Ratnagiri Online 7/12 |  जिल्हा निवडा रत्नागिरी

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सदरच्या मालिकेतील आज आपला जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्हा हा कोकण प्रशासकीय विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. हा जिल्हा पर्यटनासाठी त्याचबरोबर मत्स्यव्यवसाय, भात शेती आणि फलोत्पादन या क्षेत्रात आघाडीवर आहे. शासनाच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश या उपक्रमामध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर या जिल्ह्याने डिजिटल सातबारा च्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्याचे काम केले आहे. डिजिटल सातबारा चा मुख्य उद्देश म्हणजे जमिनी संबंधित नोंदणीचे संगणकीकरण करणे आणि नागरिकांना त्यांच्या जमिनीची माहिती डिजिटल स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे.

सदरच्या लेखांमध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यातील डिजिटल सातबारा विषयीची संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात मांडणार आहोत. यामध्ये डिजिटल सातबारा म्हणजे काय? डिजिटल सातबाराचे महत्त्व, मोफत डिजिटल सातबारा कसा पहायचा? डिजिटल स्वाक्षरीसह डिजिटल सातबारा कोणत्या पद्धतीने डाऊनलोड करायचा? रत्नागिरी जिल्ह्यातील जुने सातबारा व फेरफार याविषयीची संपूर्ण माहिती आपण सदरच्या लेखांमध्ये पाहणार आहोत.

विषयसूची

डिजिटल सातबारा विषयी थोडक्यात…

डिजिटल सातबारा म्हणजे जमिनीची संपूर्ण माहिती शासनाच्या किंवा जमिनीच्या संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर डिजिटल स्वरूपात संग्रहित किंवा गोळा केलेली असते त्याला डिजिटल सातबारा असे म्हणतात. डिजिटल स्वरूपातील माहितीच्या आधारे नागरिक जमिनीची संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने मिळवू शकतात. डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन माहिती पारदर्शक आणि अचूक स्वरूपात उपलब्ध होते. या माहितीच्या आधारावर जमिनीची खरेदी विक्री त्याचबरोबर हस्तांतर प्रक्रिया अधिक पारदर्शक होताना दिसते.

डिजिटल सातबारा फायदे

  • डिजिटल सातबारा वर मिळणारी माहिती अचूक स्वरूपात असते,यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करता येत नाही.
  • नागरिकांच्या जमिनीची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत असल्यामुळे नागरिकांच्या पैशाची बचत होते.
  • जमिनीच्या नोंदी डिजिटल स्वरूपात शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्यामुळे त्या सुरक्षित असतातच, त्याच बरोबर त्यांची नक्कल करता येत नाही. डिजिटल सातबाराचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यावरील माहिती वेळोवेळी अपडेट होत राहते.
  • जमिनीची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात मिळत असल्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयाची हेलपाटे मारण्याची गरज नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचतो. त्याचबरोबर जमिनीच्या नोंदी करण्यासाठी विनाकारण भटकंती करण्याची गरज नाही.
  • डिजिटल सातबाराचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे हे सातबारा नागरिक कधीही आणि कोठेही सहजरित्या उपलब्ध करून घेऊ शकता.

डिजिटल सातबाराच्या माध्यमातून जमिनीशी संबंधित कोणती माहिती मिळू शकते?

  • जमिनीचा मालक
  • जमिनीचे क्षेत्रफळ
  • जमिनीचे वर्गीकरण
  • जमिनीचा नकाशा
  • जमिनीच्या चतुर सीमा
  • जमिनीवरील कर्ज किंवा बोजा
  • जमिनीशी संबंधित इतर सर्व माहिती

डिजिटल सातबाराच्या माध्यमातून करता येणारी कामे

  • जमिनीशी संबंधित सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने केले जाऊ शकतात.
  • जमीन खरेदी विक्रीची नोंद ऑनलाईन पद्धतीने करता येते.
  • नागरिकांना त्यांच्या जमिनीचा सातबारा ऑनलाइन पद्धतीने मोफत पाहता येतो. त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करता येतो. याबद्दलची सविस्तर माहिती आपण खाली पाहणारच आहोत.

रत्नागिरी जिल्हा डिजिटल सातबारा

रत्नागिरी जिल्ह्यातील डिजिटल सातबारा नागरिकांना पाहण्याची सोय महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर केली आहे. या संकेतस्थळाला भेट देऊन रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक त्यांच्या जमिनीचा सातबारा मोफत पणे पाहू शकतात. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने डिजिटल स्वाक्षरीसह डिजिटल सातबारा डाउनलोड करण्याची सोय रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी केली आहे. जिल्हा प्रशासनावर पडणारा कामाचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून उचललेले हे पाऊल आहे. डिजिटल सातबारा मोफत कसा पाहायचा? त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड कसा करायचा? याविषयीची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.

रत्नागिरी जिल्हा डिजिटल सातबारा मोफत पाहण्याची संपूर्ण माहिती

रत्नागिरी जिल्ह्यातील डिजिटल सातबारा मोफत पाण्याची पद्धत शासनाकडून खूपच सोपी केली गेली आहे. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण खाली सविस्तरपणे पाहूया.

  • रत्नागिरी जिल्ह्यातील डिजिटल सातबारा मोफत पाहण्यासाठी सर्वप्रथम महसूल विभागाच्या संकेतस्थळावर जावे लागेल.👇👇👇 https://bhulekh.mahabhumi.gov.in
  • संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्वप्रथम विभाग निवडून Go या बटणावर क्लिक करा. (कोकण विभाग)
  • रत्नागिरी जिल्हा निवडा.
  • तालुका निवडा.
  • तालुका निवडल्यानंतर खाली त्या तालुक्यातील संपूर्ण गावांची यादी दिसेल, या यादीतून तुमच्या गावाचे नाव निवडून त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकून किंवा पहिले नाव, मधले नाव, आडनाव किंवा संपूर्ण नाव टाकून सातबारा पाहता येतो.
  • त्यानंतर मोबाईल नंबर टाकून ७/१२ शोधा बटनावर क्लिक करा.
  • दिलेल्या कॅप्च्या अचूक भरा. नंतर verify captcha to view 7/12 वर क्लिक करून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना मोफत सात बारा पाहता येतो.

वरील माहितीचा संदर्भ घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना कोणत्याही जमिनीचा सातबारा मोफत पाहता येतो. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक हा सातबारा फक्त पाहू शकतात, त्याचा वापर कोणत्याही कायदेशीर कामासाठी करता येत नाही.

रत्नागिरी जिल्हा डिजिटल सातबारा डिजिटल स्वाक्षरी डाउनलोड करण्याची संपूर्ण माहिती

रत्नागिरी जिल्ह्यातील डिजिटल सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करता येतो त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण खाली पाहूया.

  • रत्नागिरी जिल्ह्यातील डिजिटल सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर जावे लागेल.👇👇👇 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
  • मोबाईल नंबर टाकून Send OTP या बटणावर क्लिक करा.
  • मोबाईलवर आलेला OTP हा नंतर Enter OTP मध्ये भरा आणि त्यानंतर Verify OTP बटनावर क्लिक करा.
  • डिजिटल सातबारा हा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करायचा असल्यामुळे Net banking/Credit/Debit Card वरून १५ रुपये रिचार्ज करावा लागेल. Recharge Account बटनावर क्लिक करून संबंधित शुल्क भरता येईल.
  • रत्नागिरी जिल्हा निवडा.
  • तालुका निवडा.
  • गाव निवडा.
  • सर्वे नंबर किंवा गट नंबर टाका.
  • वरील सर्व माहिती अचूक स्वरूपात भरल्यानंतर व १५ रुपये ऑनलाईन पे केल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीसह डिजिटल सातबारा रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना डाऊनलोड करून घेता येईल.

वरील माहितीचा संदर्भ घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक किंवा शेतकरी डिजिटल सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड करून घेऊ शकतात. डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड केलेला सातबारा हा कोणत्याही कायदेशीर कामासाठी ग्राह्य मानला जातो. डिजिटल सातबाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या सातबारावर संबंधित अधिकाऱ्याची वेगळी सही व शिक्का घेण्याची गरज नसते.

रत्नागिरी जिल्हा जुने सातबारा व फेरफार

रत्नागिरीतील जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र शासनाने जमिनीचे जुने सातबारा व फेरफार ऑनलाइन पद्धतीने मोफत पाहण्याची सोय त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर केली आहे. त्याचबरोबर जुने सातबारा व फेरफार कसे डाउनलोड करायचे याबद्दलची संपूर्ण मार्गदर्शिका संबंधित संकेतस्थळावर महाराष्ट्र शासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना उपलब्ध करून दिले आहे. जुने सातबारा व फेरफार हे जमिनीची ऐतिहासिक नोंद ठेवण्याचे काम करतात. जुनी सातबारा व फेरफार यांच्या माध्यमातून जमिनीमध्ये कालांतराने झालेल्या बदलाची अचूक माहिती मिळते. जुने सातबारा व फेरफार यांच्या आधारावर दस्तऐवजांची सत्यता पडताळली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील जुने सातबारा व फेरफार मोफत कसे पाहायचे? त्याचबरोबर डाऊनलोड कसे करायचे? याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया.

रत्नागिरी जिल्हा जुने सातबारा व फेरफार मोफत कसे पाहायचे? डाऊनलोड कसे करायचे? याबद्दलची संपूर्ण माहिती

  • रत्नागिरी जिल्ह्यातील जुने सातबारा व फेरफार मोफत पाहण्यासाठी त्याचबरोबर डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.👇👇👇 https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in
  • संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्वप्रथम लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी करण्यासाठी संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर ही माहिती अचूक स्वरूपात भरावी लागेल.
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या जमिनीचा जुना सातबारा व फेरफार पाहायचा आहे किंवा डाऊनलोड करायचा आहे त्या जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर गावाचे नाव तालुका ही माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर दिलेला captcha व्यवस्थित भरून घ्यायचा आहे.
  • त्यानंतर संबंधित जमिनीचा जुना सातबारा व फेरफार स्क्रीनवर दिसेल, तेथून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक हा सातबारा व फेरफार मोफत पणे पाहू शकतात.
  • जमिनीचा जुना सातबारा व फेरफार रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना डाऊनलोड स्वरूपात हवा असेल तर, जिल्ह्यातील नागरिक Download Option वर क्लिक करून pdf स्वरूपात डाउनलोड करून घेऊ शकतात.
  • जुने सातबारा व फेरफार डाऊनलोड करण्यासाठी संबंधित व्यक्तीला १५ रुपये इतके शुल्क Net banking/Debit/Credit Card द्वारे भरावे लागते.

वरील माहितीचा संदर्भ घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक कोणत्याही जमिनीचा जुना सातबारा व फेरफार मोफत पाहू शकतात.त्याचबरोबर सदरचे जुने दस्तऐवज डाउनलोड स्वरूपात हवे असतील तर १५ रुपये इतके नाममात्र शुल्क भरून हे दस्तऐवज डाउनलोड करून घेता येतात.

सदर लेखाच्या माध्यमातून आपण रत्नागिरी जिल्ह्यातील डिजिटल सातबारा विषयीची संपूर्ण माहिती सविस्तरपणे अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. सदर माहितीच्या आधारे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक त्यांच्या जमिनीचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने मिळवू शकतील. धन्यवाद!

रत्नागिरी जिल्हा अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या.👉 https://ratnagiri.gov.in

रत्नागिरी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय पत्ता:               Lanja,Maharashtra 416701

Leave a Comment