जमिनीच्या संदर्भात कोणतेही काम किंवा व्यवहार करायचा असेल किंवा जर जमिनीच्या अधिकारात काही कारणास्तव बदल झाले असल्यास जुने फेरफार हे काढून टाकावे लागतात म्हणूनच तर फेरफार हा जमिनीच्या संदर्भातील कोणत्याही कामातील महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. फेरफार हा 7/12 मधील महत्वाचा घटक आहे.
फेरफार म्हणजे काय?
फेरफार म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जमीन अधिकार अभिलेखांमध्ये झालेला एक महत्त्वपूर्ण बदल होय. या सर्व बदलांची नोंद ही प्रामुख्याने फेरफार मध्ये केली जाते. फेरफार हा एक प्रामुख्याने कायदेशीर नमुना आहे जो गाव नमुना क्रमांक ६ तसेच नोंदीचा उतारा म्हणून देखील ओळखला जातो. गाव नमुना क्रमांक ६ चे अ ब क ड असे प्रामुख्याने चार प्रकार पडतात या फेरफार नमुन्यामध्ये जमिनीची खरेदी, विक्री, वारसदार हक्क आणि शेतजमिनीवरील बोजा लावल्याच्या ज्या नोंदी असतात त्या नोंदी प्रामुख्याने ठेवल्या जातात आणि फेरफार हा एक सातबाराचा महत्त्वाचा भाग आहे.
ई-फेरफार ऑनलाइन पद्धतीने कसे काढावे?
सध्या ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे काढणे खूपच सोपे झाले आहे. महसूल विभागातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने काढणे ही सरकारने खूपच सोपे केले आहे त्यामुळे प्रशासनावरील कामाचा ताण खूपच कमी झाला आहे आणि सर्वसामान्य जनतेची कामे ही अगदी वेळेत तर होतच आहेत त्याचबरोबर त्यांना अगदी कमी खर्चात ही सर्व कागदपत्रे मिळत आहेत.
फेरफार ऑनलाइन पद्धतीने कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहू
- फेरफार काढण्यासाठी सर्वप्रथम आपणाला शासनाच्या वेबसाईटवर जावे लागेल.👇 https://digatalsatbara.mahabhumi.gov.in
- वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम सातबारा नावाचे एक पेज ओपन होईल.
- जर आपण याआधी या वेबसाईटवर जाऊन नोंदणी केलेली असेल तर आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही Login करू शकता
- मोबाईल नंबर टाकून send OTP या पर्यायावर क्लिक करून त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल तो ओटीपी पेजवर ज्या ठिकाणी ओटीपी ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी टाका.
- त्यानंतर सातबारा नावाचे एक पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर Digital Signed e Ferfar या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा फेरफार उतारा काढण्यासाठी पंधरा रुपये तुम्हाला तुमच्या खात्यावर रिचार्ज करायचे आहेत.
- त्यानंतर तुम्हाला पेमेंट साठी जी संपूर्ण माहिती भरावी लागेल संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला submit बटणावर क्लिक करायचे आहे.
- तुम्ही केलेले पेमेंट succes झाले आहे असा मेसेज तुम्हाला आल्यानंतर continue या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्याप्रमाणे जिल्हा निवडल्यानंतर तालुका, गाव अशा पद्धतीने माहिती भरायची आहे व शेवटी फेरफार क्रमांक भरायचा आहे.
- पुढे तुम्हाला शेवटी download पर्यायावर क्लिक करून तुम्ही पंधरा रुपये पेमेंट केलेले आहे असे दिसेल त्यानंतर ok बटनावर क्लिक करा.
- शेवटी तुम्हाला तुमच्या पेजवर तुमचा डिजिटल असलेला फेरफार दिसेल. त्यानंतर तुम्हाला हवा असेल तर त्या फेरफारची तुम्ही प्रिंट घेऊ शकता.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फेरफार काढू शकता.
ऑफलाइन पद्धतीने फेरफार कसा काढावा?
फेरफार उतारा हा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीद्वारे आपणाला मिळवता येतो,त्यानुसार आपण आपल्या आवश्यकतेनुसार ऑफलाइन पद्धतीने जर हा उतारा काढायचा असेल तर आपण गाव कामगार तलाठी कार्यालयामध्ये आपणाला हा उतारा मर्यादित शुल्का मध्ये मिळू शकतो.
फेरफार उतारा नोंद कशी करावी?
जर तुम्हाला फेरफार नोंद करायची असेल तर ती फेरफार नोंद गाव कामगार तलाठी यांच्याकडून करून घ्यायची असते.व ती प्रमाणित करून घेण्यासाठी मंडळ अधिकारी यांच्याकडे वर्ग करायची असते. मंडल अधिकारी त्यांच्याकडे फेरफार उतारा नोंद जी की गाव कामगार तलाठी यांच्याकडून केलेली होती ती प्रमाणित करण्यासाठी योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता त्या व्यक्तीने केली आहे की नाही, हे सविस्तरपणे पाहूनच मंडल अधिकारी ती नोंद प्रमाणित करतो.
फेरफार उतारा खालील कामासाठी उपयोगी पडतो
- जमिनीची खरेदी विक्री: जमिनीची मालकी हस्तांतरित करताना विक्रेता आणि खरेदीदार या दोघांनाही फेरफार उतारा हा खूपच आवश्यक असतो.
- जमिनीचे विभाजन: जमिनीचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त तुकड्यांमध्ये विभाजन करतेवेळी प्रत्येक तुकड्यासाठी स्वतंत्र फेरफार उतारा आवश्यक असतो.
- जमिनीवरील बांधकाम: जमिनीवर नवीन घर दुकान किंवा इतर बांधकामासाठी फेरफार उतारा बंधनकारक असतो.
- जमीन तारण: एखाद्या जमिनीवर कर्ज घेण्यासाठी बँकेला फेरफार उतारा दाखवणे आवश्यक असते.
- जमिनीचे वारस: एखाद्या वारसाचे नाव फेरफार उताऱ्यामध्ये घालण्यासाठी आवश्यक
- मालमत्तेचा विमा: जमिनीचा विमा काढण्यासाठी फेरफार उतारा खूपच आवश्यक आहे.
- जमिनीच्या मालकी हक्काचा दावा: जमिनीच्या मालकी हक्काचा दावा करताना फेरफार उतारा पुरावा म्हणून अत्यंत महत्त्वाचा आहे
वरील महत्वाच्या कामांसाठी फेरफार उतारा हा खूपच गरजेचा आहे.
ॲप वापरून इ फेरफार कसा डाऊनलोड करावा
Digital 7/12 पोर्टल सोबतच काही ॲप वापरून अगदी सहज महाराष्ट्रातील कोणत्याही जमिनीचा इ फेरफार काढता येतो. Digital स्वाक्षरी असलेला eferfar काढण्यासाठी प्रामुख्याने दोन ॲप वापरले जातात, Landeed आणि Umang.
Landeed हे एक खासगी ॲप असून वापरण्यास खूप सोपे आहे. यावरून कोणतेही एक कागदपत्र काढण्यासाठी ₹100 इतका खर्च येतो. तर Umang हे भारत सरकारने नागरिकांच्या सुविधेसाठी बनविलेले ॲप असून या ॲप मधून फक्त ₹15 भरुन eFerfar आणि इतर कागदपत्रे मिळवता येतात.
Digital स्वाक्षरी असलेला इ फेरफार Verify कसा करावा
- eFerfar तपासून verify करण्यासाठी तुम्हाला महाभूलेख ऑनलाइन पोर्टल वर जावे लागेल
- त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील त्यापैकी Verify eFerfar हा पर्याय निवडावा लागेल.
- या नंतर तुम्हाला जो फेरफार Verify करायचा आहे त्याचा पडताळणी क्रमांक म्हणजे Verification Number प्रविष्ट करून सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुमचा eFerfar जर वैध असेल तर तुम्हाला पडताळणी यशस्वी असे दिसेल अन्यथा नाही.