Satara जिल्हा Online 7/12  | जिल्हा निवडा सातारा, सातारा जिल्हा सातबारा उतारा

सदरच्या मालिकेतील आज आपण सातारा जिल्ह्यातील डिजिटल सातबारा विषयी संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. यामध्ये आपण डिजिटल सातबारा म्हणजे काय? डिजिटल सातबारा फायदे, डिजिटल सातबारा मार्फत मिळणाऱ्या सुविधा, त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील डिजिटल सातबारा ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड कसा करायचा? त्याचबरोबर डिजिटल सातबारा मोफत ऑनलाईन पद्धतीने कसा पाहायचा? जुने सातबारा व फेरफार ऑनलाइन पद्धतीने कसे डाउनलोड करायचे? त्याच बरोबर कसे मोफत पाहायचे? याबद्दलची सविस्तर माहिती सदरच्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

डिजिटल सातबारा काय आहे?

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जमीन खात्यांच्या सर्व नोंदी या डिजिटल स्वरूपात नागरिकांना उपलब्ध करून देणे म्हणजे डिजिटल सातबारा होय. त्यामुळे आता राज्यातील जमीनशी संबंधित सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने त्याचबरोबर पारदर्शक पद्धतीने होत आहेत. या या डिजिटल सातबारा मुळे नागरिकांना जमिनीशी संबंधित संपूर्ण माहितीसाठी शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज नाही.

डिजिटल सातबारा फायदे

१. जमिनीशी संबंधित माहिती ही डिजिटल स्वरूपात मिळत असल्यामुळे नागरिकांच्या वेळेमध्ये बचत होते.

२. जमिनीच्या सर्व नोंदी ऑनलाईन मिळत असल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराची किंवा भ्रष्टाचाराची शक्यता जवळपास कमी होते.

३. नागरिक हे त्यांच्या जमिनीची माहिती ऑनलाईन पद्धतीने घरबसल्याच घेऊ शकतात.

४. जमिनीच्या नोंदी या डिजिटल स्वरूपात असल्याने, जमिनीच्या कागदपत्रांची चोरी किंवा ती कागदपत्रे गहाळ होण्याची शक्यता कमी होते.

डिजिटल सातबारा सुविधा

  • डिजिटल सातबारा या सुविधेमुळे आपल्याला जमिनीचा नकाशा हा ऑनलाईन पद्धतीने पाहता येतो.
  • स्वतःच्या जमिनीची मालकी हक्क, क्षेत्रफळ, जमिनीची हद्द यासारखी जमीन संबंधित माहिती ऑनलाईन उपलब्ध होते.
  • आपणाला आपल्या जमिन संबंधित कागदपत्रे ऑनलाईन मिळवता येतात. त्यामध्ये सातबारा,८अ उतारा,फेरफार या कागदपत्रांचा समावेश होतो.
  • जमिन खात्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन अर्ज करता येतो.

सातारा जिल्हा डिजिटल सातबारा

सातारा जिल्हा डिजिटल सातबारा डाऊनलोड कसा करायचा?

सातारा जिल्ह्यातील डिजिटल स्वरूपातील सातबारा डाउनलोड करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती आपणास खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही सातारा जिल्ह्यातील कोणत्याही शेत जमिनीचा सातबारा डिजिटल स्वरूपात डाऊनलोड करून घेऊ शकता.

  • सातारा जिल्हा डिजिटल स्वरूपातील सातबारा डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपणाला या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.👇👇👇 https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल. (सातारा जिल्हा)
  • त्यानंतर सातारा जिल्ह्यातील तुमचा तालुका निवडा.
  • त्यानंतर गाव निवडा.
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या शेत जमिनीचा सातबारा नंबर टाका.
  • नंतर सर्वे क्रमांक टाका.
  • त्यानंतर सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेत जमिनीचा सातबारा स्क्रीनवर दिसेल.
  • त्यानंतर तुम्ही तो सातबारा download या option वर क्लिक करून PDF स्वरूपात download करून घेऊ शकता.
  • तुम्हाला हा सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने १५ रुपये इतके शुल्क भरणे गरजेचे आहे.
15 rs Payment

वरील माहितीचा संदर्भ घेऊन तुम्ही सातारा जिल्ह्यातील कोणत्याही शेत जमिनीचा किंवा तुमच्या स्वतःच्या शेती जमिनीचा सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह नाममात्र शुल्क भरून डाऊनलोड करून घेऊ शकता. हा सातबारा डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडे तुमचा वैध ई-मेल त्याचबरोबर मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. डिजिटल स्वरूपातील सातबारा आहे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहेत.

सातारा जिल्हा मोफत सातबारा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून सातारा जिल्ह्यामध्ये मोफत डिजिटल सातबारा वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचे सातबारा घरबसल्या मिळावेत.

सातारा जिल्हा डिजिटल मोफत सातबारा कसा पाहायचा?

सातारा जिल्ह्यातील डिजिटल सातबारा मोफत कसा पाहायचा याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहणार आहोत. यामध्ये तुम्ही जमिनीचा मालक, जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीचा वापर कशासाठी केला जातो. ही माहिती अगदी विस्तृत स्वरूपात तुम्हाला मोफत पाहता येते.

  • डिजिटल स्वरूपातील मोफत सातबारा पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाभुलेख विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.👇👇👇 https://bhulekh.mahabhumi.gov.in
  • या संकेतस्थळावरून तुम्ही विना स्वाक्षरी सातबारा त्याचबरोबर ८अ उतारा व मालमत्ता पत्रक पाहू शकता.
  • त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा विभाग निवडावा लागेल. (पुणे विभाग)
  • त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा निवडा. (सातारा जिल्हा)
  • त्यानंतर तालुका निवडा.
  • नंतर गाव निवडा.
  • त्यानंतर जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर टाका.
  • त्यानंतर जमिनीचा पोट खाते नंबर निवडा.
  • नंतर भाषा निवडा.
  • त्यानंतर नोंदणीसाठी तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर भरा.
  • त्यानंतर सातबारा पहा या बटनावर क्लिक करा.
  • दिलेला कॅप्च्या अचूक भरा.
  • कॅप्च्या भरून झाल्यावर verify captcha to view 7/12 वर क्लिक करून तुम्ही तुमचा सातबारा अगदी मोफत पाहू शकता.

वरील स्टेप फॉलो करून तुम्ही सातारा जिल्ह्यातील कोणत्याही शेत जमिनीचा सातबारा अगदी मोफतपणे पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही.

सातारा जिल्हा जुने सातबारा व फेरफार

जुने सातबारा व फेरफार हे जमिनीचे ऐतिहासिक नोंद ठेवण्याचे काम करतात. त्याद्वारे तुम्ही जमिनीची खरेदी विक्री, वारसा हक्क, बक्षीस पत्र या कारणामुळे जमिनीच्या मालकी हक्कात झालेल्या बदलाची माहिती अचूक रित्या मिळते.

सातारा जिल्हा जुने सातबारा उतारा कसे डाउनलोड करायचे? कसे पाहायचे?

  • सातारा जिल्ह्यातील जुनी सातबारा डाऊनलोड करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी तुम्हाला भूमी अभिलेख विभागाच्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.👇👇👇 https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in
  • या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर या ठिकाणी भरावा लागेल.
  • वरील नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला सातारा जिल्ह्यातील कोणत्याही जमिनीचे जुने सातबारा व फेरफार पाहायचे आहेत किंवा डाऊनलोड करायचे आहेत त्या जमिनीचा सर्वे नंबर,गावाचे नाव,तालुका ही माहिती भरायची आहे.
  • सदरची माहिती भरल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर संबंधित जमिनीचे जुने सातबारा व फेरफार दिसतील.
  • त्यानंतर तुम्ही संबंधित कागदपत्रे डाऊनलोड करून घेणार असाल तर download या option वर क्लिक करून PDF स्वरूपात ही कागदपत्रे download करून घेऊ शकता व त्यांची प्रिंटही काढून देऊ शकता.
  • संबंधित कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला नाममात्र शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.

वरील माहितीचा संदर्भ घेऊन तुम्ही सातारा जिल्ह्यातील कोणत्याही शेत जमिनीचे जुने सातबारा उतार अगदी मोफतपणे पाहू शकता त्याचबरोबर नाममात्र शुल्क भरून डाऊनलोड करून घेऊ शकता. जुने सातबारा व फेरफार उतारे जमिनीच्या वादात एक भक्कम पुरावा म्हणून काम करतात.

सदरच्या लेखांमध्ये आपण सातारा जिल्ह्यातील डिजिटल सातबारा याविषयी माहिती अगदी संक्षिप्त स्वरूपात दिली आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या जमिनीची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात मिळवू शकता. धन्यवाद!

सातारा जिल्हा सविस्तर माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.👉 https://www.satara.gov.in

सातारा जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय पत्ता: Tahsildar Office, Sadar Bazar,Satara, Maharashtra 415001

Leave a Comment