Nashik जिल्हा Online 7/12, जिल्हा निवडा नाशिक

नमस्कार, आज आपण नाशिक जिल्ह्यातील डिजिटल स्वाक्षरी सातबारा डाऊनलोड कसा करायचा, त्याचबरोबर मोफत सातबारा कसा पहायचा आणि जुने सातबारा व फेरफार हे सुद्धा कसे पाहायचे याविषयी सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग नाशिक (Nashik 7/12) जिल्ह्या सातबारा विषयी सविस्तर माहिती पाहूया.

डिजिटल सातबारा चे महत्व

नाशिक जिल्ह्याचा डिजिटल सातबारा हा त्या जिल्ह्यातील जमिनीच्या नोंदींचा एक आधुनिक आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध असलेला डिजिटल दस्तऐवज आहे. यामध्ये जमिनीच्या मालकी हक्काचे अगदी सविस्तरपणे माहिती मिळते त्याचबरोबर जमिनीचा उपयोग कोणत्या कामासाठी होत आहे व कर भरण्यासंदर्भातील संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होते.

जमिनीची सर्व प्रकारची माहिती सार्वजनिक संकेतस्थळावर उपलब्ध असल्याने कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराची शक्यता खूप कमी होते, म्हणजेच यामध्ये पारदर्शकता दिसून येते. त्याचबरोबर नागरिकांना घरबसल्या आपल्या जमिनीची सर्व माहिती मिळवता येते. ऑनलाइन पद्धतीमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाही म्हणजेच नागरिकांच्या वेळीची बचत होते. जमिनीची सर्व माहिती ही डिजिटल स्वरूपात असल्यामुळे नागरिकांना कागदपत्र हाताळावे लागत नाहीत. डिजिटल सातबारा हा सुरक्षित संकेतस्थळावर मिळत असल्याने तो खराब होण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता अगदी कमी असते.

नाशिक जिल्हा डिजिटल सातबारा | ७/१२ जिल्हा निवडा नाशिक

नाशिक जिल्ह्यातील डिजिटल सातबारा डाउनलोड करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे. या माहितीच्या आधारे तुम्ही सातबारा हा डिजिटल स्वरूपात डाउनलोड करू शकता.

  • सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुम्हाला ओपन करावी लागेल.👇 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
  • त्यानंतर Username आणि Password प्रविष्ट करून लॉगिन करा
  • त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडावा लागेल. (नाशिक जिल्हा)
  • नंतर तालुका निवडा.
  • त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील तुमचे गाव निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा सातबारा पाहायचा असेल तर तुमच्या सातबाराचा नंबर टाका किंवा दुसऱ्या कोणाच्या नावाचा सातबारा पाहायचा असेल तर त्या सातबाराचा नंबर टाका.
Select Nashik
  • नंतरच्या सर्च बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या जमिनीचा सातबारा उतारा पाहणार आहात किंवा डाऊनलोड करणार आहात तो सातबारा उतारा स्क्रीनवर दिसेल.
  • तुम्हाला येथे सातबारा उतारा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करण्यासाठी १५ रुपये इतके नाममात्र शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • तुम्ही UPI, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाइन पेमेंट करू शकता
  • शुल्क भरल्यानंतर तुम्ही सातबारा उतारा pdf स्वरूपात डाऊनलोड करू शकता.

वरील माहितीचा आधार घेऊन तुम्ही  डिजिटल स्वाक्षरीसह सातबारा डाऊनलोड करू शकता त्यासाठी तुमच्याकडे तुमचा वैध असलेला ई-मेल आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. डिजिटल स्वरूपातील सातबारा हा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये मिळू शकतो.

नाशिक जिल्हा मोफत सातबारा | Nashik Free 7/12

नाशिक जिल्ह्यातील नागरिक व शेतकरी हे ऑनलाइन पद्धतीने सातबारा अगदी मोफत पणे पाहू शकतात. त्यासाठी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सातबारा कसा पहायचा हे खालील प्रमाणे पाहू.

  • सर्वप्रथम तुम्हाला महाभुलेख विभागाच्या या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. https://bhulekh.mahabhumi.gov.in
  • आता Select division या पर्यायामध्ये नाशिक हा विभाग निवडा
  • आता 7/12, फेरफार आणि मालमत्ता पत्र या पर्याया पैकी 7/12 निवडा
  • नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा पर्यायामध्ये नाशिक निवडावा लागेल.
  • त्यानंतर तालुका निवडा.
  • त्यानंतर गाव निवडा.
  • त्यानंतर सातबारा नंबर किंवा गट नंबर टाका.
Select Nashik district
  • नंतर सर्च बटनावर क्लिक करून तुम्हाला जो सातबारा पहायचा आहे तो सातबारा उतारा तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तुम्ही तो अगदी मोफत पणे पाहू शकाल.

वरील माहितीचा आधार घेऊन तुम्ही नाशिक जिल्ह्यातील कोणत्याही शेतजमिनीचा सातबारा अगदी मोफत पणे पाहू शकाल. मोफत सातबारा चा वापर जमिनीच्या कोणत्याही व्यवहारासाठी करू शकता.

नाशिक जिल्हा जुने सातबारा व फेरफार | Nashik Old Land Records

महाराष्ट्र शासनाने नागरिकांना जमिनीच्या संदर्भात जुने सातबारा व फेरफार कसे डाउनलोड करायचे त्याचबरोबर कसे पाहायचे या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे जुने सातबारा व फेरफार पाहण्यासाठी किंवा कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांना तहसील कार्यालयाच्या चकरा मारण्याची आता गरज नाही. त्यामुळे नागरिकांना अगदी घरबसल्या सोप्या पद्धतीने सर्व जुने दस्ताऐवज मिळत आहे

  • महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागाच्या या पोर्टलवरून तुम्ही अगदी सहज व सोप्या पद्धतीने जुने सातबारा व फेरफार ऑनलाइन पद्धतीने पाहू शकता किंवा डाऊनलोड करू शकता. https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in
  • नंतर तुम्हाला या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल.
E records archived documents
  • नोंदणी करताना तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. यामध्ये तुमचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि जी आवश्यक माहिती लागेल की तुम्हाला द्यावी लागेल.
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ज्या जमिनीचे जुने सातबारा व फेरफार पाहायचा आहे त्या जमिनीचा सर्वे नंबर, गावचे नाव, आणि तालुका ही माहिती भरायची आहे.
  • ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला संबंधित जमिनीचा जुना सातबारा व फेरफार स्क्रीनवर दिसून येईल.
  • या ठिकाणी तुम्ही संबंधित सातबारा व फेरफार pdf स्वरूपात तुम्ही डाऊनलोड करू शकता व प्रिंट काढून घेऊ शकता.

वरील माहितीच्या आधारे तुम्ही नाशिक जिल्ह्यातील कोणत्याही जमिनीचे जुने सातबारा व फेरफार अगदी सोप्या पद्धतीने पाहू शकता किंवा डाऊनलोड करून घेऊ शकता. जुने सातबारा व फेरफार डाऊनलोड करून घेण्यासाठी तुमच्याकडून नाममात्र शुल्क घेतले जाते. त्याचबरोबर जुने सातबारा व फेरफार हे अगदी पारदर्शी असल्यामुळे त्यामध्ये कोणताही गैरव्यवहार होत नाही.

Leave a Comment