छत्रपती संभाजीनगर Online 7/12 | जिल्हा निवडा संभाजीनगर, औरंगाबाद जिल्हा सातबारा उतारा

नमस्कार आज आपण या लेखामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील डिजिटल सातबारा, मोफत सातबारा त्याचबरोबर जुने सातबारा फेरफार उतारे हे कसे डाऊनलोड करायचे त्याचबरोबर मोफत कसे पाहायचे हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.

डिजिटल सातबारा म्हणजे काय?

डिजिटल सातबारा म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा एक डिजिटल नकाशा होय. डिजिटल सातबारा मध्ये जमिनीची सीमा, जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीचा मालक ही महत्त्वपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिलेली असते. डिजिटल सातबारा मुळे जमिनीच्या कागदपत्रांची विस्तृत स्वरूपात चिकित्सा करण्याची फार काही गरज वाटत नाही त्यामुळे जमिनीची माहिती त्वरित उपलब्ध होते.

डिजिटल सातबारा चे फायदे

डिजिटल सातबारा मुळे जमिनीची कोणतीही माहिती मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज पडत नाही. जमिनीची सर्व माहिती ही आपणाला अगदी अचूकपणे घरी बसूनच पाहता येते. डिजिटल सातबारा मुळे जमिनीच्या व्यवहारात पारदर्शकता दिसून येते. डिजिटल सातबारा हा खूपच सुरक्षित असल्याने यामध्ये कोणताही गैर प्रकार करता येत नाही. त्याचबरोबर डिजिटल सातबारा मध्ये जमिनीची माहिती ही अचूक असते. डिजिटल सातबारा ची माहिती ऑनलाईन उपलब्ध असल्याने ती नागरिकांना कुठूनही आणि कोणत्याही वेळी उपलब्ध असते.

छत्रपती संभाजीनगर डिजिटल सातबारा

छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातील डिजिटल सातबारा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप बाय स्टेप प्रोसेस करावी लागेल.

  • सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटला भेट द्यावी लागेल👇 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
  • त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडावा लागेल. (अर्थातच छत्रपती संभाजीनगर)
Select District Taluka
  • त्यानंतर तालुका निवडा.
  • त्यानंतर गाव निवडा.
  • त्यानंतर सातबारा क्रमांक टाका.
  • त्यानंतर सर्वे क्रमांक टाका.
  • नंतर सर्च या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जमिनीचा सातबारा उतारा स्क्रीनवर दिसेल.
Payment options
  • तुम्हाला सातबारा उतारा साठी १५ रुपये इतके शुल्क ऑनलाईन भरायचे आहे.
  • १५ रुपये शुल्क भरल्यानंतर तुम्ही सातबारा उतारा pdf स्वरूपात डाउनलोड करू शकता.

वरील माहितीच्या आधारे तुम्ही सातबारा डाउनलोड करू शकता त्यासाठी तुमच्याकडे तुमचा वैध असलेला ई-मेल आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. डिजिटल स्वरूपाचे सातबारा हा तुम्हाला मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये मिळू शकतो. जर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी स्वरूपात सातबारा हवा असेल तर तुम्ही तो डिजिटल स्वाक्षरीसह डाउनलोड करू शकता.

छत्रपती संभाजीनगर मोफत सातबारा

सध्या, महाराष्ट्र सरकारने आपल्या जनतेला त्यांच्या जमिनीची माहिती ऑनलाईन पाहण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला जमिनीच्या कागदपत्राची जास्त चिकित्सा करण्याची गरज नाही आणि त्यांना त्यांच्या जमिनीची माहिती त्वरित उपलब्ध होते. ऑनलाइन पद्धतीने मोफत सातबारा कसा पहायचा याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे.

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला भूमीअभिलेखच्या पोर्टलवर जावे लागेल.👇 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
  • सर्वप्रथम तुम्हाला छत्रपती संभाजीनगर पर्याय निवडावा लागेल
  • नंतर तुम्हाला जिल्हा निवडा या पर्यायांमध्ये छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा निवडावा लागेल.
मोफत सातबारा Enter details
  • त्यानंतर तालुका निवडा.
  • त्यानंतर गाव निवडा.
  • त्यानंतर सातबारा नंबर किंवा गट नंबर टाका.
  • त्यानंतर सर्वे क्रमांक टाका.
  • त्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करून तुम्ही जमिनीचा सातबारा उतारा स्क्रीनवर अगदी मोफतपणे पाहू शकाल.

अशा स्टेप फॉलो करून तुम्ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील कोणत्याही शेत जमिनीचा सातबारा अगदी मोफत पणे पाहू शकाल. मोफत सातबारा चा वापर तुम्ही जमिनीची खरेदी- विक्री त्याचबरोबर जमिनीच्या कोणत्याही व्यवहारासाठी करू शकता.

छत्रपती संभाजी नगर जुने सातबारा व फेरफार

महाराष्ट्र सरकारने नागरिकांना जमिनींच्या ऑनलाईन पद्धतीने पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सरकारच्या या सुविधेमुळे नागरिकांना तहसील कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाही. यामुळे नागरिकांना घरबसल्याच संगणक किंवा मोबाईल वरून ही माहिती मिळू शकते.

  • महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या या पोर्टलवरून तुम्ही छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जुने सातबारा आणि फेरफार ऑनलाइन पद्धतीने पाहू शकता.👇 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
  • या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी करताना तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि इतर जी आवश्यक माहिती लागेल ती भरावी लागेल.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ज्या जमिनीची माहिती पाहिजे त्या जमिनीचा सर्वे नंबर, गावाचे नाव आणि तालुका ही माहिती भरायची आहे.
Old records
  • ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला संबंधित जमिनीचा जुना सातबारा आणि फेरफार स्क्रीनवर दिसून येईल.
  • संबंधित उतारा तुम्ही pdf स्वरूपात डाउनलोड करून शकता किंवा प्रिंट काढून घेऊ शकता.

अशा रीतीने तुम्ही जुने सातबारा व फेरफार ऑनलाइन पद्धतीने पाहू शकता त्याचबरोबर pdf स्वरूपात डाउनलोड करून प्रिंट ही काढून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अगदी नाममात्र शुल्क द्यावे लागते. याबरोबर तुम्हाला जुन्या सातबारा बरोबरच फेरफार नोंदीची माहितीही मिळू शकते.

Leave a Comment