व्हाटसअप ग्रुप जॉईन करा

Sangli जिल्हा Online 7/12 | जिल्हा निवडा सांगली, सांगली जिल्हा सातबारा उतारा.

7/12 मालिकेमधील आज आपला जिल्हा आहे सांगली जिल्हा. आपण या लेखांमध्ये सांगली जिल्ह्यातील डिजिटल 7/12 याविषयीची संपूर्ण माहिती अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. यामध्ये आपण सांगली जिल्ह्यातील डिजिटल सातबारा कशा पद्धतीने डाऊनलोड करायचा. त्याचबरोबर डिजिटल सातबारा मोफत पद्धतीने कसा पाहायचा. आणि सर्वात शेवटी म्हणजे जुने सातबारा व फेरफार कसे डाउनलोड करायचे त्याच बरोबर कसे मोफत पाहायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

सांगली जिल्हा हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो. सांगली जिल्ह्यामध्ये जमिनीचे व्यवहार, जमीन नोंदणी, मालमत्ता संबंधीचे उत्तर व्यवहार यासाठी डिजिटल सातबारा ही एक महत्त्वपूर्ण सेवा उपलब्ध आहे. त्यामुळेच जमिनीच्या मालकांना आणि अन्य जमीन संबंधित घटकांना याद्वारे अनेक सोयी सुविधा मिळाल्या आहेत.

डिजिटल सातबारा म्हणजे काय?

डिजिटल सातबारा म्हणजे जमिनीची सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर डिजिटल स्वरूपात संग्रहित करणे होय. डिजिटल सातबारा वर जमिनीची सीमा, जमिनीचा मालक, जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीचे हक्क,ऋण ही जमिनीशी संबंधित संपूर्ण माहिती अगदी अचूक स्वरूपात यामध्ये संग्रहित केली जाते. डिजिटल सातबारा मुळे जमिनीचे व्यवहार अधिक पारदर्शक आणि सोपे झाले आहेत.

सांगली जिल्हा डिजिटल सातबारा फायदे

  • डिजिटल सातबारा मध्ये जमिन संबंधित माहिती मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाही यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होते.
  • जमिनीची सर्व माहिती ही शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा गैरप्रकार होण्याची शक्यता जवळपास नसतेच.
  • जमीन विषयक माहिती ही डिजिटल पद्धतीने संग्रहित केल्यामुळे ती सुरक्षित राहते.
  • नागरिकांना कोठेही आणि कोणत्याही वेळी डिजिटल सातबारा मिळवता येतो.
  • जमिनीची माहिती ही डिजिटल सातबारा स्वरूपात मिळत असल्यामुळे कागदपत्रांची गरज कमी होते.

सांगली जिल्हा मोफत सातबारा | Sangli 7/12

सांगली जिल्ह्यातील जमिनीचे सातबारा हे डिजिटल स्वरूपात शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. डिजिटल सातबारा सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोफत पाहण्याची सुविधा महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध करून दिली आहे.

सांगली जिल्हा मोफत सातबारा कसा पहायचा?

सांगली जिल्ह्यातील डिजिटल सातबारा हा मोफत कसा पाहायचा याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती आपण पाहू.

  • सर्वप्रथम आपणाला महाभुलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.???????????? https://bhulekh.mahabhumi.gov.in
  • या संकेतस्थळावरून तुम्हाला सातबारा,८अ उतारा, मालमत्ता पत्रक अगदी मोफतपणे पाहता येते.
  • त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा विभाग निवडावा लागेल. (पुणे)
  • त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा निवडा. (सांगली जिल्हा निवडा)
  • त्यानंतर सांगली जिल्ह्यातील तुमचा तालुका आणि तुमचे गाव निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला जमिनीचा पोट खाते नंबर निवडावा लागेल.
  • नोंदणीसाठी तुम्हाला तुमचा १० अंकी मोबाईल नंबर भरावा लागेल.
  • नंतर तुम्हाला सातबारा पहा या बटणावर क्लिक करावे लागेल.
  • नंतर दिलेला कॅप्च्या अचूक भरावा लागेल.
  • कॅप्च्या भरून झाल्यानंतर verify captcha to view 7/12 वर क्लिक करून तुम्ही तुमच्या सातबारा या ठिकाणी अगदी मोफत पणे पाहू शकता.

वरील प्रोसेस द्वारे तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील जमिनीचा सातबारा अगदी मोफत पाहू शकता. त्याचबरोबर तुम्ही ७/१२ सोबत ८अ उतारा व मालमत्ता पत्रक ही अगदी मोफत पणे या ठिकाणी पाहू शकतो. त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क मोजावे लागत नाही.

Sangli जिल्हा Digital 7/12| जिल्हा निवडा सांगली

डिजिटल सातबारा हा आपल्या जमिनीची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात आपल्याला पुरवणारे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे आपण आपल्या जमिनीचा सातबारा ला कधीही व कोठूनही ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकतो.

सांगली जिल्हा डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्याची प्रोसेस

  • सांगली जिल्ह्यातील डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम या संकेत स्थळाला भेट द्या.???????? https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
  • संकेतस्थळ उघडल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम लॉगिन करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडावा लागेल. (सांगली)
  • नंतर तुम्ही तुमचा तालुका निवडा.
  • त्यानंतर तुमचे गाव निवडा.
  • नंतर तुम्हाला जमिनीचा सातबारा नंबर किंवा सर्वे नंबर टाकावा लागेल.
  • त्यानंतर दिलेला कॅप्च्या व्यवस्थितपणे भरून सर्च या बटणावर क्लिक करावे लागेल.
  • सर च्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर जमिनीचा सातबारा दिसेल.
  • त्यानंतर तो सातबारा तुम्ही download option वर क्लिक करून PDF स्वरूपात डाउनलोड करून घेऊ शकता.
Gat number and payment
  • हा सातबारा जर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीसह हवा असेल तर १५ रुपये इतके नाममात्र शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे गरजेचे आहे.

अशा पद्धतीने तुम्ही जमिनीचा सातबारा हा डिजिटल सातबारा डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरीसह डाउनलोड केलेला सातबारा हा तुम्हाला जमिनीच्या कोणत्याही कायदेशीर बाबीसाठी महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून वापरू शकता.

सांगली जिल्हा जुने सातबारा व फेरफार

जुने सातबारा व फेरफार हे जमिनीच्या मालकी हक्काची जुनी नोंद ठेवते. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्क संदर्भात कोणतेही वाद निर्माण झाल्यास या जुन्या नोंदी महत्त्वाचा पुरावा म्हणून काम करतात. जुन्या नोंदीमुळे जमिनीच्या मालकी हक्कात झालेल्या बदलांची अचूक माहिती मिळते.

सांगली जिल्हा जुने सातबारा उतारा मोफत कसे पाहायचे?  डाउनलोड कसे करायचे?

  • जुने सातबारा व फेरफार डाऊनलोड करण्यासाठी किंवा मोफत पाहण्यासाठी आपणाला या अधिकृत संकेतस्थळाला सर्वप्रथम भेट द्यावी लागेल.???????????? https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in
  • या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव त्याच बरोबर तुमचा संपूर्ण पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी भरावी लागेल.
  • नोंदणी करून झाल्यानंतर तुम्ही सांगली जिल्ह्यातील ज्या जमिनीचा जुना सातबारा पाहायचे आहेत किंवा डाऊनलोड करायचे आहेत त्या जमिनीचा सर्वे नंबर, गावचे नाव, तालुका ही माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर तुम्ही संबंधित जमिनीचे जुने सातबारा व फेरफार तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता.
  • त्यानंतर तुम्ही download या option वर क्लिक करून तुम्ही हे जुने दस्तऐवज PDF स्वरूपात डाउनलोड करून घेऊ शकता व या दस्तऐवजांची प्रिंटही काढून घेऊ शकता.

वरील प्रोसेस द्वारे तुम्ही सांगली जिल्ह्यातील कोणत्याही जमिनीचा जुना सातबारा या ठिकाणी मोफत पाहू शकता त्याचबरोबर १५ नाममात्र शुल्क तुम्ही सातबारा डाऊनलोड ही करून घेऊ शकता. जुने सातबारा व फेरफार हे जमिनीचा वादातील एक महत्त्वपूर्ण ठरावा म्हणून काम करतात.

सदरच्या लेखांमध्ये सांगली जिल्ह्याच्या डिजिटल सातबारा संबंधित संपूर्ण माहिती पाहिली आहे. यामध्ये डिजिटल सातबारा हा मोफत कसा पाहायचा? त्याचबरोबर डाऊनलोड कसा करायचा? जुने सातबारा व फेरफार कसे पाहायचे व डाउनलोड कसे करायचे? याबद्दल अगदी संक्षिप्त स्वरूपात माहिती पाहिली आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या जमिनीशी संबंधित दस्तऐवज डिजिटल पद्धतीने काढू शकाल. धन्यवाद!

सांगली जिल्हा सविस्तर माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या.???? https://Sangli.nic.in

सांगली जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय पत्ता: Rajwada Chowk, Khanbhag, Sangli Miraj kupwad, Sangli, Maharashtra 416416

Leave a Comment

error: Content is protected !!