्त्याचा पुरावा

वरील कागदपत्रे जमीन नोंदणी करण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

जमीन नोंदणी प्रक्रिया खालील प्रमाणे

  • सर्वप्रथम तुम्हाला वरील कागदपत्रे एकत्रित करावी लागतील.
  • त्यानंतर तुम्हाला जमिनीच्या किंमतीवर आधारित नोंदणी शुल्क भरावे लागेल.
  • तुम्ही एकत्रित केलेली कागदपत्रे आणि नोंदणी शुल्क जमा करून जमिनीच्या नोंदणीसाठी अर्ज सादर करायचा आहे.
  • तुमचा अर्ज आणि कागदपत्रे तपासणी करून नोंदणी अधिकारी तुमची नोंदणी मंजूर करतील.
  • नोंदणी अधिकाऱ्याकडून नोंदणी मंजूर झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचे नोंदणी प्रमाणपत्र मिळेल.
Land Registration Jamin Nondani

वरील नोंदणी प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमच्या जमिनीची नोंद करू शकता.

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया

भारतातील काही राज्यांमध्ये जमिनीची नोंदणी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे ही होऊ शकते.यासाठी तुम्हाला संबंधित राज्याच्या नोंदणी विभागाच्या संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे. पण या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी विभाग वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया करू शकता.👇 https://igrmaharashtra.gov.in                            वरील संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही तुमच्या जमिनीची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

जमीन खरेदी खत

जमिनीची खरेदी खत हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे. जे की विक्रेत्याकडून खरेदी दाराकडे जमिनीच्या मालकी हक्काचे हस्तांतरण नोंदवते.

जमिनीचे खरेदीखत तयार करण्याची प्रक्रिया

आवश्यक कागदपत्रे

  • जमिनीचा विक्रेता आणि खरेदीदार यांचे ओळखपत्र (यामध्ये आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स)
  • जमिनीची कागदपत्रे (७/१२ उतारा, खरेदी करार, मालमत्तेची कर पावती)
  • नगरपालिका/ग्रामपंचायत NOC
  • जमीन मोजणी नकाशा

मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क

जमिनीच्या खरेदी किंमतीवर आधारित तुम्हाला मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरावे लागेल. हे शुल्क तुमच्या राज्याच्या नोंदणी विभागाच्या नियमानुसार असेल.

खरेदी खत तयार करा

  • तुम्ही वकिलाची मदत घेऊन किंवा नमुना खरेदी खत वापरून स्वतः खरेदी खत तयार करू शकता.
  • खरेदी खतामध्ये खालील माहिती असणे आवश्यक आहे.

१. जमीन विक्रेता आणि जमीन खरेदीदाराची नावे आणि पत्ता

२. जमिनीचे संक्षिप्त स्वरूपातील वर्णन (सर्वेक्षण क्रमांक, जमिनीचे क्षेत्रफळ)

३. जमीन खरेदीची किंमत

४. जमीन विक्रीची तारीख

५. खरेदी खतामधील अटी आणि शर्ती

  • जमीन विक्रेता आणि जमीन खरेदीदार या दोघांची खरेदी खतावर स्वाक्षरी पाहिजे.

खरेदी खत नोंदणीकृत करा

  • तुम्ही तयार केलेले खरेदी खत आणि आवश्यक कागदपत्रे जमा करून तुमच्या जिल्ह्यातील नोंदणी कार्यालयात खरेदीखत नोंदणीसाठी अर्ज करा.
  • त्यानंतर नोंदणी शुल्क भरा.
  • नोंदणी अधिकारी तुमची कागदपत्रे तपासून खरेदी खत नोंदणीकृत करतील.
  • नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत खरेदी खताची प्रत मिळेल.

वरील माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या जमिनीचे खरेदी खत नोंदणीकृत करून घेऊ शकता.

जमिनीचे खरेदी खत रद्द कसे करावे?

विक्रेत्याला किंवा खरेदीदाराला खरेदी खत हे सहजपणे रद्द करता येत नाही. ज्या दुय्यम निबंधकाने या खरेदी खत व्यवहाराची नोंदणी केलेली असते त्याला सुद्धा हे खरेदीखत रद्द करण्याची अनुमती नसते. रजिस्टर झालेल्या मालमत्तेच्या रद्दीकरणासाठी तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करावा लागतो.

जमीन खरेदी खत अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.👇👇👇         https://igrmaharashtra.gov.in

Leave a Comment