नमस्कार , मित्रानो आज आपण परभणी जिल्ह्यातील जमिनीचा सातबारा ऑनलाइन पद्धतीने कसा डाउनलोड करायचा याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर डिजिटल स्वरूपातील सातबारा हा मोफत कसा पाहायचा? परभणी जिल्ह्यातील जुने सातबारा व फेरफार कसे मोफत पाहायचे. त्याचबरोबर डाउनलोड कशा पद्धतीने करायचे, हे सविस्तरपणे सदरच्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.
डिजिटल सातबारा विषयी थोडक्यात…
डिजिटल सातबारा हा जमिनीच्या नद्यांचे एक आधुनिक आणि पारदर्शक पद्धतीने व्यवस्थापन करण्याचा एक सुलभ आणि सोपा मार्ग आहे. कारण यामध्ये संपूर्ण जमिनीची डिजिटल स्वरूपात माहिती गोळा केलेली असते. या पद्धतीने जमिनीच्या मालकी हक्काबाबत ची माहिती ऑनलाईन पद्धतीने त्याचबरोबर पारदर्शक आणि अचूक माहिती उपलब्ध होते. या माहितीच्या आधारे जमिनीच्या खरेदी विक्री त्याचबरोबर हस्तांतर प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होताना दिसून येते. डिजिटल स्वरूपातील जमिनीची संग्रहित केलेली माहिती ही शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्यामुळे ही माहिती नागरिकांना अगदी अचूक स्वरूपात मिळते.
जमिनीचा डिजिटल स्वरूपातील सातबारा कसा पाहता येतो?
परभणी जिल्ह्याच्या डिजिटल सातबारा ची माहिती पाहण्यासाठी आपल्याला परभणी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्याचबरोबर तुम्हाला परभणी जिल्ह्याच्या डिझेल सातबारा ची माहिती दिली भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळाला भेट देऊन तेथूनही मिळवता येते. त्याविषयी आपण संक्षिप्त स्वरूपातील माहिती खाली पाहणारच आहोत.
डिजिटल सातबारा फायदे
- जमिनीची सर्व माहिती ही ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे नागरिकांची कोणत्याही स्वरूपात फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.
- जमिनीची संपूर्ण माहिती ही डिजिटल स्वरूपात मिळत असल्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज नाही.
- जमिनीच्या डिजिटल स्वरूपातील नोंदी या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्यामुळे त्या सुरक्षित राहतात.
- जमिनीच्या नोंदी या डिजिटल स्वरूपात असल्यामुळे त्या नेहमीच अद्यावत होत राहतात.
- नागरिकांना त्यांच्या जमिनीची माहिती ही डिजिटल स्वरूपात घरबसल्या मिळत असल्यामुळे त्यांच्या वेळेची बचत होते.
वरील सर्व फायदे हे डिजिटल सातबारा चे आहेत. यामुळे नागरिकांना याचा खूप फायदा होतो.
परभणी जिल्हा डिजिटल सातबारा
परभणी जिल्हा डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्याची पद्धत
डिजिटल सातबारा हा आपल्या जमिनीची सर्व माहिती ही डिजिटल स्वरूपात आपल्यासमोर अगदी पारदर्शक पद्धतीने मांडणारा एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मच्या आधारे तुम्ही तुमच्या जमिनीची संपूर्ण माहिती अगदी घरबसल्या मिळवू शकता. परभणी जिल्हा डिजिटल सातबारा ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया.
- ऑनलाइन पद्धतीने डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्यासाठी आपणाला सर्वप्रथम या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.👇👇👇https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
- जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन या लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे लागेल. जर तुम्ही याआधी रजिस्ट्रेशन केले असेल तर लॉगिन करा.
- त्यानंतर तुम्ही जो दस्तावेज डाउनलोड करणार आहे त्यावर क्लिक करा. (७/१२ निवडा)
- त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा निवडा. (परभणी)
- त्यानंतर तुम्ही परभणीतील तुमचा तालुका निवडा.
- नंतर तुम्ही तुमचे गाव निवडा.
- त्यानंतर तुम्ही तुमचा सातबारा नंबर टाका.
- त्यानंतर सर्वे किंवा गट नंबर निवडा.
- त्यानंतर तुम्ही स्क्रीन वरील डाउनलोड या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा दस्तऐवज डिजिटल स्वरूपात त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरीसह डाउनलोड करता येईल.
- हा दस्तऐवज तुम्ही कोणत्याही सरकारी आणि कायदेशीर कामासाठी वापरू शकता.
- डिजिटल स्वाक्षरीसह सातबारा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला पंधरा रुपये इतके नाममात्र शुल्क भरावे लागेल. यासाठी तुम्ही online पद्धतीने पैसे भरून तुम्ही तुमचे अकाउंट रिचार्ज करू शकता.
वरील माहितीच्या आधारे तुम्ही जमिनीचा सातबारा डिजिटल स्वाक्षरी सह डाऊनलोड करू शकता. यामुळे तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. तुम्ही अगदी सहजरित्या घरी बसून हा सातबारा डाऊनलोड करून घेऊ शकता.
परभणी जिल्हा मोफत डिजिटल सातबारा
परभणी जिल्ह्यातील सर्व जमिनींची संक्षिप्त स्वरूपातील माहिती ही शासनाच्या विश्वसनीय संकेतस्थळावर शासनाकडून उपलब्ध करून दिली आहे. ज्याद्वारे नागरिकांना आपल्या जमिनीचा सातबारा हा अगदी मोफत पणे पाहता येईल. म्हणूनच आपण परभणी जिल्ह्यातील डिजिटल सातबारा हा मोफत कसा पाहायचा याविषयीची माहिती स्टेप बाय स्टेप पाहू.
परभणी जिल्हा डिजिटल सातबारा मोफत कसा पाहायचा?
परभणी जिल्ह्यातील सातबारा मोफत कसा पाहायचा याविषयी संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप पाहूया.
- परभणी जिल्ह्यातील डिजिटल सातबारा मोफत पाहण्यासाठी सर्वप्रथम आपणाला महाभुलेख विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.👇👇👇 https://bhulekh.mahabhumi.gov.in
- या वेबसाईटवरून तुम्ही विना स्वाक्षरी सातबारा, ८अ उतारा आणि मालमत्ता पत्रक हे दस्तऐवज पाहू शकता.
- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा विभाग निवडावा लागेल. (छत्रपती संभाजीनगर विभाग)
- त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल.(परभणी जिल्हा निवडा)
- त्यानंतर परभणीतील तुम्ही तुमचा तालुका निवडा.
- त्यानंतर गाव निवडा.
- त्यानंतर तुम्ही जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर टाका.
- त्यानंतर तुम्हाला जमिनीचा पोट खाते नंबर टाकावा लागेल.
- तर सर्वात शेवटी नोंदणीसाठी तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाका.
- त्यानंतर सातबारा पहा या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर खाली दिलेला कॅप्च्या अचूक भरा.
- कॅप्च्या भरून झाल्यावर verify captcha to view 7/12 वर क्लिक करून तुम्ही तुमचा सातबारा अगदी मोफत पाहू शकता.
वरील माहितीचा संदर्भ घेऊन तुम्ही परभणी जिल्ह्यातील कोणत्याही जमिनीचा सातबारा अगदी मोफत पणे पाहू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही.
परभणी जिल्हा जुने सातबारा व फेरफार
जुने सातबारा व फेरफार हे जमिनीच्या मालकी हक्काची जुनी नोंद ठेवतात. त्यामुळे जमिनीच्या खरेदी विक्री, वारसा हक्क, बक्षीस पत्र या कारणामुळे जमिनीच्या मालक्या हक्कात झालेल्या बदलाची माहिती ही अगदी अचूकपणे मिळते. त्यामुळे जुने सातबारा व फेरफार जमिनीच्या वादात एक भक्कम पुरावा म्हणून वापरले जातात.
परभणी जिल्हा जुने सातबारा व फेरफार कसे डाउनलोड करायचे? कसे पाहायचे?
- परभणी जिल्ह्यातील जुने सातबारा व फेरफार डाऊनलोड करण्यासाठी किंवा मोफत पण पाहण्यासाठी सर्वप्रथम आपणाला भूमी अभिलेख विभागाच्या या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.👇👇👇 https://aaplebhulekh.mahabhumi.gov.in
- त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर भरावा लागेल.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला परभणी जिल्ह्यातील ज्या जमिनीचे जुने सात बारा व फेरफार पाहायचे आहेत किंवा पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून घ्यायचे आहेत त्यासाठी सदरच्या जमिनीचा सर्वे नंबर त्याच बरोबर गावचे नाव, तालुका ही माहिती अगदी अचूक स्वरूपात भरायची आहे.
- सदरची माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला संबंधित जमिनीच्या जुनी सातबारा उतारा तुमच्या स्क्रीनवर दिसतील.
- त्यानंतर तुम्ही हे दस्तऐवज डाऊनलोड करून घेणार असाल तर download या बटणावर click करून PDF स्वरूपात ही कागदपत्रे डाऊनलोड करून घेऊ शकता व सदाच्या कागदपत्रांची प्रिंटही काढून घेऊ शकता.
सदरच्या माहितीच्या आधारे तुम्ही परभणी जिल्ह्यातील कोणत्याही जमिनीचे जुने सातबारा व फेरफार अगदी मोफत पणे पाहू शकता. त्याचबरोबर नाममात्र शुल्क भरून डाऊनलोड करून घेऊ शकता. जुनी सातबारा व फेरफार हे जमिनीची ऐतिहासिक नोंद म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर जमिनीच्या वादात एक भक्कम पुरावा म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावत असतात.
सदरच्या लेखामध्ये आपण आज जिल्ह्यातील डिजिटल सातबारा या विषयी संपूर्ण माहिती अगदी संक्षिप्त स्वरूपात पाहिली आहे. मध्ये आपण डिजिटल स्वरूपातील सातबारा मोफत कसा पाहायचा? डिजिटल स्वाक्षरी सह सातबारा डाऊनलोड कसा करायचा? जुनी सातबारा व फेरफार याविषयी संपूर्ण माहिती सदरच्या लेखांमध्ये सविस्तरपणे पाहिली आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल. धन्यवाद!