आपण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांची डिजिटल सातबारा विषयीची माहिती पाहत आहोत. त्यामुळे आज आपण कोल्हापूर जिल्हा या जिल्ह्यातील संपूर्ण डिजिटल सातबारा याविषयीची माहिती पाहणार आहोत.
डिजिटल सातबारा म्हणजे काय? त्याचबरोबर डिजिटल सातबाराचे फायदे, कोल्हापूर जिल्ह्याचा डिजिटल सातबारा कसा डाऊनलोड करायचा? त्याचबरोबर डिजिटल सातबारा मोफत कसा पाहायचा? जुने सातबारा व फेरफार कसे पहायची त्याचबरोबर कसे डाउनलोड करायचे? याविषयीची संपूर्ण माहिती सदरच्या लेखांमध्ये आपण पाहूया. चला तर मग सविस्तर पाहू.
डिजिटल सातबारा म्हणजे काय?
सातबारा हा जमिनीचा एक असा दस्तऐवज आहे की त्यामधील जमिनीच्या मालकीची सर्व माहिती एकत्रितपणे आपणास मिळते. त्यामध्ये जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीचा मालक, जमिनीवरील कर्ज, जमिनीवरील हक्क इत्यादी माहिती या दस्तऐवजामध्ये एकत्रितपणे संग्रहित केलेले असते. डिजिटल सातबारा म्हणजे वरील माहिती डिजिटल स्वरूपात संगणकावर संग्रहित केली जाते आणि ती नागरिकांना ऑनलाइन पाहता येते.
नागरिकांना डिजिटल सातबारा हा डिजिटल स्वाक्षरीसह किंवा विना स्वाक्षरीसह उपलब्ध आहे. पण तुम्ही डिजिटल स्वाक्षरी शिवाय चा सातबारा हा फक्त माहितीचा स्त्रोत म्हणून वापरू शकता. त्याचबरोबर कायदेशीर कारणासाठी जर डिजिटल सातबारा हवा असेल तर तो डिजिटल स्वाक्षरीसह आवश्यक आहे.
डिजिटल सातबारा फायदे
१. डिजिटल स्वरूपातील सातबारा उपलब्ध असल्याने नागरिकांना सरकारी कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाही, त्यामुळे नागरिकांच्या वेळेमध्ये खूपच बचत होते.
२. डिजिटल स्वरूपात सातबारा संबंधित माहिती अगदी घरबसल्या मिळवता येते.
३. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर संबंधित माहिती मिळत असल्याने त्यामध्ये अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता असते.
४. डिजिटल स्वरूपातील रेकॉर्ड सहित अगदी अचूक आणि सुरक्षित असतात.
कोल्हापूर जिल्हा डिजिटल सातबारा
कोल्हापूर जिल्हा डिजिटल सातबारा डाऊनलोड कसा करायचा?
डिजिटल सातबारा आहे आपल्या जमिनीची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात आपल्यासमोर मांडणारे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. यामुळे आपण आपल्या जमिनीची संपूर्ण माहिती ही घरबसल्याच ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करून घेऊ शकतो. कोल्हापूर जिल्हा डिजिटल सातबारा ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड कसा करायचा याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहू.
- कोल्हापूर जिल्हा डिजिटल स्वरूपात सातबारा डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपणाला या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.👇👇👇 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
- नंतर तुम्हाला जिल्हा निवडावा लागेल. (कोल्हापूर जिल्हा)
- यानंतर तालुका निवडा.
- नंतर गाव निवडा.
- नंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा सातबारा क्रमांक टाकावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा सर्वे क्रमांक टाकावा लागेल.
- नंतर तुम्हाला कॅप्चा व्यवस्थितपणे भरून सर्च या बटनावर क्लिक करावे लागेल.
- सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या शेत जमिनीचा सातबारा दिसेल.
- त्यानंतर तो सातबारा तुम्ही download या option वर क्लिक करून PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.
- तुम्हाला हा सातबारा जर का डिजिटल सहीसह हवा असेल तर तुम्हाला पंधरा रुपये इतके नाममात्र शुल्क ऑनलाईन पद्धतीने pay करणे आवश्यक आहे.
वरील माहितीचा संदर्भ घेऊन तुम्ही तुमच्या शेतजमिनीचा डिजिटल स्वरूपातील सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून घेऊ शकता. हा सातबारा तुम्ही तुमच्या शेतजमिनीच्या कोणत्याही कायदेशीर बाबीसाठी वापरू शकता.
कोल्हापूर जिल्हा मोफत सातबारा
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेत जमिनीची सातबारा स्वरूपातील माहिती शासनाच्या विश्वसनीय संकेतस्थळावर संग्रहित केलेली आहे. हे सातबारा कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोफत पाहण्याची सुविधा महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जमिनीच्या संदर्भातील सातबारा स्वरूपातील माहिती घेण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज आता नागरिकांना भासणार नाही.
कोल्हापूर जिल्हा डिजिटल सातबारा मोफत कसा पाहायचा?
कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल सातबारा हे मोफत पाहण्याची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे.
- सर्वप्रथम आपणाला महाभुलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.👇👇👇 https://bhulekh.mahabhumi.gov.in
- या संकेतस्थळावरून तुम्ही विना स्वाक्षरीतील सातबारा त्याचबरोबर ८अ व मालमत्ता पत्रक पाहू शकता.
- त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा विभाग निवडावा लागेल.(पुणे विभाग)
- त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडावा लागेल. (जिल्हा निवडा कोल्हापूर)
- त्यानंतर तुम्हाला तालुका निवडावा लागेल.
- त्यानंतर गाव निवडावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या शेत जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला पोट खाते नंबर निवडावा लागेल.
- नंतर भाषा निवडावी लागेल. (अर्थातच मराठी)
- सर्वात शेवटी नोंदणीसाठी आपला दहा अंकी मोबाईल नंबर भरा.
- त्यानंतर सातबारा पहा या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर दिलेला कॅप्च्या अचूक भरा.
- कॅपच्या भरून झाल्यानंतर verify captcha to view 7/12 वर क्लिक करून तुम्ही तुमचा सातबारा अगदी मोफत पाहू शकता.
- तुम्ही तुमचे नाव,मधले नाव, आडनाव,संपूर्ण नाव या प्रोसेसद्वारेही सातबारा मोफत पाहू शकता ते तुम्हाला संकेतस्थळावर पाहता येईल.
वरील माहितीचा संदर्भ घेऊन तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही शेत जमिनीचा सातबारा अगदी मोफत पणे पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही.
कोल्हापूर जिल्हा जुने सातबारा व फेरफार
जुने सातबारा व फेरफार हे जमिनीच्या मालकी हक्काची ऐतिहासिक नोंद ठेवतात. जमिनीच्या खरेदी-विक्री, वारस,बक्षीस पत्र इत्यादी कारणामुळे जमिनीच्या मालकी हक्कात झालेल्या बदलांची अगदी अचूक रित्या माहिती मिळते.
कोल्हापूर जिल्हा जुने सातबारा वर फेरफार कसे डाउनलोड करायचे? किंवा कसे पाहायचे?
- जुने सातबारा व फेरफार डाऊनलोड करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आपणाला भूमी अभिलेख विभागाच्या या अधिकृत संकेतस्थळाला सर्वप्रथम भेट द्यावी लागेल.👇 https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in
- या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम लॉगिन करावी लागेल.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव लिहावे लागेल.
- नंतर तुमचा संपूर्ण पत्ता लिहावा लागेल.
- त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी भरावा लागेल.
- अशा रीतीने नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या जमिनीचे जुने दस्तऐवज किंवा सातबारा व फेरफार पाहायचे आहेत किंवा डाउनलोड करायचे आहेत त्या जमिनीचा सर्वे नंबर, त्याचबरोबर गावाचे नाव, तालुका ही माहिती भरायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला संबंधित जमिनीचे जुने सात बारा व फेरफार तुमच्या स्क्रीनवर दिसतील.
- या ठिकाणी तुम्ही संबंधित दस्तऐवज डाउनलोड करून घेणार असाल तर download या बटणावर क्लिक करून pdf स्वरूपात ही कागदपत्रे डाऊनलोड करून घेऊ शकता व प्रिंट स्वरूपातही काढून घेऊ शकता.
वरील माहितीचा संदर्भ घेऊन तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही शेत जमिनीचे जुने सातबारा व फेरफार मोफत पणे पाहू शकता त्याचबरोबर नाममात्र शुल्क भरून डाउनलोड करून घेऊ शकता. जुने सातबारा फेरफार हे जमिनीच्या वादात एक भक्कम पुरावा म्हणून मोलाची कामगिरी बजावत असतात.
सदरच्या लेखामध्ये आपण कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल स्वरूपातील सातबारा मोफत कसा पाहता येतो? त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरीसह डाउनलोड करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती आणि जुने सातबारा व फेरफार यासंबंधीत संपूर्ण माहिती सदरच्या लेखांमध्ये सविस्तरपणे पाहिले आहे. धन्यवाद!